' राज्यात उष्णतेचा कहर; 'उष्मघातापासून' वाचण्यासाठी हे ९ उपाय नक्की करा!!

राज्यात उष्णतेचा कहर; ‘उष्मघातापासून’ वाचण्यासाठी हे ९ उपाय नक्की करा!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

उन्हाळ्याला आता सुरुवात झाली असून, आता तो आपले रंग दाखवू लागला आहे. भारतातील बहुतेक भागांमध्ये तापमानाने चाळीशी ओलांडली आहे.

उन्हाळा सुरु झाला की अनेक लोक थंड ठिकाणी फिरायला जातात, परंतु हे फक्त श्रीमंत लोकांसाठीच शक्य असते. अशा या भीषण उन्हाळ्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, लोक अनेक वेगवेगळे उपाय करत असतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आजच्या लेखात आपण अशाच उपायांविषयी जाणून घेणार आहोत, ज्याने तुम्ही डिहायड्रेशन आणि उष्माघात यांसारख्या उन्हाळ्यातील जवळपास सर्व आजारांपासून स्वतःचे संरक्षण करु शकाल.

 

summer inmarathi
aajkikhabar

 

● उष्माघाताचा सर्वात जास्त धोका कोणाला असतो :-

१) वयाची ५० वर्षांवरील लोक, या वयोगटामधील लोकांनी तर आपल्या घरात कूलर किंवा एसी ची व्यवस्था करूनच घ्यायला हवी.

२) लहान मुले आणि गर्भवती महिला.

३) हृदयरोग, उच्च रक्तदाब किंवा फुफ्फुसाचा आजार असलेले लोक, तसेच एखादे मानसिक आजार किंवा इतर एखादे मोठे आजार असलेल्या लोकांनी जास्त उन्हात फिरू नये.

 

senior im 1

 

उष्मघाताची कारणे :

१.डिहाइड्रेशन –

निरोगी राहण्यासाठी, आपल्या शरीराचे तापमान ३७ डिग्री सेल्सियसच्या आसपास राहणे आवश्यक आहे. आपल्या शरीरातून जो घाम निघतो त्याने आपले शरीर थंड राहण्यास मदत होते. एखाद्या व्यक्तीला निर्जलीकरण झाल्यास, त्यांना जास्त घाम येत नाही आणि त्यांच्या शरीराचे तापमान सतत वाढत जाते.

अनेकदा व्यायामानंतर, डायरियामध्ये, खूप मद्यपान केल्यामुळे, विशिष्ट औषधे (उदाहरणार्थ, लघवीचे प्रमाण वाढवणारी) घेतल्यामुळे आणि पुरेसे पाणी न पिल्याने डिहाइड्रेशन होऊ शकते.

 

summer inmarathi

२) दुपारच्या कडक उन्हात जास्त फिरल्याने पण उष्माघाताचा त्रास होऊ शकतो.

३) उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे अर्थात उन्हात जास्त कष्टाची कामे करणे.

४) कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे

५) जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे.

●उष्माघाताची लक्षणे जाणवल्यास कोणते प्रथोमपचार करावेत?

१. रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत, वातानुकुलित खोलीत ठेवावे २. रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत ३. रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी ४. रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आईसपॅक लावावेत.

 

ice inmarathi

 

● काय करावे.

१. तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करावा.

२. हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत

३. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/ टोपी, बुट व चपलांचा वापर करावा. ४. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा तसंच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा.

५. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करावा.

 

indian-summer-too hot Inamrathi

 

६. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

७. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर, व सनशेडचा वापर करावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे

८. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.

९. गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिक काळजी घ्यावी.

 

summer-inmarathi
deccanchronicle.com

● काय करू नये.

१. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये.

२. दुपारी १२.०० ते ४.०० कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे

३. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.

४. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.

 

Asian woman in hot summer - heat stroke concept

 

५. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत.आहारात हिरव्या पालेभाज्या समाविष्ट करा. त्वचेची संपूर्ण काळजी घ्या.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?