' साऊथच्या सिनेमांचा बोलबाला; या मराठमोळ्या कलाकारांचा आहे तितकाच मोठा वाटा! – InMarathi

साऊथच्या सिनेमांचा बोलबाला; या मराठमोळ्या कलाकारांचा आहे तितकाच मोठा वाटा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या दाक्षिणात्य चित्रपटांनी धुमाकूळ घातला आहे.एकिकडे हिंदी चित्रपटांना तिकीट खिडकीवर घाम गाळावा लागत असताना दाक्षिणात्य चित्रपट मात्र धो धो व्यवसाय करत आहेत. जणू काही करोडो छापण्याची टांकसाळच उघडली आहे.

या दक्षिणी यशात आपलं मराठमोळं कौतुकही आहे बरं का. या चित्रपटांच्या यशातला मराठी हिस्सा वाचून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय रहाणार नाही. दुर्दैवानं चर्चेत न आलेली ही गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. काय आहे कनेक्शन या चित्रपटांचं हिंदीत हिट होणं आणि मराठीचं?

 

yash kgf IM

 

घरोघरी साथीसारख्या पसरलेल्या पुष्पाच्या सुपरहिट डायलॉगचे रिल्स तुम्ही पाहिलेच असतील. पुष्पा नाम सुनके फ़्लावर समझे क्या? फायर हूं मैं फायर….

हा तो सुप्रसिध्द डायलॉग तुम्ही काळजीपूर्वक ऐकला तर तुम्हाला हा आवाज कदाचित ओळखिचा वाटेल. मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा हा आवाज आहे. अल्लू अर्जूनला हिंदीत धमाकेदार डायलॉगबाजी करण्यासाठी आवाज श्रेयसचा वापरला आहे.

 

shreyas talpade inmarathi

 

मूळ चित्रपटाला जसं यश मिळालं आहे तितकंच यश हिंदीतही मिळण्यात डायलॉग्जचा खूप मोठा सहभाग आहे. हे डायलॉग्ज दमदारपणे सादर करणारा श्रेयस काल परवापर्यंत पडद्यामागेच होता.

पुष्पाचा तो सुप्रसिध्द संवाद म्हणला तरी आहे कोणी? या कुतुहलापोटी नेटिझन्सनी गुगल केल्यानंतर हे नाव समोर आलं आणि सुखद आश्चर्याचा धक्का बसला.

 

 

श्रेयस हे नाव जरी मराठी मनोरंजन इंडस्ट्रीतून मोठं झालेलं, घडलेलं असलं तरिही हिंदितही गोलमाल सेरीज, इक्बाल, ओम शांती ओम सारख्या चित्रपटांमुळे अमराठी प्रेक्षकांनाही हे नाव परिचयाचं आहे.

आज या चित्रपटाचं यश मूळ स्टारकास्टसोबत श्रेयसही चाखतो आहे. यापूर्वीही श्रेयसनं द लायन किंग मधल्या टिमॉनसाठी आवाज दिलेला आहे. पुष्पा ही त्याची डबींगमधली दुसरी भूमिका आहे.

प्रभास. नाम ही काफी है लाखो तरूणींच्या ह्र्दयात याला पाहिलं की समथिंसमथिंग वाजू लागतं. दक्षिणेत लोकप्रिय प्रभास जेव्हा बाहुबलीच्या रुपानं हिंदीत अवतरला तेव्हा या माचोमनचा हिंदीतला आवाजही तसाच दमदार, त्याला शोभेल असा असणं गरजेचं होतं. हा शोध एका मराठमोळ्या आवाजापाशी येऊन थांबला. या आवाजाचं नाव आहे, शरद केळकर.

 

sharad ke inmarathi

 

एकेकाळी मिस्टर इंडियाचा किताब पटकावलेला हा उंचापुरा देखणा तरूण मराठी चित्रपटातून झळकत असतानाच सात फेरे या हिंदी मालिकेतून प्रेक्षकांना भेटला आणि अम्राठी प्रेक्षकवर्गही त्याचा प्रचंड चाहता बनला. मराठी चित्रपट, हिंदी मालिका, चित्रपट, वेबसेरीज अशा सर्व विभागात धमाकेदार मुशाफ़िरी करणार्‍या शरदनं डबिंग आर्टिस्ट म्हणूनही दमदार कारकिर्द घडविली आहे.

बाहुबली सिरीजमधल्या प्रभासचा आवाज म्ह्णून त्याची विशेष ओळख असली तरिही त्याची या क्शेत्रातली कामाची यादी खूप मोठी आहे. मार्वल सेरीजमधे अनेक भूमिकांना शरदनं आपला आवाज दिलेला आहे. मॅड मॅक्स : फ़्युरी रोड, एक्साडेस : गॉडस ॲण्ड किंग्ज, द रिटर्न ऑफ़ द गॅलेक्सी अशा अनेक सुपरहिट चित्रपटातून शरदचा आवाज भेटीला आला आहे.

संकेत म्हात्रे –

कदाचित हे नाव फ़ारसं परिचयाचं वाटणार नाही पण डबिंग क्षेत्रात हे नाव सुपरिचित आहे. छोटा भीम पासून, बेन टेन ते पिकाचूपर्यंत आणि अगणीत दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी अवतारासाठी आलू अर्जून ते जगपती बाबू, सूर्या, रामचरण अशा सर्व सुपरस्टार्सचा आवाज म्हणजे संकेत म्हात्रे.

या शिवाय मॅन व्हर्सेस वाईल्ड या जगप्रसिध्द मालिकेतील बेअर ग्रिल्सचा आवाज म्हणजेही संकेत म्हात्रे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या भागात होते त्या भागात तुम्ही संकेतचा आवाज ऐकला असेल.

 

sanket im

 

सचिन गोळे –

दाक्षिणात्य चित्रपटातील केजीएफ़च्या हिंदी यशात सचिनचा वाटा आहे. केजीएफ म्हणलं की सचिनच, इतकं हे समिकरण पक्कं आहे. तसेच त्याने सुरवातीला धनुषच्या सिनेमांचं डबिंग केले होते.

 

sachin gole im

 

विनोद कुलकर्णी –

vinod kul im

 

अनेक दाक्षिणात्य चित्रपटांत ड्बिंग आर्टिस्ट म्हणून काम केलेल्या विनोद यांची विशेष ओळख दाक्षिणात्य कॉमेडियन ब्रह्मानंदम याच्यामुळे आहे. ब्रह्मानंदमला विनोद यांचा आवाज इतका शोभून दिसतो की तो स्वत: बोलतो आहे असं वाटतं. तसेच त्यांनी मराठी सिनेमात देखील काम केले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?