' ‘बोलो जुबां केसरी’ मध्ये अडकलेलं बॉलिवूड, आणि प्रेक्षकांचं मन जिंकणारा अल्लू अर्जुन… – InMarathi

‘बोलो जुबां केसरी’ मध्ये अडकलेलं बॉलिवूड, आणि प्रेक्षकांचं मन जिंकणारा अल्लू अर्जुन…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

केजीएफचं अचंबित करणारं यश बघून एक गोष्ट नक्की आहे की येणारा काळ हा बॉलीवूडसाठी अत्यंत खडतर असणार आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर लोकांच्या मनात बॉलीवूडची प्रतिमा जी खराब झाली आहे ती अद्याप सुधारलेली नाही.

नेपोटीजम, कंपूशाही, अवैध धंदे, ड्रग मार्केट कनेक्शन यामुळे बॉलीवूड पुरतं बदनाम झालं आहे यात काहीच वाद नाही, आणि याचा थेट परिणाम त्यांच्या सिनेमावर होताना दिसत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

लॉकडाऊन जसा शिथिल होऊ लागला आणि सिनेमे रिलीज होऊ लागले तसे एका पाठोपाठ एक हिंदी सिनेमे बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटले, आणि साऊथच्या सिनेमाने प्रेक्षकांवर चांगलीच पकड घेतली.

बाहुबलीने भाषेच्या सीमा ओलांडून जगभरात झेंडे रोवले आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक साऊथ सिनेमे सगळीकडेच हीट झाले. KGF सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय, त्याआधी RRR या सिनेमाने कमाल दाखवली आणि अल्लू अर्जुनच्या पुष्पाने तर कल्लाच केला.

 

kgf rrr pushpa IM

 

साऊथचे कलाकार त्यांचे सिनेमे भारतीय प्रेक्षकांवर गारुड करतायत तर इथे बॉलिवूड गुटखा कंपनीच्या जाहिरातींमध्ये व्यस्त आहेत. नुकतंच विमल या ब्रॅंडची नवी जाहिरात समोर आली आणि पुन्हा प्रेक्षकांच्या हाती आयतं कोलीत मिळालं.

आधी फक्त अजय देवगण या जाहिरातीत दिसायचा, नंतर शाहरुख खानही त्याला जॉइन झाला आणि आता या नवीन जाहिरातीत नव्या भिडूची एंट्री झालीये ती म्हणजे अक्षय कुमारची.

 

vimal akshay kumar IM`

 

ही जाहिरात जशी बाहेर आली तसं अक्षय कुमारचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला, त्या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार सांगतोय की कशाप्रकारे गुटखा कंपनी सेलिब्रिटीजना बक्कळ पैसे देतात आणि त्याने त्या जाहिराती कशा नाकारल्या.

 

या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा बॉलिवूडचा हा ढोंगीपणा उघड झाला आहे. केवळ बॉलिवूड कलाकारच नाही चक्क जेम्स बॉन्ड म्हणजेच pierce brosnan या अभिनेत्यानेसुद्धा एकदा अशीच पान मसालाची जाहिरात केली होती जी त्यांच्या चांगलीच अंगाशी आली होती.

पान मसाला, गुटखा, मद्य यांची जाहिरात थेट करता येत नसली तरी सोडा किंवा पान मसाला किंवा मुखवासच्या नावाखाली या कंपन्या अगदी सर्रास जाहिरात करतात आणि कित्येक सेलिब्रिटी लोकं यात कामदेखील करतात.

पुष्पा फेम अल्लू अर्जुन सध्या अशाच एका कारणासाठी चर्चेत आहे. त्यालाही एका गुटखा कंपनीने जाहिरातीसाठी ऑफर केली होती पण त्याने ती ऑफर धुडकावून लावली आहे. नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात!

नुकतंच अल्लू अर्जुनला एका तंबाखू कंपनीने जाहिरातीसाठी ऑफर केली आणि त्यासाठी चांगले पैसेसुद्धा द्यायला ते तयार होते, पण अल्लूने मात्र ती ऑफर नाकारली आहे.

 

allu arjun IM

 

यावर स्पष्टीकरण देताना अल्लूने सांगितलं की “माझी तंबाखूची जाहिरात बघून माझ्या फॅन्सनी तंबाखूचं सेवन केलं तर ते मला पटणार नाही.” म्हणूनच त्याने ही बक्कळ पैसा देणारी ही जाहिरात नाकारली आहे.

सिनेमात जरी अल्लू अर्जुन तंबाखू खाताना किंवा सिगरेट ओढताना जरी दिसला असला तरी खऱ्या आयुष्यात तो या सगळ्या व्यसनांपासून लांब आहे.

अल्लू अर्जुन नव्हे तर अमिताभ बच्चन, विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांनीसुद्धा अशा जाहिराती करण्यास नकार दिला होता. साई पल्लवी या अभिनेत्रीनेसुद्धा fairness cream च्या जाहिरातीला नकार दिला होता.

 

sai pallavi IM

 

अल्लू अर्जुनच्या या कृतीने त्याने त्याच्या चाहत्यांची मनं तर जिंकली आहेच, तर एकीकडे बॉलिवूडचा दिखाऊपणाचा बुरखासुद्धा फाडला आहे. खरंतर या सेलिब्रिटी लोकांना या जाहिराती करण्याचे पैसे मिळतात आणि तो त्यांचा पेशा आहे, शिवाय तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे!

तरी काही कलाकार त्या जाहिराती अगदी बिनदिक्कतपणे करतात तर काही सामाजिक भान जपण्यासाठी अशा जाहिरातींना नकार देतात. शेवटी जाहिरात बघून त्यातून नेमकी कोणती गोष्ट घ्यायची आणि सोडायची हे तुम्ही आम्हीच ठरवायचं असतं!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?