' कायमच इतिहासकारांकडून दुर्लक्षित राहिलेल्या ‘बांदल’ कुटुंबाचा इतिहास – InMarathi

कायमच इतिहासकारांकडून दुर्लक्षित राहिलेल्या ‘बांदल’ कुटुंबाचा इतिहास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘पावनखिंड’ हा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा आपण सर्वांनीच अभिमानाने बघितला. बाजीप्रभु देशपांडे आणि सैन्याने छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचावेत म्हणून सिद्दी जोहरच्या सैन्यासोबत घोडखिंडीत दिलेली झुंज बघून प्रत्येकाच्या अंगावर शहारे येतात.

 

pavankhind im

 

‘पावनखिंड’ बघत असतांना ‘बांदल’ या अजून एका पात्राने आपल्या सर्वांचंच लक्ष नक्कीच वेधून घेतलं असेल. ‘बाण दल’ या गटाचं नेतृत्व करणारे हे शूर सैनिक आपल्या धनुर्विद्या आणि चपळाईने प्रत्येक मोहीम फत्ते करण्यात नेहमीच सिंहाचा वाटा उचलायचे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करण्याच्या ध्यास हा ‘बांदल’ कुटुंब देखील जगत होते. ‘बांदल’ कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ही स्वराज्य मिळवण्यासाठी आपलं योगदान देत होती. ज्या ‘बांदल’ घराण्याने आपल्या कर्तृत्वाने छत्रपती शिवरायांचं मन जिंकलं होतं त्यांच्या कार्याचा उल्लेख आपल्या इतिहासकारांनी फार मर्यादित शब्दात केल्याचं प्रकर्षाने जाणवतं.

‘पावनखिंड’मुळे कित्येक लोकांना पहिल्यांदाच कळलेल्या ‘बांदल’ घराण्याचा इतिहास काय आहे? जाणून घेऊयात.

 

jedhe im

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील रायाजी बांदल आणि बाजी बांदल हे बंधू भोर तालुक्यातील ‘हिरडस मावळ’ मधील पिसावरे गावचे रहाणारे होते. त्यांचे वडील ‘कृष्णाजीराजे नाईक – बांदल’ हे देखील छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर सेनापती होते. त्यांच्यावर मावळ भागातील ५३ गावांची वतनदारी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. कृष्णाजीराजे यांनी आपल्या दोन्ही मुलांना स्वराज्य रक्षणाचं महत्व लहानपणीच पटवून सांगितलं होतं आणि धनुर्विद्येत त्यांना प्रवीण केलं होतं.

१३ जुलै १६६० रोजी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा गडावरून सिद्धी जोहरच्या वेढ्यातून निसटण्यात यशस्वी झाले होते, तेव्हा ‘रायाजी बांदल’ आणि ‘बाजी बांदल’ यांनी या मोहिमेचं नेतृत्व केलं होतं.

गजापुरच्या खिंडीत मावळ्यांची आणि गनिमांची झालेल्या चकमकीत ‘बांदल’ बंधू यांचे बाण असे काही मारा करत होते की सिद्धी जोहरचे सैनिक हे त्यापुढे किती तरी वेळ हतबल झाले होते. गनिम ही लढाई केवळ संख्याबळ आणि युद्ध नियम धाब्यावर बसवून लढल्याने जिंकले हे सगळेच मान्य करतील.

बांदल बंधू यांचं कौशल्य हे धनुष्य बाण चालवण्यात आणि तलवारबाजीत अद्वितीय होतं. घोडखिंडीत त्यांनी बाजीप्रभु देशपांडे यांच्या सहकार्याने तीन प्रहर गनिमांना रोखून ठेवलं होतं. त्यावेळी त्यांच्या सोबत शिंदे, गव्हाणे, चव्हाण, विचारे, खाटपे, सडे, धुमाळ, जाधव, शेलार, जगदाळे, भेलके, इंगळे, कोंढाळकर आणि इतर काही मावळे सुद्धा जीवाची बाजी लावून लढले होते.

 

bandal im

 

बाजी बांदल आणि रायाजी बांदल हे छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत लढत राहिले. या लढाईत बांदल बंधू, बाजीप्रभु देशपांडे हे धारातीर्थी पडले आणि त्यांनी घोडखिंड पावन केली.

बांदल बंधूंच्या पराक्रमाची दखल घेत छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः पिसावरे येथील बांदल यांच्या निवासस्थानी त्यांच्या आई ‘श्रीमती दिपाही बांदल’ यांचं सांत्वन करण्यासाठी गेले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांदल परिवाराची कर्तबगारी बघून त्यांना स्वराज्यात मानाची मानली जाणारी ‘तलवार’ देण्याचं ठरवलं होतं. आपला हा मनसुबा महाराजांनी कान्होजी जेधे यांना बोलून दाखवला होता. कान्होजी जेधे यांनी महाराजांच्या शब्दाचा मान ठेवला आणि त्वरित त्यांच्याकडे असलेली ‘तलवार’ त्यांनी बांदल कुटुंबियांना देऊन त्यांना पुरस्कृत केलं होतं.

जेधे यांनी आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने असलेली ‘मानाची तलवार’ ही महाराजांच्या एका शब्दावर बांदल यांना देऊन एक आदर्श प्रस्थापित केला होता.

 

jedhe 1 im

 

पन्हाळा गडावरून महाराजांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या बांदल बंधूंनी प्रतापगड आणि स्वराज्याच्या इतर लढायांमध्ये सुद्धा आपलं योगदान दिलं होतं. पण, त्याचा उल्लेख हा स्वराज्यावर लिहिण्यात आलेल्या पुस्तकातून, नाटकातून, सिरियल्स मधून सोयीस्कररित्या टाळण्यात आल्याचा काही इतिहास जाणकारांचा आरोप आहे. वतनदार या पदावर रुजू झालेल्या व्यक्तींचा इतिहास योग्य पद्धतीने समोर न आल्याने बांदल यांचं नाव ऐकण्यास इतके वर्ष लागली असं देखील काही लोकांचं म्हणणं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतर धुरंधर सैनिकांमध्ये बाजी पासलकरांच्या पुरंदरच्या पराक्रमाचा समावेश होतो. त्यावेळी शहाजी राजे हे कैदेत होते.

प्रतापगडाच्या पायथ्याशी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः अफझल खानाचा कोथळा बाहेर काढला होता तेव्हा कान्होजी जेधे आणि त्यांचे चिरंजीव बाजी सर्जेराव जेधे यांच्या सैन्याने अफझल खानाच्या सैन्याचा असाच पराक्रम करून खात्मा केला होता. बाजी जेधे यांनी आपला ‘भगवा’ खानाच्या सैन्याला मिळू दिला नव्हता आणि हा पराक्रम बघून त्यांना ‘सर्जेराव’ ही पदवी बहाल करण्यात आली होती.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील सैनिकांना यश मिळणाऱ्याचं अजूनही एक कारण समजलं जातं ते हे की, त्या काळातील लोक हे जात, धर्माच्या नावाखाली विभागले गेले नव्हते.

 

shivaji inmarathi

 

त्या काळात जगलेली प्रत्येक व्यक्ती ही केवळ ‘स्वराज्य सैनिक’ होते. बांदल यांच्यासारखे अजूनही बरेच सैनिक असावेत ज्यांची नावं आपल्यापर्यंत पोहोचले नाहीयेत, त्या सर्व ज्ञात आणि अज्ञात शूरवीरांना आमचा मानाचा मुजरा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?