' एकेकाळी वेगाने वाढणाऱ्या जिओ सारख्या कंपनीकडे ग्राहक का पाठ फिरवत आहेत? – InMarathi

एकेकाळी वेगाने वाढणाऱ्या जिओ सारख्या कंपनीकडे ग्राहक का पाठ फिरवत आहेत?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जिओ कंपनीचे सुरुवातीचे काही दिवस आजही सगळ्यांनाच अगदी स्पष्ट आठवत असतील. नव्याने सिमकार्ड सेवेत प्रवेश करत असलेल्या जिओ या ब्रँडचं सिमकार्ड मिळवण्यासाठी अनेकांनी जीवाचं रान केलं होतं. जिओच्या दुकानाच्या बाहेर रांगाचरांगा लागलेल्या दिसत असत.

डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळायला हवी यासाठी झटतो त्यापद्धतीने जिओच्या सिमकार्डसाठी लवकरात लवकर अपॉइंटमेंट मिळावी म्हणून आटापिटा करणारी अनेक मंडळी याकाळात पाहायला मिळाली.

 

jio-inmarathi
gizmotimes.com

 

जिओचं सिमकार्ड मिळवण्यासाठी ही अशी गर्दी उसळण्याचं कारण होतं, ते म्हणजे फुकटात मिळणारं सिमकार्ड आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, तब्बल वर्षभर फुकटात इंटरनेट आणि कॉलिंगची सेवा वापरण्याची मिळणार असलेली संधी! त्यावेळी जिओच्या सिमकार्डमागे धावणारा मोठा ग्राहकवर्ग होता. मात्र आज याच ग्राहकांना गळती लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय.

 

 

मध्यंतरी वाढलेले मोबाईल सेवांचे दर हेच याचं कारण असावं की आणखीही काही कारणं यामागे असतील, असा विचार तुमच्याही मनात येत असेल ना? मग चला त्याची कारणं समजून घेऊयात.

 

reliance-jio-mukesh-ambani-inmarathi

‘२५१ रुपयांत स्मार्टफोन’ असं स्वप्नं दाखवणाऱ्या “या” कंपनीचं पुढे काय झालं?

अंबानींना मागे टाकत गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

गेल्या सहा महिन्यात मोठी घसरण

मागील वर्षाच्या अखेरीपासूनच जिओच्या ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घट होऊ लागलेली पाहायला मिळत आहे. नव्या वर्षांपासून हा वेग अधिकच वाढला असल्याचं सुद्धा दिसतंय. फेब्रुवारी महिन्यात जवळपास ३६ लाख ग्राहक गमावणाऱ्या जिओला वर्षाच्या पहिल्या महिन्यात, म्हणजेच जानेवारीत तब्बल ९३ लाख ग्राहकांनी सोडचिठ्ठी दिली. 

 

every indian uses mobile inmarathi
indiatimes.com

मोबाईल वापराच्या दरात मोठ्या प्रमाणावर झालेली वाढ हे याचं मुख्य कारण असल्याचं मानलं जातंय. जिओसह वोडाफोन-आयडिया एकत्र येऊन तयार करण्यात आलेल्या ‘वि’ या कंपनीला सुद्धा घटत्या ग्राहक संख्येचा फटका बसल्याचं गेल्या काही महिन्यात पाहायला मिळालं आहे. या सगळ्यात एअरटेलने मात्र मुसंडी मारली असून, त्यांच्या ग्राहकसंख्येत बरीच वाढ झाली असल्याचं दिसतंय.

रिपोर्ट म्हणतोय की…

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच टीआरएआयने नुकत्याच जाहीर केलेल्या रिपोर्टमध्ये ही आकडेवारी समोर आली आहे. मुकेश अंबानी यांच्या जिओकडे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर पाठ फिरवल्याची स्थिती गेले काही महिने सातत्याने पाहायला मिळत आहे.

केवळ फेब्रुवारीच्या आकडेवारी समोर ठेवली, तर आज सगळ्यात कमी दर्जाची मोबाईल सेवा पुरवणारी कंपनी मानल्या जाणाऱ्या वोडाफोन-आयडियाच्या तुलनेत जिओने दुप्पट ग्राहक संख्या गमावली आहे.

वोडाफोन-आयडियाचे ग्राहक १५ लाखाने कमी झालेले असताना, जिओच्या कमी झालेल्या ग्राहकांची संख्या जवळपास ३७ लाख इतकी आहे.

याच काळात एअरटेलने दोन्ही स्पर्धकांवर मात करून १६ लाखांनी ग्राहक संख्या वाढवली आहे. ग्राहकसंख्येला तडा गेलेला असताना, ही आकडेवारी त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे असं म्हणायला हवं.

 

airtel im

 

सहा महिने मोठी गळती

सप्टेंबर २०२१ पासून जिओची ही पीछेहाट सुरु आहे. मागच्या दोन क्वार्टरचा विचार केला तर जिओने सातत्याने ग्राहक गमावलेच आहेत. गमावलेल्या ग्राहकांची ही आकडेवारी इतकी मोठी झाली आहे, की वोडाफोन-आयडियाला सुद्धा जिओने कोसो दूर मागे टाकलं आहे, असं म्हटलं तरी ते वावगं ठरत नाही. जिओने गमावलेल्या ग्राहकांची संख्या थोडीथोडकी नाही, तर वोडाफोन-आयडियाच्या ५ पट आहे.

 

vi im 1

 

ही मात्र जमेची बाब

जिओने ग्राहक गमावण्याची साखळी सुरूच ठेवली असली, तरी दुसऱ्या बाजूला त्यांच्या ऍक्टिव्ह ग्राहकांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. म्हणेजच, नव्याने जोडल्या जाणाऱ्या ग्राहकांची संख्या सुद्धा चांगली असल्याचं पाहायला मिळतंय.

 

jio sim InMarathi

 

सर्वात मोठा प्रतिस्पर्धी असणाऱ्या एअरटेलवर, याबाबतीत जिओ करत असलेली कुरघोडी कायम आहे. ऍक्टिव्ह ग्राहकांच्या संख्येतील आकड्यांची तफावत मात्र दिवसेंदिवस सातत्याने वाढत आहे. एका बाजूला ग्राहक पाठ फिरवत असताना, जिओसाठी ही बाब मात्र समाधानाची ठरतेय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?