' काळ्या कोंबडीची काळी अंडी, महागड्या ‘कडकनाथ’ चिकनचा खरंच फायदा होतो का? – InMarathi

काळ्या कोंबडीची काळी अंडी, महागड्या ‘कडकनाथ’ चिकनचा खरंच फायदा होतो का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

विनर विनर, चिकन डिनर! हे वाक्य पबजी खेळणारे, खेळणाऱ्यांच्या संपर्कात असणारे, खेळणाऱ्यांच्या आजूबाजूला बसलेले यांना चांगलंच ठाऊक आहे, पण हे चिकन डिनर मिळवण्यासाठी त्या खेळाडूंना खूप कष्ट करायला लागत होते.

तुम्हाला हेडिंग वाचून किंचितसा अंदाज आला असेलच. आज तुम्हाला कडकनाथ चिकनबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

लॉकडाउनच्या जस्ट आधीच्या वर्षात म्हणजे साधारणपणे २०१९ मध्ये कडकनाथ ही कोंबडी अचानक फेमस झाली होती. त्याचं कारण म्हणजे ही कोंडी नखशिखान्त काळी आहे.

 

chicken im

 

हिचं मांस, रक्त, पंख एवढंच नाही तर पायाची नखं आणि हाडंसुद्धा काळी आहेत, पण या कोंबडीची किंमत एवढी भयानक जास्त म्हणजे नॉर्मल कोंबडीपेक्षा चौपटीनं जास्त आहे.

हे तर सोडाच. पण कडकनाथ कोंबडीच्या एका किलोची किंमत साधारण ९०० ते १२०० रुपये आहे आणि एका अंड्याची ५० रुपये आहे. एवढी किंमत मोजायला लोक तयार का आहेत? नेमकं काय आहे या कोंबडीमध्ये? चला जाणून घेऊ या!

‘कडकनाथ’बद्दल आश्चर्यकारक आणि इंटरेस्टिंग गोष्टी- 

ही कडकनाथ कोंबडी मध्यप्रदेशातल्या धार, झाबुया तसेच गुजरात आणि राजस्थानच्या जवळच्या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने मिळते.

या कोंबडीची त्वचा, चोच, पायाची बोटं आणि तळवे गडद राखाडी रंगाचे असतात म्हणून तिला ‘काली मानसी’ म्हणजे काळे मांस असलेला पक्षी म्हणतात.

कडकनाथच्या शरीरात मेलॅनिनचे प्रमाण जास्त असल्यानं तिच्या शरीराचा आणि रक्ताचा रंग सामान्य कोंबडीपेक्षा गडद असतो. एक आपली कडकनाथ, चीनमधील सिल्की आणि इंडोनेशियातील अयाम आणि सेमानी अशा कडकनाथच्या एकूण तीन जाती आहेत.

या कोंबडीमध्ये प्रकारही असतात. जेट ब्लॅक कडकनाथ या जातीतील कोंबडा आणि कोंबडी दोन्ही काळ्या रंगाचे असतात. सोनेरी कडकनाथ या जातीतल्या कोंबडीची पिसं आणि कोंबड्याच्या डोकं तसेच मानेच्या भागात सोनेरी पिसं असतात.

 

chicken im4

 

पेन्सिल कडकनाथ या जातीमध्ये प्रौढ पक्ष्यांच्या मानेच्या भागात पांढरी पिसं असतात आणि शरीरावर काळी पिसं असतात.

एका दिवसाची पिल्लं निळसर ते काळ्या रंगाची असतात. या पिल्लांच्या पाठीवर गडद पट्टे असतात, मात्र वयाने मोठ्या पक्ष्यांना पट्टे नसतात आणि हे पक्षी चंदेरी-सोनेरी किंवा निळसर-काळे दिसतात.

कडकनाथ कोंबड्याचं ॲव्हरेज वजन दीड किलो असतं आणि कोंबडीचं वजन अंदाजे १ किलो असतं. यांच्या अंड्याचं वजन ४६.८ ग्रॅम आहे.

 

chicken im1

 

कडकनाथ चिकनची चव थोडी मटणासारखी असते. शिवाय टेक्सचर मऊ असलं तरी मांस खडबडीत असल्यानं शिजायला थोडा जास्त वेळ लागतो.

कडकनाथ चिकनबद्दल तर समजलं; पण त्याचे फायदे काय आहेत?

१. कडकनाथ चिकनमध्ये २५% प्रोटिन्स असतात तर व्हाईट मीटमध्ये साधारणपणे १८ ते २०% प्रोटिन्स असतात.

२. व्हाईट मीटमध्ये साधारणपणे १३ ते २५% कोलेस्टरॉल, तर कडकनाथ चिकनमध्ये फक्त ०.७३ ते १.०५% कोलेस्टरॉल असतं.

३. कडकनाथ कोंबडीमध्ये लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असतं. सामान्य कोंबडीपेक्षा कडकनाथ दहापट जास्त लोह देते.

 

chicken im3

 

४. या चिकनमध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन बी १, बी २, बी ६, बी १२ ची विविधता आहे.

५. कडकनाथ कोंबडी अठरापैकी आठ ॲमिनो ॲसिड पुरवते.

पण ही माहिती कितीही खरी असली तरी लगेच तुम्ही कडकनाथ चिकन घ्यायला निघू नका. तुमच्या तब्येतीसाठी या सगळ्या गोष्टी पूरक आहेत का बघा, तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच ‘कडकनाथ चिकन डिनर’ करा!

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?