' 'अयोध्याच' नव्हे तर हिंदूंसाठी पवित्र असलेल्या 'या' धार्मिक स्थळांना नक्की भेट द्या

‘अयोध्याच’ नव्हे तर हिंदूंसाठी पवित्र असलेल्या ‘या’ धार्मिक स्थळांना नक्की भेट द्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारताच्या उत्तरेकडील प्रमुख राज्य असलेले उत्तर प्रदेश हे राज्य भारताच्या व्यापक इतिहासाचा महत्वाचा भाग आहे. विविध भाषा, वेशभूषा, व सर्व धार्मिक स्थळांचे मर्मस्थान असलेले हे राज्य ब्रिटिश राजवटीत १ एप्रिल १९३७ रोजी स्थापन झाले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हिंदूंची जवळजवळ सर्व धार्मिक आणि तीर्थक्षेत्रे स्थापित आहेत. चला तर शब्द सफरीची मजा घेत जाणून घेऊया उत्तर प्रदेशातील मोठी, धार्मिक आणि निसर्गरम्यठिकाणे. तसेच अनेक वर्षांपासून अयोध्या, राम जन्मभूमी हा वाद सुरु आहेच.

 

ayodhya inmarathi

 

महाराष्ट्रातील राजकीय मंडळीदेखील काही दिवसात अयोध्येचा दौरा करणार अशी चर्चा सुरु आहे, मात्र हिंदू भाविकांसाठी याबरोबरीने आणखीन काही पवित्र ठिकाणांबद्दलची माहिती आजच्या लेखात जाणून घेणार आहोत…

काशी:

असे म्हणतात की काशी स्थळी मरण आले तर जन्म मरणाच्या फेर्‍यामधून सुटका होऊन मोक्ष प्राप्ती होते.भारताची भारताची आध्यात्मिक राजधानी असलेल्या काशी शहरामधे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक विश्वनाथ यांचे ज्योतिर्लिंग आहे. पुरीत जगन्नाथ आणि काशीत विश्वनाथ आहे. काशीला बनारस आणि वाराणसी असेही म्हणतात.

 

Varanasi Uttar Pradesh InMarathi

 

शिव आणि कालभैरवाची अप्रतिम असलेली ही नगरी सप्तपुरींमध्ये समाविष्ट झाली आहे. ‘वरुणा’ आणि ‘असी’ या दोन नद्यांच्या मध्ये वसलेले असल्याने याला ‘वाराणसी’ असे नाव पडले. गंगेच्या काठावर वसलेले हे शहर घाट आणि संस्कृतीसाठी प्रसिद्ध असून इथे पाहण्यासारखे खूप काही आहे.

बौद्धांसाठीही महत्त्वाचे ठिकाण असलेले हे दिव्य शहर आहे जिथे गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश केला, जो भाग आता सारनाथमध्ये आहे.

वृंदावन :

यमुनेच्या काठावर वसलेले सर्वात प्राचीन शहर म्हणजे वृंदावन. वृंदावनाच्या कणा कणात श्री कृष्ण यांचा वास आहे असे म्हंटले जाते. राधिकेचा ध्यास आणि वृंदावन वासीयांचा कान्हा असलेल्या श्रीकृष्णाची लीला ही भूमी आहे.

 

vrindavan im

 

येथे बांके बिहारीजींच्या मंदिरासोबत च रंगनाथ मंदिर, केशी घाटी, मदनमोहन मंदिर, गोविंद देव मंदिर, श्री राधाबिहारी आस्था सखी मंदिर, निधीवन, प्रेम मंदिर, हरे रामा हरे कृष्ण मंदिर, इस्कॉन मंदिर, पागल बाबा मंदिर इत्यादी अनेक प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरे आहेत. इथला चैतन्यमय परिसर भगवान कृष्णाच्या खोडकर परंतु प्रेमळ स्वभावाचे उत्तम प्रकारे सादरीकरण करतो.

मथुरा :

यमुना नदीच्या काठावर वसलेले हे शहर भगवान श्री कृष्णाचे जन्मस्थान म्हणून खूप लोकप्रिय आहे आणि ज्या तुरुंगात त्यांचा जन्म झाला होता ते आता पर्यटकांना पाहण्यासाठी प्रदर्शनात आहे.हे भारतातील अयोध्या, मथुरा, हरिद्वार, काशी, कांची, अवंतिका आणि द्वारका या सात प्राचीन शहरांपैकी एक आहे.

उत्तर प्रदेश राज्यात मथुरा आणि वृंदावन ही एकमेकांपासून फक्त १०किमी अंतरावर स्थित असल्याने अनेकदा जुळी शहरे मानली जातात.

 

mathura im

 

ऑगस्ट/सप्टेंबरमध्ये जन्माष्टमी (भगवान कृष्णाचा वाढदिवस) आणि फेब्रुवारी/मार्चमध्ये होळी या दोन मुख्य सणांमध्ये मथुरा पर्यटक आणि यात्रेकरूंनी फुलून जाते. द्वारकाधीश मंदिर आणि गीता मंदिर हे देखील मथुरेतील आकर्षणांपैकी एक आहे.

मथुरेला असलेला इतिहास तुम्हाला जुन्या काळातील वास्तुकला, त्यांचे अवशेष आणि तुम्हाला मथुरेची माहिती देण्यासाठी उत्सुक असलेल्या स्थानिक लोकांच्या दिलदारपणा या गोष्टींची अनुभूती घेऊनच अनुभवता येईल.

प्रयाग :

गंगा काठी असलेल्या सर्व तीर्थक्षेत्रांपैकी सर्वोत्तम क्षेत्र म्हणजे प्रयागराज. आहे.अलाहाबाद हे त्याचे प्राचीन नाव आहे . इथे गंगा आणि यमुना यांचा संगम असून सरस्वती इथे अदृश्य मानली जाते. असे म्हंटले जाते की या क्षेत्री अमृताचे थेंब पडले होते म्हणूनच या त्रिवेणीच्या ठिकाणी महा कुंभ मेळा एक धार्मिक सोहळा जो दर बारा वर्षांनी आयोजित केला जातो इथे भरतो.

जगभरातून लाखो यात्रेकरू यात सहभागी होतात.सर्व संतांचे मठ आणि आश्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रजापिता ब्रह्मदेवाने दशाश्वमेध यज्ञ या ठिकाणी केला असे मानले जाते.

 

kumbhmela inmarathi

अयोध्या :

उत्तर प्रदेशातील शरयू नदीच्या काठावर वसलेले अयोध्या हे हिंदूंसाठी सात पवित्र शहरांपैकी एक आहे.जिथे भगवान श्री राम यांचा जन्म झाला. प्राचीन काळी अयोध्या ही कोसल प्रदेशातील अवधची राजधानी होती, म्हणून तिला ‘अवधपुरी’ असेही म्हणतात.

अयोध्येचे वर्णन अथर्ववेदात ‘देवाची नगरी’ असे केले आहे.हे धार्मिक शहर जैन धर्माच्या २४तीर्थंकरांपैकी चार (धार्मिक शिक्षक) यांचे जन्मस्थान देखील आहे, १९९२च्या बाबरी मशीद प्रकरणी अयोध्या हे ठिकाण चांगलेच गाजले आहे. रामजन्मभूमी मंदिरावर कथितरित्या बांधलेली मशीद हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील वादाचा मुद्दा बनली.

 

ayodhya inmarathi
opindia.com

नैमिषारण्य :

पुराणात बरीच चर्चा गोमती नदीच्या काठी वसलेल्या नैमिषारण्य या भागाची आहे. हिंदू धर्माचे प्राचीन आणि पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या या अतिशय सुंदर शहरात ललिता देवी मंदिर, पांडव किल्ला आणि गोमती नदीचे घाट पाहणे मनाला एक शांतता देऊन जाते. लखनौ शहरापासून हे जवळ आहे.

 

naim im

 

सारनाथ :

बौद्ध धर्मासाठी खूप महत्त्वाचं ठिकाण असलेल्या सारनाथ या प्राचीन ठिकाणचे एक आध्यात्मिक महत्व आहे. आहे. वाराणसी शहरापासून सुमारे १० किमी अंतरावर पूर्व दिशेला असलेल्या सारनाथ या ठिकाणीच ज्ञानप्राप्तीनंतर भगवान बुद्धांनी पहिला उपदेश केला असे मानले जाते.

बौद्ध धर्माव्यतिरिक्त, सारनाथमध्ये हिंदू आणि जैन धर्माच्या दरम्यान अनेक मोठी मंदिरे आहेत जी कधीकाळी नष्ट झाली होती सारनाथच्या आध्यात्मिक महत्त्वाला हातभार लावणाऱ्या काही आकर्षणांची नावे म्हणजे अशोक स्तंभ, सम्राट अशोकाने बांधलेला धर्म स्तूप आणि बरेच काही आहे.

 

sarnath im

 

देवगड:

उत्तर प्रदेशातील सध्याच्या ललितपूर जिल्ह्यात देवगड हे एक जैन धार्मिक स्थळ आहे.३१ प्राचीन जैन मंदिरे असलेले हे शहर भारतीय इतिहासातील अनेक चांगल्या वाईट घटनांचे साक्षीदार आहे. देवगड हे दशावतार मंदिरासाठीही प्रसिद्ध असून हे मंदिर म्हणजे गुप्त कलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे असे विद्वान म्हणतात.

 

devgad im 1

 

चित्रकूट :

उत्तर प्रदेशातील चित्रकूट आणि मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यांमध्ये उत्तर विंध्यन पर्वतरांगेत वसलेले एक छोटेखानी शहर म्हणजे चित्रकूट. हिंदू पौराणिक कथा आणि महाकाव्य रामायणानुसार असे म्हंटले जाते की हे तेच ठिकाण आहे जिथे राम, आपले बंधु लक्ष्मण आणि पत्नी देवी सीता यांच्यासोबत वनवासास निघाले असता वास्तव्यास होते आणि येथेच राम व भरत भेटीचा तो अद्भुत मिलाप घडला होता.

 

chitrakoot im

 

ज्यात भारताने रामाला पुन्हा राज्यात वापस येण्याची विनंती केली परतू राम राया ने नकार दिला असता बंधु भरत याने येथूनच श्री रामाची पदस्पर्श घेतली होती. चित्रकूट हे नैसर्गिक सौंदर्य आणि निसर्गरम्य ठिकाणांसाठी ओळखले जाते. येथे हनुमान धारा, राम धारा, जानकी कुंड, कामदगिरी इत्यादी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

‘द रामचरितमानस’चे लेखक गोस्वामी तुलसीदास यांनी आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे व्यतीत केलेली ठिकाणेही चित्रकूट आहे. जगद्गुरू रामभद्राचार्य अपंग विद्यापीठ, दिव्यांगांसाठी खास बनवलेले जगातील एकमेव विद्यापीठ चित्रकूट येथे आहे हे अनेकांना माहीत नसल्याचे कळते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?