' सर्व स्टार्सची मुलं सारखी नसतात, या ८ जणांनी स्वीकारली आहे वेगळी वाट… – InMarathi

सर्व स्टार्सची मुलं सारखी नसतात, या ८ जणांनी स्वीकारली आहे वेगळी वाट…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेल्या २ वर्षांपासून सामान्य लोकांचा बॉलिवूडवर जो राग निर्माण झाला आहे तो काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. यामागे प्रामुख्याने २ कारणं आहेत त्यातलं एक कारण म्हणजे बॉलिवूडचं ड्रग माफियाशी असलेलं कनेक्शन आणि दुसरं म्हणजे नेपोटीजम!

बॉलिवूडचे ड्रग माफियाशी किंवा अंडरवर्ल्डशी असलेलं कनेक्शन आपल्यासाठी नवीन नाही, की इंडस्ट्रीत असलेलं नेपोटीजम आपल्यासाठी नवीन नाही, आणि आता याच गोष्टी हाताबाहेर जाऊ लागल्याने लोकांचा बॉलिवूडवरचा राग अनावर होऊ लागला आहे.

 

nepotism IM

 

खरंतर नेपोटीजम हे कोणत्या क्षेत्रात नाही? डॉक्टर, वकील, CA, राजकारण या सगळ्या क्षेत्रात आपल्याला नेपोटीजम बघायला मिळतं, मग बॉलिवूडमध्ये असलेलं नेपोटीजमच नेमकं लोकांच्या डोळ्यात का खुपतं?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

यामागचं कारण सांगता येणं जरा कठीण आहे पण बहुतेक स्टारकिड्सची कुवत नसतानासुद्धा प्रेक्षकांच्या माथी आणून मारलं जातं हे त्यातल्या त्यात योग्य कारण आहे.

आता रणबीर कपूर हासुद्धा स्टारकीडच आहे, पण फिल्मी दुनियेत त्याने स्वतःचं असं एक स्थान निर्माण केलं आहे आणि म्हणूनच लोकं त्याला पसंत करतात.

 

ranbir kapoor inmarathi

 

हीच गोष्ट तुम्हाला अनन्या पांडे, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूरच्या बाबतीत ऐकायला मिळते का?

फक्त बॉलिवूडच नव्हे तर साऊथ इंडस्ट्रीतसुद्धा नेपोटीजम आहेच की पण तिथे बॉलिवूडसारखा प्रकार सहसा आपल्याला बघायला मिळत नाही, पण असेही काही नेपोकिड्स आहेत ज्यांनी वेगळाच मार्ग स्वीकारला आहे.

सेलिब्रिटी आई वडिलांच्या पावलावर पाऊल न टाकता या स्टारकिड्सनी स्वतःचं करियर स्वतः निवडलं आणि ते आज त्यादिशेने यशस्वीरित्या वाटचाल करत आहेत, आजच्या लेखातून अशाच काही स्टारकिड्सविषयी जाणून घेणार आहोत.

१. वेदांत माधवन :

 

vedant madhvan IM

 

कोविड काळात आपल्या मुलाला स्विमिंगचा सराव करायला मिळावा म्हणून स्वतःचं स्टारडम बाजूला ठेवून एक वडील म्हणून परदेशात राहायला गेलेल्या आर.माधवनबद्दल आपल्याला ठाऊक आहेच.

साऊथ फिल्म इंडस्ट्री आणि मग हिंदी चित्रपटसृष्टि गाजवणाऱ्या माधवनच्या मुलाला म्हणजेच वेदांत माधवनला लहानपणापासूनच फिल्म्समध्ये यायची नव्हती. स्विमिंगमध्ये आपल्या देशाचं नाव मोठं करायचं हेच त्याचं स्वप्न आहे.

नुकतंच वेदांतने डेन्मार्कमध्ये ‘Danish Open 2022 Swimming Championship’ मध्ये ८०० मीटर स्विमिंगमध्ये गोल्ड मेडल मिळवून भारताचं नाव मोठं केलं आहे.

२. त्रिशाला दत्त :

 

trishala dutt IM

 

३०० हून अधिक गर्लफ्रेंड असो, ड्रगची सवय असो किंवा टाडाखाली झालेली अटक असो, संजय दत्त हे नाव नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलं आहे. याबरोबरच संजय दत्तच्या लग्नाची सुद्धा सॉलिड चर्चा झाली.

१९८७ मध्ये संजय दत्तने अभिनेत्री ऋचा शर्माशी लग्न केलं, पण दुर्दैवाने ब्रेन ट्यूमरने तिचा घात केला. तिच्यापासून संजय दत्तला एक मुलगी आहे ती म्हणजे त्रिशाला दत्त.

त्रिशालाने मात्र कधीच फिल्म इंडस्ट्रीकडे पाहिलं नाही. तीचं शिक्षण आणि बालपण हे तिच्या आजी आजोबांसोबत लंडनमध्येच गेलं. ती एक क्रिमिनल लॉयर असून उद्योगविश्वातदेखील कार्यरत आहे.

३. कृष्णा श्रॉफ :

 

krishna shroff IM

 

आपल्या मुंबईच्या लाडक्या भिडूला म्हणजेच जॅकी श्रॉफला जेवढं प्रेम दिलं तेवढच त्याच्या मुलाला म्हणजेच टायगरला दिलं. पण जॅकीच्या मुलीने कधीच फिल्म इंडस्ट्रीची वाट धरली नाही.

कृष्णाला कायमच फिटनेसमध्ये रुचि होती, आणि सध्या ती मुंबईतल्या एका प्रसिद्ध फिटनेस सेंटरची फाउंडरदेखील आहे. दिसायला अत्यंत सुंदर असूनही तिने स्वतःला या लाईमलाइटपासून लांब ठेवत फिटनेसवर लक्षकेंद्रित करायचं ठरवलं आहे.

४. साक्षी खन्ना :

 

sakshi khanna IM

 

एकेकाळी अमिताभ बच्चनला एकच अभिनेता टक्कर देणारा होता तो म्हणजे विनोद खन्ना. विनोद खन्ना नंतर त्याचा मुलगा अक्षय खन्नाने फिल्म इंडस्ट्रीत चांगलंच नाव कामावलं. फारसे सिनेमे न करताही त्याने प्रेक्षकांवर स्वतःची छाप सोडली.

विनोद यांच्या ३ मुलांपैकी अक्षय आणि राहूल यांच्याविषयी आपल्याला ठाऊक असेल, पण त्यांचा धाकटा मुलगा साक्षी खन्ना याने मात्र स्वतःसाठी वेगळा रस्ता निवडला.

वडील आणि भावाप्रमाणे अभिनयात प्रवेश न करता त्याने दिग्दर्शन करायच ठरवलं असून त्याने स्वतःची एक प्रोडक्शन कंपनीसुद्धा काढली आहे

५. जानवी मेहता :

 

jaanvi mehta IM

 

जुही चावला आणि जय मेहता यांची मुलगी जानवी मेहता हिला नुकतंच IPL auction दरम्यान आपण सगळ्यांनीच पाहिलं असेल. आईप्रमाणे अभिनय करून मोठी अभिनेत्री व्हावं असं तिला कधीच वाटलं नाही.

याउलट ती वयाच्या २२ वर्षापासूनच IPL टीमच्या कामकाजात लक्ष घालून आहे, तिला एक यशस्वी बिझनेसवुमन व्हायचं आहे!

६. अंशुला कपूर :

 

anshula kapoor IM

 

अर्जुन कपूर आणि त्याच्या अभिनयाविषयी आपण खरंतर काहीच बोलायला नको, पण अर्जुनची बहीण आणि बोनी कपूरची लहान मुलगी अंशुला कपूर हिलासुद्धा फिल्म्समध्ये अजिबात रुचि नाही.

एका मोठ्या फिल्मी घराण्यात जन्म घेऊनही तिने जाहिरात क्षेत्रात खूप नाव कामावलं आहे तसंच गुगलसारख्या मोठ्या कंपनीत तिने कामदेखील केलं आहे. तसेच तिने हृतिक रोशनच्या स्पोर्ट ब्रॅंडसाठीसुद्धा काम केलं आहे.

७. सबा अली खान :

 

saba ali khan IM

 

पतौडी घराण्यातली धाकटी मुलगी आणि आई बहीण भाऊ सगळे फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत असूनही सबा अली खानला कधीच फिल्मी दुनियेत यावसं वाटलं नाही.

सबाला ज्वेलरी डिझायनिंगमध्ये रुचि आहे तसेच ती  पतौडी घराण्याच्या रोयल ट्रस्टची ती ट्रस्टी म्हणून कार्यभारदेखील सांभाळते. भोपाळ हरियाणासोबतच इतरही भागात पसरलेला घराण्याचा २७०० करोड रुपयांचा कारभार ती स्वतः एकटीच सांभाळते!

८. रिया कपूर :

 

ria kapoor IM

 

अनिल कपूरची धाकटी मुलगी रिया कपूर ही तिच्या बहिणीप्रमाणे म्हणजेच सोनम प्रमाणे अभिनय क्षेत्रात नसली तरी ती सिनेमे निर्मिती क्षेत्रात काम करतिये. आयेशा, विरे दी वेड्डिंग’ हे असे सिनेमे तिने प्रोड्यूस केले आहेत!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?