' KGF; किरकोळ वादंगाचं रूपांतर थेट जीवघेण्या भांडणात झालं आणि...

KGF; किरकोळ वादंगाचं रूपांतर थेट जीवघेण्या भांडणात झालं आणि…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

राम गोपाल वर्मा यांचा बहुचर्चित ‘रंगीला’ सिनेमा हा बऱ्याच गोष्टींसाठी गाजला. त्यातलं ऑड कास्टिंग, रहमानचं संगीत, एकंदरच सिनेसृष्टिची गोष्ट आणि खास रामु टच अशा वेगवेगळ्या कारणांसाठी रंगीला लोकांच्या चांगलाच लक्षात आहे.

या सिनेमातलं आमीरने साकारलेलं मुन्ना हे पात्र लोकांना चांगलंच पसंत पडलं, त्याची ती मुंबईची टपोरी भाषा आणि ते बेअरिंग आमीरने अगदी अचूक पकडलं.

त्याचा तो अतरंगी पिवळ्या रंगाचा सूट घालून हॉटेलमध्ये जाणं, केळ्याच्या गाडीवरून केळं चोरल्यावर “एक केले से तेरा क्या जाता है?” असा खडूस प्रश्न विचारणं आजही लोकांना आवडतं!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

याच सिनेमातला आमीर आणि उर्मिलाचा एक सीन आहे ज्यात ते दोघे सिनेमा बघायला जातात, आणि आमीर समोरच्या सीटवर पाय ठेवतो, पुढे बसलेल्या माणसात आणि आमीरमध्ये सुरुवातीला थोडी बाचाबाची होते, पण नंतर मात्र दोघे मारामारीवर उतरतात. तो सीन तेव्हा आपल्याला खूप हसवतो, पण कधी तुमच्यासोबतसं घडलंय का?

 

rangeela aamir IM

 

नुकताच KGF chapter 2 हा सिनेमा देशभर झळकला असून, सगळीकडेच हा सिनेमा कल्ला करतोय. सगळे शो तुडुंब हाऊसफूल होतायत, कमाईच्या बाबतीत तर हा सिनेमा रेकॉर्ड ब्रेक करतोय, पण कर्नाटकात मात्र या सिनेमाच्या स्क्रीनिंग दरम्यान रंगीलातल्या थिएटर सारखी घटना घडली आहे.

फरक फक्त इतकाच आहे रंगीलामधला मुन्ना तिथून थिएटर सोडून निघून जातो, पण कर्नाटकाच्या थिएटरमध्ये मात्र या घटनेने एक हिंस्त्र वळण घेतलं आहे. नेमकं घडलंय तरी काय? तेच जाणून घेऊयात.

कर्नाटकच्या हवेरी इथल्या एका सिनेमागृहात KGF चा शो सुरू होता. वसंत कुमार नावाची एक व्यक्ति सिनेमा बघण्यासाठी थिएटरमध्ये आली, आणि त्यांनी सिनेमा सुरू असताना पुढच्या सीटवर पाय ठेवला.

 

kgf 2 IM

 

त्यांच्या या पाय ठेवण्यामुळे पुढे बसणाऱ्या माणसाला त्रास होऊ लागला, तसेच यावरून थिएटरमध्ये थोडी बाचाबाचीदेखील झाली, पण वसंत कुमार या व्यक्तिचा उर्मटपणा त्या समोर बसलेल्या व्यक्तीला खटकला होता.

हे सगळं सुरू असतानाच ती समोर बसलेली व्यक्ति थेट उठून थिएटर बाहेर गेली. लोकांना वाटलं की सगळं प्रकरण थंड होईल, पण थोड्याच वेळात ती व्यक्ति पुन्हा थिएटरमध्ये शिरली आणि तेदेखील एका बंदुकीसह!

त्या व्यक्तीने वसंत कुमार यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि तिथून लंपास झाली. थिएटरमधला हा गहजब पाहून लोकांची चांगलीच तारांबळ उडाली. तिथल्या काही लोकांनी पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं, पहिले त्या व्यक्तीने हवेत गोळीबार केला आणि मग दोन गोळ्या वसंत कुमार यांच्या पोटात झाडल्या.

 

karnataka incident IM

 

त्या अनोळख्या व्यक्तिचा तपास सध्या कर्नाटकचे पोलिस करत असून, या दोन्ही व्यक्ति एकमेकांना ओळखत नव्हत्या, त्यांचा काहीही संबंध नसताना केवळ खुर्चीवर पाय ठेवल्याने हे प्रकरण एवढं चिघळलं असल्याने पोलिसांना आश्चर्य वाटणं साहजिक आहे.

मुगली गावातले रहिवासी असणारे वसंत कुमार हे काम संपवून त्यांच्या मित्रांसह सिनेमा बघण्यासाठी आले होते, आणि इथे झालेल्या एका किरकोळ वादामुळे आज  हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

मित्रांनो रंगीला सिनेमातला सीन असो किंवा ही सत्यघटना, यातून आपण २ गोष्टी प्रामुख्याने शिकल्या पाहिजेत. एक म्हणजे कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी इतरांना त्रास होईल अशी वर्तणूक टाळली पाहिजे आणि कितीही झालं तरी स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. नाहीतर या अशा घटना वारंवार आपल्या कानी पडत राहतील!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?