' साऊथ सुपरस्टार रजनीला बॉलिवूडमधून संपूर्ण देशासमोर आणणारे टी. रामाराव!

साऊथ सुपरस्टार रजनीला बॉलिवूडमधून संपूर्ण देशासमोर आणणारे टी. रामाराव!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज बॉलीवूडमध्ये पदार्पण करायचे असेल तर तुम्हाला कोणत्या तरी कंपू शाहीत सामील होता आले पाहिजे अन्यथा तुम्ही बॉलीवूडमधील जी काही घराणी आहेत त्यांचे तुम्ही नातेवाईक असायला हवे, असा एक समज आपल्याकडे आहे मात्र नवाज, इरफान सारखे अभिनेते आपल्या मेहनतीच्या जोरावर बॉलीवूडमध्ये आपले नाव कमावले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सुशांत सिंग प्रकारणानंतर बॉलीवूडकडे बघण्याची लोकांची दृष्टीच बदलली आहे, स्टार्स किड्सचे एकामागून एक होणारे पदार्पण यामुळे नव्या कलाकरांना कितपत संधी मिळेल हा प्रश्न आहेच.

बॉलीवूडमधील पदार्पण हा गेली अनेक वर्ष मुद्दा गाजतो आहे. सिनेमात मिळणारे फेम, लोकप्रियता बघून अनेकजण आपले नशीब आजमावण्यासाठी या मायानगरीत येऊ लागले.

 

bollywood actors 2 inmarathi

 

फाळणीच्या आधीच कपूर मंडळी, दिलीपकुमार यासारखे कलाकार बॉलीवूडच्या प्रेमापोटी भारतात आले आणि मुंबईत थडकले. काळानुसार सिनेमा बदलला तसे नवनवीन कलाकार येऊ लागले, अशातच साऊथमध्ये वादळ निर्माण करणारे एक नाव होते ते म्हणजे रजनीकांत, हे वादळ येऊन थडकले ते थेट बॉलीवूडच्या शहेनशाहच्या समोर, आणि या वादळाला बॉलीवूडमध्ये दाखल करणारी व्यक्ती होती ती म्हणजे टी रामा राव.

आज चेन्नईमध्ये टी रामा राव यांचे वयाच्या ८३ वर्षी निधन झाले. साऊथच्या सुपरहिट सिनेमांचा बॉलीवूडमध्ये रिमेक करण्याचा त्यांनी जवळजवळ सपाटाच लावला होता.

टी रामा राव मूळचे आंध्र प्रदेशचे त्यांनी आपल्या करियरची सुरवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली, १९६६ ते २००० या प्रदीर्घ काळात त्यांनी अनेक हिंदी आणि साऊथच्या सिनेमाचं दिग्दर्शन केलं तसेच ते निर्मातेसुद्धा बनले.

 

t rama rao im

 

लोक परलोक हा त्यांचा पहिलावहिला हिंदी सिनेमा, या सिनेमात जितेंद्र होता, जितेंद्रने आपल्या कारकिर्दीत अनेक साऊथच्या रिमेक असलेल्या सिनेमात काम केले. टी रामा राव यांनी १९८३ साली काढलेला अंधा कानून हा सिनेमा चांगलाच गाजला होता. याच सिनेमात सुपरस्टार रजनीकांत काम करत होता.

रजनीकांतचे तामिळ सिनेमात १९७५ सालीच आपले पाऊल ठेवले होते, त्यांचा संघर्ष आपण सगळेच ऐकून आहोत, रजनीकांतला बॉलीवूडमध्ये आणण्याचे श्रेय जाते ते टी रामा राव यांना, अंधा कानून हा त्याकाळात खूप चर्चेत आलेला सिनेमा आहे.

या सिनेमात त्याकाळातील व्हिलन मंडळींची अगदी रांगच लागली होती. डॅनी डेन्झोप्पा, अमरीश पुरी, प्राण, मदन पुरी यासारख्या कर्दन काळांना पूर्ण उरणारा एकटा रजनीकांत, सोबतीला बच्चनजीं, धर्मेद्र हेमामालिनी अशी तगडी कास्टिंग या सिनेमात केली होती.

 

rajnikant kabali inmarathi

 

अंधा कानून सिनेमा बॉक्स ऑफिसरवर तर  चाललाच मात्र यातील गाणी देखील सुपरहिट ठरली. टी रामा राव यांनी मग साऊथच्या सिनेमांची रांगच लावली. २००१ साली आलेला बेटी १ हा त्यांचा शेवटचा सिनेमा. आपल्या कारकिर्दीत त्यांनी कायमच वेगवेगळ्या विषयांना हात घालून त्यावर सिनेमे बनवले.

 

andha im

 

आजही बॉलीवूडच्या मंडळींना साऊथच्या सिनेमांच्या कुबड्या धरव्याचं लागतात. सलमान खान सारख्या स्टारच करियर संपायला आले असताना वॉन्टेड सारख्या सिनेमाने त्याला नवसंजीवनी दिली.

टी रामा राव यांनी देखील अगदी बदल्या काळाप्रमाणे त्या त्या स्टार्स सोबत काम केली, मग तो जितेंद्र असो किंवा गोविंदा, अशा स्टार्सच्या पदरी सुपरहिट सिनेमे देऊन आज टी रामा राव काळाच्या पडद्याआड गेले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?