' IPO – गुंतवणूकदारांना यातून फायदा होतो का? नीरज बोरगांवकर करतायत शंकांचं निरसन – InMarathi

IPO – गुंतवणूकदारांना यातून फायदा होतो का? नीरज बोरगांवकर करतायत शंकांचं निरसन

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मध्यमवर्गीय माणसं ही नेहमीच रिस्क घ्यायला कचरतात, कारण रिस्क घेतली तर पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची त्यांना भीती असते. त्यामुळे अजूनही बरीचशी लोकं शेयर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला फारसे उत्सुक नसतात, पण आता हे चित्र काहीसं बदलताना आपल्याला दिसतंय.

नीरज बोरगांवकर यांच्यासारखे या क्षेत्रातले तज्ञ कित्येक वर्षे या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि सामान्य माणसांच्या मनातली हीच भीती घालवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.

नीरज हे त्यांच्या ‘गुंतवणूक कट्टा’ या उपक्रमाच्या माध्यमातून सामान्य लोकांना शेयर मार्केटमधल्या गुंतवणुकीविषयी माहिती देत असतात, शिवाय ते त्यांच्या खास पोर्टफोलियो बिल्डर प्लॅनमधून लोकांना याविषयातली खोलवर माहिती आणि त्याचा अभ्यास कसा करायचा याचं प्रशिक्षण देत असतात.

 

neeraj borgaonkar 2 IM

 

सध्या LIC च्या IPO ची सगळीकडेच चर्चा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला हा ipo येणार होता, पण रशिया यक्रेनमधल्या युद्धामुळे आणि एकंदरच मार्केटमधल्या अस्थिरतेमुळे तो पुन्हा लांबणीवर पडला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आजच्या लेखातून नीरज बोरगांवकर याच IPO च्या कॉन्सेप्टबाबत तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत. IPO म्हणजे काय? सामान्य लोकं त्यासाठी कसा अर्ज करू शकतात? ipo घ्यावा का? त्यात किती रिस्क आहे? हे सगळं आज आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत!

IPO म्हणजे ‘इनिशीयल पब्लिक ऑफरिंग’ हे खाजगी कंपन्यांचे शेअर्स (समभाग) हे लोकांपर्यंत स्टॉक मार्केट मार्फत पोहोचवणे असं म्हणता येईल.

 

ipo inmarathi

 

लोकांपर्यंत कंपनीचे शेअर्स पोहोचवण्याचा मूळ उद्देश हा कंपनी साठी पैसे उभे करणे हा असतो.

कोणत्याही कंपनी ला IPO बाजारात आणण्यासाठी सिक्युरिटीज आणि एक्सचेंज कमिशन (SEC) च्या काही नियम व अटींची पूर्तता करावी लागते तेव्हाच ती कंपनी IPO लाँच करू शकते.

IPO लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘प्रायमरी मार्केट’ म्हणजेच सर्वात प्रथम जिथे तुम्ही कंपनीचे शेअर्स विकू शकतात त्या कॅपिटल मार्केटच्या प्रकाराचा आधार घ्यावा लागतो. ते कसं करायचं?

हे सांगायला आपण आर्थिक सल्लागार व्यक्तींची मदत घेऊ शकता. एखाद्या कंपनीचा IPO लाँच झाला म्हणजे ती कंपनी नफ्यात आहे की तोट्यात? मालकी हक्क पूर्ण बदलेल का? याचं नेमकं उत्तर सांगणं कठीण आहे.

पण, IPO ही कंपनीच्या आर्थिक अडचणीचं लक्षण हे नक्की म्हणता येईल. कारण, प्रत्येक कंपनीचे IPO घेऊन येण्याचे कारणं वेगळे असतात.

उदाहरण सांगायचं तर, रिलायन्स कंपनी जेव्हा IPO घेऊन येते तेव्हा त्याचं कारण मार्केट मधूनच पैसा उभा करणे हे असू शकतं. तेच जेव्हा LIC सारखी कंपनी IPO घेऊन येते तेव्हा त्याचं कारण हे खासगीकरणाकडे वाटचाल असं म्हणता येईल.

 

LIC ipo inmarathi

 

कोणत्याही कंपनीचा जोपर्यंत IPO येत नाही तोपर्यंत ती कंपनी ही मालकी हक्क असलेली समजली जाते. कंपनीची आजवरची वाढ ही केवळ स्वगुंतवणूक किंवा फायनान्सर यांच्या मार्फत झालेली असते.

आता त्यामध्ये सामान्य माणूस सुद्धा भर घालणार असतो असं सोप्या भाषेत सांगता येईल. आपल्या गुंतवणूकदारांचा फायदा करून देणे ही त्यानंतर कंपनी ची एक महत्वाची जबाबदारी असते.

कोणती कंपनी IPO लाँच करू शकते?

कोणतीही अशी कंपनी ज्या कंपनीची मालमत्ता ही १०० करोड यु एस डॉलर्स इतकी आहे ज्याला की ‘युनिकॉर्न स्टेटस’ असं म्हणतात.

पण, काही कंपनी अश्या पण असतात की ज्यांचा निव्वळ नफा हा त्यांच्या स्पर्धेतील कंपनीपेक्षा नेहमी वाढतच गेला आहे आणि ज्या की, सेक्युरिटी आणि एक्सचेंज कमिशन (SEC) च्या कागदपत्रांची पूर्तता करू शकतात त्या सर्व कंपनी IPO लाँच करू शकतात.

IPO लाँच करण्याचे कंपनी ला नेमके कोणते फायदे आहेत?

‘पैसा उभा करणे’ हा मूळ फायदा म्हणता येईल ज्यामुळे कंपनी त्यांचे रखडलेले प्रोजेक्ट्स पूर्ण करू शकते.

 

money inmarathi

 

जेव्हा कंपनी चा IPO बाजारात येतो आणि शेअर्स मध्ये गुंतवणुकीच्या ते पात्र बनतात तेव्हा एकंदरीत लोकांमध्ये त्यांच्या बद्दल विश्वास, ओळख वाढते आणि त्यामुळे कंपनीचे थकीत पैसे सुद्धा वसूल करायला कंपनीला मदत होत असते.

IPO ची किंमत कोण ठरवतं?

कंपनी काही बँकांशी, अर्थसंस्थांशी संपर्क साधते. या संस्था कंपनीचं एक ऑडिट करतात ज्यामध्ये त्यांचा स्थापनेपासून आजवरचा पूर्ण ट्रॅक रेकॉर्ड चेक केला जातो.

या प्रक्रियेला ‘ड्यु डिलीजन्स’ असं म्हणतात. यावरून कंपनीच्या मालमत्तेची आणि समभाग (शेअर्स) ची किंमत ठरवली जाते.

IPO चा आपल्याला काय फायदा आहे?

ज्या लोकांनी IPO लाँच करणाऱ्या कंपनीचे शेअर्स आधी विकत घेतले आहेत त्यांना ही वेळ म्हणजे नफा कमावण्याची वेळ असते.

जे लोक कंपनीत आधीपासून समभाग बाळगून आहेत ते IPO लाँच झाल्यानंतर त्यातील काही शेअर्स जास्त किमतीत विकून त्या कंपनीबद्दल मार्केट मध्ये झालेल्या चर्चेचा फायदा घेऊ शकतात.

कोणत्याही कंपनी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी IPO ही सर्वात योग्य वेळ मानली जाते.

IPO ची सुरुवात कधी, कुठून झाली?

‘डच ईस्ट इंडिया कंपनीने’ सर्वात पहिल्यांदा IPO लाँच केल्याची नोंद आहे. लोकांचा आपल्या व्यवसायात सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणारी ही पहिली कंपनी होती.

 

dutch inmarathi

 

IPO चा सर्वात फायदा झाला तो डॉट कॉम कंपनी आहेत त्यांना आणि ज्या कंपनी स्टार्टअप आहेत त्यांना. २००८ हे वर्ष सर्वात कमी IPO लाँच होणारं होतं.

आजच्या इतकं तेव्हा प्रत्येक IPO ची बातमी होत नव्हती इतकाच काय तो फरक.

IPO चं यश कशात आहे?

दोन पद्धतीद्वारे IPO लोकांपर्यंत पोहोचत असतो. पहिली – त्याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करणे आणि दुसरं – प्रत्यक्ष IPO चं वितरण करणे.

हे करण्यासाठी कंपनीला आधी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स नेमावे लागतात. त्यानंतर IPO ची मुदत ठरवली जाते आणि मग IPO हा स्टॉक मार्केट मध्ये लिस्ट केला जातो.

 

IPO 3 inmarathi

 

ज्या कंपनी आधीपासूनच खासगी मालमत्तेच्या नाहीयेत त्यांना IPO चा फायदा जास्त होऊ शकतो असं अर्थतज्ञ सांगतात. कारण, या कंपन्यांनी लोकांचा विश्वास आधीच जिंकलेला असतो. खासगी कंपनीबद्दल नेहमीच मतमतांतरे पहायला मिळतात.

खासगी कंपनीला एक अजून त्रास वाटू शकतो की त्यांना आजपर्यंत कधीच न जाहीर केलेली सर्व माहिती IPO च्या वेळेस जाहीर करावी लागते.

ही माहिती कधी कधी त्यांच्या स्पर्धकांना कळते आणि त्यांच्या व्यवसायात तसे आवश्यक बदल करून घेतात, म्हणजे तुम्हीच तुमच्या स्पर्धकांना प्रशिक्षण देण्याची ही शक्यता आहे.

आर्थिक अडचणीत असलेल्या कंपनीला IPO ला पर्याय म्हणजे डायरेक्ट शेअर्सची स्टॉक मार्केट मध्ये लिस्टिंग करणे. त्यामध्ये कमी किंमत येण्याचा धोका असतो. पण, इतर मार्केटिंगचा खर्च कंपनी वाचवू शकते.

काही वेळेस डायरेक्ट लिस्टिंगचा फायदा सुद्धा होतो आणि कंपनीला अपेक्षेपेक्षा चांगली रक्कम सुद्धा मिळू शकते. ज्या कंपनीचा ब्रँड तयार झाला आहे त्या कंपनी हा मार्ग अवलंबत असतात.

काही यशस्वी IPO ची नावं सांगायची तर फेसबुक (२०१२), जनरल मोटर्स (२०१०), व्हिसा (२००८) हे प्रामुख्याने सांगता येतील.

 

facebook inmarathi 2

 

कोणत्या कंपनीचा IPO विकत घ्यावा हे सांगण्यासाठी कंपनीचा आजवरचा ट्रॅक रेकॉर्ड तपासून मग निर्णय घ्यावा आणि जर नुकसान झालं तर आपण ते किती प्रमाणात सहन करू शकतो हे तपासूनच निर्णय घ्यावा असं चार्टर्ड अकाउंटंट नेहमीच सांगत असतात.

आपले अतिरिक्त पैसे योग्य ठिकाणी गुंतवण्यासाठी आपण IPO सारखे पर्याय नक्कीच निवडू शकतो. हे करत असताना फक्त आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा.

जसं कोणतंही औषध घेण्याआधी डॉक्टर चा सल्ला घ्यावा तसंच तुमच्या आर्थिक आरोग्यासाठी सुद्धा योग्य ज्ञान घेऊनच पुढे जाण्यात शहाणपण आहे.

शेअर मार्केटमध्ये व म्युच्युअल फंडांमध्ये यशस्वी काम करणे अतिशय सोपे आहे. हे करण्यासाठी असंख्य वेगवेगळ्या पद्धती व स्ट्रॅटेजीज्‌ असतात. आपल्याला जर शेअर बाजारामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपण या पद्धती व्यवस्थित शिकून घेतल्या पाहिजेत.

“गुंतवणूक कट्टा” या उपक्रमाद्वारे तुम्हाला अश्या विविध पद्धती शिकण्याची संधी मिळते. गुंतवणूक कट्ट्याबद्दल अधिक माहिती नियमितरित्या मिळवण्यासाठी आपला Neeraj Borgaonkar हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करुन ठेवा

नीरज बोरगांवकर युट्यूब चॅनलची लिंक – https://marathimarket.in/youtube

 

neeraj borgaonkar IM

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?