' मायकल जॅक्सनपेक्षा भारी डान्सिंग टॅलेंट असलेल्या प्रभूदेवाचा सुखी संसार यामुळे मोडला! – InMarathi

मायकल जॅक्सनपेक्षा भारी डान्सिंग टॅलेंट असलेल्या प्रभूदेवाचा सुखी संसार यामुळे मोडला!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कितीही झालं तरी कॉंट्रोवर्सी आणि सेलिब्रिटी या दोन गोष्टींना तुम्ही वेगळं करूच शकत नाही, आणि त्यातून त्यांची लफडी म्हणजे आणखीनच चर्चेचा विषय ठरतात. विकी कतरिना आणि आलिया रणबीर यांनी लग्न करून त्यांच्याबद्दलच्या अफवांना पूर्णविराम दिला खरा.

पण चित्रपटसृष्टीत अशा अफवा दिवसागणिक ऐकायला मिळतात. जुन्या काळात तर एकेकाळी कित्येक मॅगजीनमधून वृत्तपत्रातून याविषयी लोकं प्रचंड चर्चा करायचे. अगदी तिखट मीठ मसाला लावून या बातम्या चघळल्या जायच्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अभिनेता अभिनेत्रीपासून दिग्दर्शक निर्माते अशा कित्येकांच्या अफेअरच्या चर्चा रंगलेल्या आपण बघितल्या आहेत.

 

bollywood gossip IM

 

भारतीय चित्रपटसृष्टीतील काही उत्तम डान्सर्स किंवा कोरिओग्राफर कोणते असा प्रश्न तुम्हाला विचारला तर प्रभुदेवा हे नाव कोणाकडूनही ऐकायला मिळेल.

मुक्काबला, एबीसीडी यांसारख्या काही गाण्यांतून त्याने आपल्या डान्सची जादू रसिकांवर चांगलीच फिरवली होती. प्रभुदेवाचे साऊथ इंडस्ट्रीमध्ये ज्या प्रकारे आदराने नाव घेतले जाते त्याचप्रकारे हिंदीमध्येसुद्धा घेतले जाते.

प्रभुदेवा एक मल्टीटॅलेंटेड व्यक्ती आहे हे त्यांच्या कारकिर्दीचा आलेख आणि त्यांनी दिलेल्या हिट्स गाण्याच्या संख्येवरून सिद्ध होते.

 

prabhudeva IM

 

त्याचे व्यावसायिक जीवन नेहमीच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. पण त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एक पैलू ज्याकडे लक्ष गेले नाही ते म्हणजे त्याचे ‘प्रेमजीवन’.

प्रभुदेवा नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत फारसे व्यक्त होत नाही. पण म्हणून काही त्यांच्या लव्ह लाईफच्या अफवा आणि चर्चा थांबल्या असं नाहीत.आज आपण जाणून घेऊयात प्रभुदेवाने नक्की किती लग्न केली? आणि कोणत्या हिरॉईनच्या प्रेमामुळे त्याला त्याच्या संसारावर पाणी सोडावं लागलं होतं? चला तर मग पाहुयात..

एका मुस्लिम मुलीशी प्रभुदेवाने केले होते लग्न!

१९९५ मध्ये प्रभुदेवाचे रामलताशी लग्न झाले. प्रभू देवा आणि रामलता यांना दोन मुले झाली. रामलता ही आधी मुस्लिम होती पण प्रभुदेवाच्या प्रेमापोटी आणि त्याच्याशी लग्न करण्यासाठी तिने हिंदू धर्म स्वीकारला. तिने लग्नानंतर तिचे नाव बदलून रामलता ठेवले.

 

prabhudeva and ramlath IM

जेव्हा ‘नयनतारा’च्या प्रेमात वेडा झाला होता प्रभुदेवा :

२००८ च्या आसपास दाक्षिणात्य चित्रपटात एक तरुणी तिच्या अदांमुळे लोकांचे विशेष लक्ष आकर्षित करू लागली तिचं नाव…नयनतारा! त्यावेळेस बऱ्यापैकी नाव कमावलेला आणि लोकप्रिय झालेला प्रभुदेवा नयनताराच्या प्रेमात पडला.

२००९ मध्ये त्यांनी एकमेकांना डेट करत असल्याचे जाहीरही केलं. काही काळाने ते लिव्ह-इन मध्ये सुद्धा राहायला लागले.

पत्नीनेच दाखल केली प्रभुदेवा विरुद्ध तक्रार :

रामलताला या गोष्टी असह्य व्हायला लागल्या व तिने न्यायालयात धाव घेतली. “आपल्या पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत व तो आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या चालवण्यास मदत करत नाही” अशी तक्रार तिने दाखल केली.

 

prabhudeva nayanthara IM

..अन प्रभुदेवाच्या लव्ह लाईफचे तीन तेरा वाजले :

या तक्रारीवरून २०१० मध्ये कोर्टाने प्रभुदेवाला समन्स बजावले पण प्रभुदेवा नयनताराच्या प्रेमात इतका आकंठ बुडाला होता की त्याने दोन मुलं असलेल्या आपल्या पत्नीपासून २ जुलै २०१० रोजी त्याने घटस्फोट घेतला.

नयनतारा आणि प्रभुदेवा सोबत राहू लागले खरे पण वाद निर्माण होऊ लागले. कालांतराने प्रभुदेवा आणि नयनतारा यांच्यातही गोष्टी बिनसल्या पुढे त्यांच्या लग्नाच्या पण अफवा बाहेर आल्या पण २०१२ मध्ये दोघांनीही एक निवेदन जारी केले आणि त्यात त्यांच्या ब्रेकअपची पुष्टी केली.

नयनतारासाठी वेडा झालेल्या प्रभुदेवाने आपल्या बायको-मुलांसाहित चांगल्या संसाराचा खेळ केला अशी चर्चा त्यावेळी माध्यमांत होती.

 

prabhudeva nayanthara 2

 

पुढे २०२० मध्ये प्रभुदेवाच्या भावाने पुष्टी केली की त्याने पुन्हा एका मुंबईतल्या डॉक्टरशी लग्न केले आहे. हिमानी असे डॉक्टरचे नाव असून २०२० च्या मे महिन्यात त्यांचे लग्न झाले आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?