' असं नेमकं काय घडलं की फ्रांसने उभारलं होतं खोटं, दुसरं पॅरिस शहर? – InMarathi

असं नेमकं काय घडलं की फ्रांसने उभारलं होतं खोटं, दुसरं पॅरिस शहर?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जागतिक पातळीवर आजवर घडलेल्या महत्वाच्या घटनांची यादी तयार केली तर ‘पहिलं महायुद्ध’ ही घटना नेहमीच अग्रक्रमावर असेल. या युद्धात झालेला नरसंहार, संपत्तीचं नुकसान हे संपूर्ण जगाने पहिल्यांदाच बघितलं आणि खऱ्या अर्थाने त्या काळात जग ढवळून निघालं होतं.

युरोपियन देशात असलेली अस्वस्थता आणि हिटलरचा नाझीवाद हा महायुद्धाला दिशा देत होते. हिटलर जगातील एकेक भाग पादाक्रांत करत होता आणि जग हतबलतेने घडणाऱ्या सर्व घटनांकडे बघत होतं. रशियाचा पुतीन जसा सध्या युक्रेनच्या हात धुऊन मागे लागला आहे तसं हिटलरने त्यावेळी फ्रांसवर निशाणा साधला होता.

 

hitler mussolini inmarathi

 

फ्रांसची राजधानी पॅरिस आणि जर्मन सैन्य यांच्यात केवळ ३० किलोमीटर इतकंच अंतर राहिलं होतं. ३० ऑगस्ट १९१४ या दिवशी जर्मनीने पॅरिस शहरात सर्वप्रथम बॉम्बवृष्टी केली होती. ‘टाऊबे’ नावाच्या एका छोट्या दोन आसनी विमानातून ४ बॉम्ब टाकून पॅरिस शहर उद्धवस्त करण्यात आलं होतं.

 

 

पॅरिस शहर हस्तगत करण्याच्या मनसुब्याने जर्मन सैनिक सतत प्रयत्न करत होते. पॅरिस जिंकलं तर फ्रांस जिंकलं हे जर्मन लोकांना पूर्णपणे माहीत होतं. पॅरिस जिंकण्यासाठी जर्मनी तिथे रोजच बॉम्बवृष्टी करू लागला. दिवसरात्र सुरू असलेल्या या बॉम्बवृष्टीने पॅरिस मधील जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झालं होतं.

 

old paris im

 

फ्रांस देश अस्वस्थ झाला होता, पण पराभूत झाला नव्हता. आजच्या युक्रेन प्रमाणे जर्मनी समोर सपशेल शरणागती पत्करायची नाही हे त्यांनी ठरवलं होतं. हिटलरला प्रत्युत्तर देण्यासाठी शक्तीची नाही तर युक्तीची आवश्यकता आहे हे फ्रान्सच्या लक्षात आलं होतं.

पॅरिस शहराचं सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी एक खोटं ‘पॅरिस’ शहर उभं करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

१९१७ मध्ये जर्मनीने ‘गोथा’ नावाचं एक अजून बॉम्बर विमान तयार केलं जे आकाराने लहान होतं. जिथे बॉम्ब टाकायचा आहे त्या नेमक्या ठिकाणी हे ‘गोथा’ विमान जाऊ शकणारं होतं. फक्त या विमानाचा एकच अडथळा होता की, हे जास्त उंचीवरून मारा करत असल्याने रात्रीच्या वेळी त्याचा निशाणा चुकण्याची शक्यता अधिक होती.

फ्रान्सने हा अभ्यास केला आणि त्यांनी १९१७ मध्ये त्यांनी ‘साइन’ नदीच्या तीरावर, मूळ पॅरिसच्या उत्तरेला खोट्या पॅरिसच्या बांधकामाला सुरुवात केली. ‘मेसन्स लॅफिटी’ हे या भागाचं खरं नाव होतं.

 

gotha im 1

फ्रांसने या खोट्या पॅरिसमध्ये ‘आर्क डे ट्रायोम्फ’, ‘चांप्स एलीसीस’, ‘गार्ड डु नॉर्ड’ सारख्या वास्तूंची, टुमदार घरांची हुबेहूब प्रतिकृती उभी करण्यात आली. पॅरिस शहर हे त्या काळापासूनच तिथल्या आकर्षक विद्युत रोषणाईने ओळखलं जातं. विद्युत रोषणाईचा प्रश्न सोडवण्यासाठी फ्रांसने इटलीच्या ‘फेरनंद जॅकोपॉझि’ या अभियंत्याला आमंत्रित करण्यात आलं होतं.

जॅकोपॉझिने आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा पुरेपुर वापर केला आणि त्यांनी ‘मुव्हिंग लाईट्स’ प्रकारच्या प्रकाशयोजनेचा वापर केला आणि अल्पावधीतच ते खोटं पॅरिस सुद्धा त्याने लखलखीत केलं. हे साध्य करण्यासाठी त्याने फॅब्रिक्स, चकणारे काच यांचा वापर केला. जॅकोपॉझिच्या मदतीने फ्रांसने खोटे घरं, फॅक्टरी आणि तिथून रात्रीच्या वेळी बाहेर पडणारा प्रकाश हे त्या जागेत दिसेल अशी सोय करण्यात आली होती.

फ्रान्सने घेतलेल्या या मेहनतीचा त्यांना काही बॉम्बपासून वाचवण्यासाठी नक्कीच फायदा झाला होता. ११ नोव्हेंबर १९१८ रोजी जर्मन सैन्याने फ्रान्सच्या या खोट्या पॅरिसवर शेवटचा हल्ला केला होता आणि काही संपत्ती, जीवितहानी टाळण्यात फ्रान्सला यश मिळालं होतं.

 

jaco im

 

जॅकोपॉझि या इटलीच्या अभियंत्याला फ्रांसने ‘लिजन द होंन्यूर’ या तांत्रिक क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. इतकंच नाही तर, फ्रांसची ओळख असलेल्या ‘आयफेल टॉवर’वर पहिला लाईट बसवण्याचा मान जॅकोपॉझि यांना देण्यात आला होता.

पहिलं महायुद्ध जेव्हा संपलं तेव्हा फ्रांस आणि जर्मनी या दोन्ही देशातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता. कारण, युद्ध कोणीही जिंकलेलं असलं तरीही त्याची अस्वस्थता ही दोन्ही देशांच्या नागरिकांनी सारखीच अनुभवली होती.

“जर्मनीने हे आपल्या शक्तीच्या जोरावर युद्ध जिंकलं होतं, तर फ्रान्सने आपल्या कल्पकतेने त्या देशातील नागरिकांची मनं जिंकली होती” असा त्या काळातील पत्रकारांनी या घटनेचा उल्लेख केला होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?