' २१ व्या शतकातही नॉस्ट्रडॅमसच्या भविष्यवाण्या आधीप्रमाणेच खऱ्या ठरणार का?

२१ व्या शतकातही नॉस्ट्रडॅमसच्या भविष्यवाण्या आधीप्रमाणेच खऱ्या ठरणार का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भविष्यवाणी म्हणजे काय तर एखादी गोष्ट होण्यापूर्वीच त्याचं भाकीत सांगणं.

देवादिकांच्या कथांमध्ये अशा भविष्यवाण्या आपण अनेकवेळा ऐकल्याच आहेत. उदा. कृष्ण कंसाचा वध करणार ही भविष्यवाणी! अशा या भविष्यवाण्यांबद्दल एक गोष्ट म्हणजे भविष्यवाणीबद्दल जे सांगितलंय ते होणारच.

आपण आता ज्या युगात वावरतो, त्या युगामध्ये भविष्यवाणीसारख्या तर्कहीन गोष्टींवर सहसा कोणाचा विश्वास बसणार नाही. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, जो पाश्चात्य देशांमध्ये फारच प्रसिद्ध आहे. फारच कमी भारतीयांना त्याबद्दल ठाऊक आहे.

या मनुष्याने देखील अनेक भविष्यवाण्या करून ठेवल्या होत्या आणि मुख्य म्हणजे त्यापैकी अनेक तंतोतंत खऱ्या ठरल्या.

त्या व्यक्तीचे नाव म्हणजे – फ्रांसचा महान भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमस!

 

nostradamus-marathipizza01

 

एखाद्याच्या अंगात अलौकिक शक्ती असल्याशिवाय त्याला भविष्यात काय घडणार आहे ते कळूच शकत नाही असे मत अनेकांनी नॉस्ट्रॅडॅमस बद्दल मांडलं आहे. त्यामुळेच त्याच्याबद्दल अनेक अफवा देखील प्रचलित आहेत.

पण त्याच्याजवळ असा कोणता फॉर्म्युला होता ज्याचा वापर करून त्याने भविष्यातील घटना आधीच लिहून ठेवल्या होता हे मात्र एकालाही न उलगडलेलं कोडं आहे.

१५ व्या शतकात या मनुष्याने जेवढ्या भविष्यवाण्या केल्या होत्या त्यापैकी तब्बल १० भविष्यवाण्या तंतोतंत खऱ्या ठरल्या हे विशेष!

१४ डिसेंबर १५०३ रोजी फ्रान्सच्या लहानग्या सेंट रेमी गावात नॉस्ट्रॅडॅमसचा जन्म झाला. लहानपणापासूनच नॉस्ट्रॅडॅमसला भविष्यवाणी करण्याची सवय होती असं ऐकिवात आहे. पण त्याला ज्या घटनेमुळे भविष्यकार म्हणून ओळख मिळाली ती अशी-

इटलीच्या रस्त्यावर भटकत असताना एका तरूणाला पाहून नॉस्ट्रॅडॅमसने त्याला मुजरा केला. नॉस्ट्रॅडॅमसच्या मित्राने त्याला विचारले हा काय प्रकार आहे. तेव्हा नॉस्ट्रॅडॅमस म्हणाला हा भविष्यात ‘पोप’ होणार आहे. काही वर्षांतच १५८५ मध्ये ती व्यक्ती पोप म्हणून विराजमान झाली.

तापमानवाढ, भूकंप आणि ज्वालामुखीचा उद्रेक यासह हिमवृष्टीचेही भाकीत नॉस्ट्रॅडॅमसने ‘द प्रोफेसीज’ या आपल्या जगप्रसिद्ध ग्रंथात नोंदवून ठेवले होते. १५५० मध्ये नॉस्ट्रॅडॅमसने स्वत:चे पंचाग काढायला सुरूवात केली.

यामध्ये ग्रहांची स्थिती, हवामान आणि पिक पद्धतीवर अंदाज वर्तवण्यास त्याने सुरुवात केली. त्यापैकी बहुतांश अंदाज खरे ठरले. त्यामुळे नॉस्ट्रॅडॅमसबद्दल लोकांमध्ये विश्वास निर्माण होऊ लागला. मुख्य गोष्ट म्हणजे स्वत:च्या मृत्यूबाबत केलेली त्याची भविष्यवाणीही खरी ठरली.

नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी त्याने रचलेल्या कविता आणि सांकेतिक भाषेत आहे.

The princes and lords are held captive in prisons
In the future by such headless idiots
These will be taken as divine utterances.

Before the war comes,
The great wall will fall,
The King will be executed, his death coming too soon will be lamented.
(The guards) will swim in blood,
Near the River Seine the soil will be bloodied.

 

nostradamus-marathipizza02

 

या कवितेमध्ये नॉस्ट्रॅडॅमसने केलेलं फ्रेंच राज्यक्रांतीचं तंतोतंत भाकीत आढळून येतं.

१७८९-९९ मध्ये यूरोपच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना म्‍हणून फ्रेंच राज्यक्रांती ओळखली जाते. सरंजामशाहीला कंटाळून फ्रेंचमधील सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली आणि तिने सत्ता परिर्वतन केल्यामुळे या क्रांतीला फ्रेंच क्रांती म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

To swim in praise,
the great one to flee to the confluence.
He will refuse entry to the Piuses,
The depraved ones and the Durance will keep them imprisoned.

 

nostradamus-marathipizza03

 

फ्रान्सच्या इतिहासातील आणखी एक मोठी घटना म्हणजे नेपोलियनचा बंदिवास होय. नॉस्ट्रडॅमस याने या कवितेमध्ये नेपोलियनला बंदी बनवलं जाईल अशी भविष्यवाणी केली आहे. जी पुढे खरी ठरली.

A young child will be born of poor people,
He who by his tongue will seduce a great troop;
His fame will increase towards the realm of the East.
Beasts ferocious from hunger will swim across rivers:
The greater one will cause it to be dragged in an iron cage
When the Germany child will observe nothing.

 

nostradamus-marathipizza04

 

ही कविता नॉस्ट्रॅडॅमसने जणू खास हिटलरला डोळ्यासमोर ठेवून लिहिली होती का असा प्रश्न पडावा,  इतकी यामध्ये सत्यता आहे आणि पुढे जर्मनीच्या राजकारणात काय घडलं हे तुम्हाला वेगळ्याने सांगायची गरज नाही.

The blood of the just will commit a fault at London,
burnt through lighting of twenty threes the six:
The ancient lady will fall from her high place,
several of the same sect will be killed.

 

nostradamus-marathipizza05

 

ही कविता नॉस्ट्रॅडॅमस यांनी लिहिलेली आहे. या कवितेची प्रचिती २ डिसेंबर १९६६ मध्ये थॉमस फॅरिनरच्या बेकरीला आग लागली. या आगीमुळे ८०००० हजार लोक बेघर झाले होते.

 

There will be two scourges the like of which was never seen,
famine within plague, people put out by steel,
crying to the great immortal God for relief.

 

nostradamus-marathipizza06

 

जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर झालेला अणुबॉम्ब हल्ला याचा उल्लेख देखील नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणीत आढळतो.

An evil deed foretold by the bearer of a petition.
Another falls at night time.
Conflict at Reins, London and a pestilence in Tuscany.

 

nostradamus-marathipizza07

 

अमेरिकेचे ३५ वे राष्‍ट्रपती जॉन एफ कॅनेडी आणि त्यांच्या भावाच्या मृत्यूचे भाकीत जे नॉस्ट्रॅडॅमसने या कवितेद्वारे सांगितले होते, तेही खरे ठरले. या घटनेमुळे जगभर खळबळ उडाली होती.

Will cause trembling around the new city:
Two great rocks will make war for a long time.
Then Arethusa will redden a new river.
“In the year 1999, in the seventh month,
from the sky will come the great King of Terror,
bringing back to life the great King of the Mongols.
Before and after, Mars to reign by good fortune.

 

nostradamus-marathipizza08

 

या कवितेमधून नॉस्ट्रॅडॅमसने जणू जागतिक इतिहासातील अमेरिकेवरील सर्वात मोठ्या वर्ल्ड ट्रेंड सेंटवरील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याबाबत धोक्याची सूचना होती असं म्हटलं तर वावगं ठरू नये.

 

Will take Diana [Thursday] for his day and rest:
He will wander because of a frantic head,
And delivering a great people from subjection.

 

nostradamus-marathipizza09

 

नॉस्ट्रॅडॅमसने वर्तवलेलं हे भाकीत १९९७ मध्ये राजकुमारी डायनाच्या कार अपघाताशी मिळतेजुळतं ठरलं.

एवढंच नाही, तर १९३९-१९४५ या काळात जगाला हादरवून सोडणा-या दुस-या महायुद्धाची भविष्यवाणी नॉस्ट्रॅडॅमसने आधीच करून ठेवली होती, असं सांगितलं जातं. या युद्धात पाच ते सात कोटी लोक मारले गेले होते.

 

The false trumpet concealing madness
will cause Byzantium to change its laws.
From Egypt there will go forth a man who wants
the edict withdrawn, changing money and standards.

The republic of the great city
Will not want to consent to the great severity:
King summoned by trumpet to go out,
The ladder at the wall, the city will repent.

The republic of the great city
Will not want to consent to the great severity:
King summoned by trumpet to go out,
The ladder at the wall, the city will repent.

 

nostradamus-marathipizza00

 

नॉस्ट्रॅडॅमसची सदर कविता म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयीची भविष्यवाणी असल्याचं सांगण्यात येत आहे. या कवितेमध्ये नॉस्ट्रॅडॅमस असं भाकीत करतोय की ट्रम्प यांच्या काळात अमेरिकेमध्ये खूप उलथापालथ होणार असून त्याचे जगावर देखील परिणाम होणार आहेत.

ट्रम्प यांच्या कारकिर्दीत नियमांमध्ये झालेले बदल, इतर देशांमधील तिथे राहणाऱ्या नागरिकांवर त्याचा झालेला परिणाम, या गोष्टी आपण पाहिल्या आहेतच.

ट्रम्पच्या कार्यकाळात अमेरिकेच्या अनेक धोरणांमध्ये बदल झाले आहेत. ही चार वर्षे नाट्यमय ठरली आहेत.

जो बायडन यांचा विजय ट्रम्प यांच्या फारच जिव्हारी लागल्याचं पाहायला मिळतंय. अजूनही त्यांनी हार मान्य केलेली नाही, हे आपण गेले काही दिवस पाहत आहोत.

२ राज्यांचा निकाल यायचा बाकी आहे, तर अनेक ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प यांनी कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळेच, त्यांनी त्यांचा पराभव मान्य केलेला नाही, ही गोष्ट तर स्पष्ट आहे.

काही लोकांनी अगदी विचित्र दावा केला आहे की नॉस्ट्रॅडॅमसने सध्या सुरु असलेल्या करोना व्हायरसमुळे चाललेल्या आपत्तीचा अंदाजदेखील लावला होता.

कोरोना व्हायरसचा प्रभाव त्यामुळे अस्तित्वात आलेला कोविड-१९ हा नवा आजार आता आपल्यासाठी नवीन राहिलेला नाही. ही खरंतर जागतिक महामारीच आहे. अनेक लोकांचे प्राण या आजारामुळे गेले आहेत. कोरोना अजूनही जगभर थैमान घालत आहे.

एका व्यक्तीने स्पॅनिश भाषेत असं ट्विट केलं आहे की: “२१ व्या शतकाची पीडा आली आहे. ही नॉस्ट्रॅडॅमसची भविष्यवाणी! आम्ही लवकरच मरणार. #कोरोनाव्हायरस “.

अशा या नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाण्या, ज्यांनी संपूर्ण जगाला आश्चर्यचकित करून सोडले आहे. “ट्रम्प”, “२१व्या शतकातील प्लेग”ची भविष्यवाणी आणखी किती प्रमाणात खरी ठरते ते येणारा काळच सांगेल.

आपण मात्र जगाकडे एक विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगून जगणे कधीही अधिक योग्य राहील. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात भविष्यातील अनिश्चितता राहणारच आहे, परंतु कोणत्याही गोष्टीची अतिप्रमाणात चिंता, विचार करण्याऐवजी आलेला दिवस आपले कर्तव्य करून आणि आपल्या आप्तस्वकीय लोकांसोबत आनंदाने घालवावा…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “२१ व्या शतकातही नॉस्ट्रडॅमसच्या भविष्यवाण्या आधीप्रमाणेच खऱ्या ठरणार का?

 • July 2, 2017 at 4:57 pm
  Permalink

  modinbaddal pn kahitari lihl hot na

  Reply
 • May 10, 2018 at 12:30 pm
  Permalink

  Nostrdemus ne ek bhavishya kele hote.
  Ki sampurn jag eka chatrakhali yeil aani tyanche netrutva Bharat Karel.

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?