' वस्तू व सेवा कर (GST) म्हणजे काय रे भौ….? जाणून घ्या अगदी सोप्या भाषेत! – InMarathi

वस्तू व सेवा कर (GST) म्हणजे काय रे भौ….? जाणून घ्या अगदी सोप्या भाषेत!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

देशात १ जूलै २०१७ पासुन नविन कर प्रणाली वस्तू व सेवा कर (GST) लागू झाली आहे. यामुळे संपुर्ण देशात एकच कर व्यवस्था अस्तित्वात येणार आहे. वस्तू व सेवा कर ही अप्रत्यक्ष कर प्रणाली आहे.

वस्तू म्हणजे ज्या आपण खरेदी करू शकतो जसे की मोबाईल, संगणक, वाहने इ. विकत घेताना आपल्याला कर लावलेल्या किंमतीला खरेदी कराव्या लागतात. त्या वस्तूंच्या ठिकाणानूसार वेगवेगळ्या किमती असु शकतात. तसेच सेवा म्हणजे ज्या आपण प्रत्यक्षात खरेदी करू शकत नाही पण त्यांचा उपभोग घेऊ शकतो, जसे रेस्टॉरंट, हॉटेल्स, चित्रपटगृह मॉल्स इत्यादी.

भारतीय संविधानाच्या १२२ व्या घटना दूरुस्तीद्वारे वस्तू व सेवा कर प्रणाली भारताने स्विकारली आहे. या प्रणाली नुसार एकच वस्तू व सेवांवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कर भरावे लागणार नाही. फक्त मद्य (दारू) यांतून वगळण्यात आली आहे. रॉकेल, पेट्रोल ,डिझेल व गॅस यांचे कर जैसे थेच राहणार आहेत.

gst-marathipizza01
indiatvnews.com

सध्या सरकारचे अस्तित्वात असलेले एक्ससाईज डुटी, व्यवसायिक कर, विक्री कर ,वॅट, मनोरंजन कर, प्रवेश कर, खरेदी कर, लक्झरी कर, जाहिराती कर तसेच सेवा कर हे कायमचे निघून जाऊन फक्त वस्तू व सेवा कर हा एकच प्रकारचा कर सर्व वस्तू व सेवासांठी लागू होणार आहे.

सामान्य जनतेला होणारा फायदा :

  • सर्व वस्तूंचे दर समान असणार, खरेदी साठी दुसऱ्या ठिकाणी जावयाची अवश्यकता नाही. यामुळे स्थानिक बाजारपेठेला चालना मिळेल.

 

  • सध्या आपण खरेदी करत असल्या वस्तूवंर ३० ते ३५ टक्के कर लागतो. तो जाऊन २०-२५ टक्क्यांपर्यतच लागणार. यामुळे महागाई काही प्रमाणात कमी होऊ शकते.

 

व्यवसाय व उद्योगांना होणारा फायदा :

  • विविध किचकट कर भरणा पद्धतीपासुन सुटका.

 

  • सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवणे सोपे. जकात, वॅट दरवेळी भरण्याची गरज नाही.

 

  • एका राज्यात उत्पादित माल दुसऱ्या राज्यात कोणताही कर न लागता विक्री करता येईल.

 

  • कर चुकवेगिरीला आळा

 

  • सकल उत्पाद वाढण्यासाठी मदत होणार.

 

  • अतिरिक्त कर भरावा लागणार नाही.
gst-marathipizza02
yourstory.com

 

कराचे स्लॅब :

-०%

-५%

-१२%

-१८%

-२८%

-सोने व मौल्यवान वस्तूवर ०.२५ % अधिक

 

काय काय महाग होणार :

चाय, कॉफी,डब्बाबंद पदार्थ, जेम्स अॅण्ड ज्वेलरी, रेडिमेड कपडे, मोबाईल, फोन बिल, क्रेडिट कार्ड बिल, चैनीच्या वस्तू, तंबाखु, सिगारेट, आरोग्य व वाहन विमा,अॅल्युमिनीयम इ.

 

काय काय स्वस्त होणार :

छोटी कार, मिनी एसयूवी, घर खरेदी, रेस्टॉरंट, बिल, पंखे, ओवन, फ्रिज ,वाशिंग मशीन, एसी, सौर उर्जा सामान,लेदर वस्तू इ.

gst-marathipizza03
mycarhelpline.com

टीप: कोणत्याही वस्तू व सेवेवर किती कर लावायचा हा पूर्ण सरकारच्या मर्जीतला विषय आहे.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?