' कोण म्हणतं KGF काल्पनिक आहे? रॉकी आणि या कुख्यात गुंडात आहे हे साम्य

कोण म्हणतं KGF काल्पनिक आहे? रॉकी आणि या कुख्यात गुंडात आहे हे साम्य

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पुष्पा झाला..RRR झाला.. आणि आता पुढचा दक्षिणात्य चित्रपट KGF-2 देशाच्या मनोरंजन क्षेत्राला हाऊसफुलच्या शोज चे स्वप्न दाखवायला आलाय.

KGF चा पहिला भाग सुद्धा उत्तमरीत्या चित्रपटगृहात व लोकांच्या मनात गाजला होता.आता या दुसऱ्या भागाने प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण केली आहे. RRR ज्या प्रमाणे दक्षिणेतील दोन स्वातंत्र्यसैनिकांवर आधारित होती पण KGF कोणाच्या जीवनावर आधारित आहे हा प्रश्न अनेकांना पडला होता!

 

kgf chapter 2 inmarathi

 

त्याचे उत्तर आता मिळाले आहे. चित्रपट काल्पनिक असला तरी ती कथा कोणाची आहे हे मात्र दिग्दर्शक-लेखक जाहीर करत नाहीत. मात्र आज आम्ही तुम्हाला खऱ्या KGF बद्दल सांगणार आहोत.

ही कथा आधारित आहे एका ‘राउडी थंगम’वर..एक दरोडेखोर जो ९० च्या दशकात सक्रिय होता. तसे पाहता दिग्दर्शक प्रशांत नीलने चित्रपट थंगमवर आधारित असल्याचे नाकारले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

नुकतेच थंगमची आई पौली यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनास स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली कारण त्यांचे असे म्हणणे होते की पहिल्या चित्रपटातही थंगमच्या बाबतीत सकारात्मक असे काहीही दाखवले नाही, मात्र दिग्दर्शकाने हे सर्व फेटाळून लावले आहे.

याआधी थंगमच्या जीवनावर आधारित कोलारा नावाचा चित्रपट येऊन गेलाय पण आता KGF मधील रॉकीमध्ये आणि ज्युनिअर विरप्पनमध्ये काय आहे साम्य? चला पाहुयात!

 

rowdy thangam IM

थंगम रावडी कोण होता?

नव्वदच्या काळात कुख्यात असलेला थंगम सोने लुटीचे काम करत असे. कोलारमधूनच तो आणि त्याची गँग सोने लुटीचे काम करायची. थंगम त्या काळी ज्युनिअर वीरप्पन नावानेदेखील ओळखला जायचा.

एका वृत्तपत्राने १९९७ ला एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की २५ वर्षीय थंगम टाटा सुमोतून सोन्याची चोरी करायचा आणि तेसुद्धा दिवसाढवळ्या.

त्याकाळी फक्त चार वर्षांत त्याच्या नावावर ४२ गुन्हे दाखल करण्यात आले पण या थंगमला स्थानिक लोकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा होता कारण तो त्याच्या लुटीतला काही भाग गरिबांमध्ये वाटत असे.

अखेर १९९७ मध्ये पोलिसांच्या एनकाउन्टरमध्ये थंगम मारला गेला.

 

encounter IM

थंगम आणि रॉकी यांच्या आयुष्यातील आईचे स्थान :

थंगम आणि रॉकी दोघांच्या आयुष्यात आईचे स्थान खूप महत्वाचे होते. अनेक जण तर थंगमच्या गॅंगला ‘पॉली गॅंग’ असंच म्हणत असत कारण त्याच्या आईचे नाव पॉली होते.

केजीएफमध्येदेखील रॉकीच्या आईचं तो लहान असतानाचं निधन होतं असं दाखवलं गेलं आहे आणि ती त्याच्याकडून जगातला सर्वांत शक्तिशाली व्यक्ती होण्याचं वचन घेते. त्यामुळे दोघांच्या आयुष्यात हे साम्य मोठ्या प्रमाणावर दिसून येते.

 

rowdy thangam and his mom IM

रॉबिनहूड इमेज आणि लोकांचा प्रचंड पाठिंबा :

थंगम आणि रॉकी दोघेही सोने लुटीचे म्हणजे चोरीचे काम करतात मात्र दोघेही लुटलेल्या संपत्ती पैकी बरीचशी रक्कम स्थानिक गरीब लोकांमध्ये वाटून देतात. त्यामुळे त्या लोकांना त्यांच्याप्रति प्रचंड प्रेम आणि आदर होता.

पोलीस किंवा कोणतीही अडचण आली तर स्थानिक लोक चित्रपटातील रॉकीच्या मागे उभे राहतात तसे थंगमसाठीही काहीही करायला तयार होते.

 

kgf rocky IM

 

थोडक्यात काय तर दिग्दर्शक लेखकाने जरी हा सिनेमा आणि थंगममधलं साम्य नाकारलं असलं, तरी लोकांनी मात्र ते अचूक हेरलं आहे, आणि जेव्हा एखादा सिनेमा बनतो तेव्हा त्यात किती लिबर्टी घ्यायची हा निर्णय सर्वस्वी लेखक दिग्दर्शकाचा असतो आणि त्यामुळेच लोकांना तो भावतो!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?