' या मंदिरातील बोलणाऱ्या मुर्ती जगाचं लक्ष वेधून घेतात – InMarathi

या मंदिरातील बोलणाऱ्या मुर्ती जगाचं लक्ष वेधून घेतात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, ज्यामुळे भारताच्या प्रत्येक राज्यांमध्ये सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विविधता पाहण्यास मिळतात. सोबतच या राज्यांमध्ये धार्मिक फरक देखील प्रकर्षाने आढळून येतो.

आपल्या जनमानसावर या धार्मिक गोष्टींचा इतका पगडा आहे की, आजही कित्येक भारतीय लोक जादू-टोणा, चमत्कार, अंधश्रद्धा यावर विश्वास ठेवतात. शेवटी हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग, या चमत्कारिक सुरस गोष्टी खरंच अस्तित्वात आहेत की नाही यावर मात्र ठोस भाष्य करणं कठीण!

 

raj rajeshwari tripur tempal InMarathi

काही लोक देवाचे अस्तित्व आहे असे मानतात तर काही देवाचे अस्तित्व नाही आहे असे मानतात, पण कधी कधी आपल्या डोळ्यांना अश्या गोष्टी दिसतात ज्या आपल्याला खरंच या जगात दैवी शक्ती आहे का यावर विचार करण्यास भाग पाडतात.

जर तुम्ही देखील चमत्कार वगैरे मानत नसाल तर आता आम्ही तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहोत ती ऐकून तुम्हाला देखील आश्चर्य वाटल्याखेरीज राहणार नाही. बिहारच्या बक्सर जिल्ह्यामध्ये राज राजेश्वरी त्रिपुर सुंदरी नावाचे एक असे मंदिर आहे, जिथे रात्रीच्यावेळी मंदिरातील  मुर्त्या एकमेकांशी बोलतात.

 

raj-rajeshwari-temple-bihar-marathipizza01
flickr.com

जेव्हा मध्यरात्रीच्या वेळी या मंदिरात निरव शांतता असते तेव्हा मंदिरातून कुजबुजण्याचे आवाज ऐकू येतात. येथील स्थानिकांनी रात्रीच्या प्रहरी कित्येक वेळा मंदिरातून आवाज येताना ऐकला आहे आणि या स्थानिकांचे म्हणणे आहे की हा आवाज दुसरा तिसरा कोणाचा नसून प्रत्यक्ष मंदिरातील मुर्त्यांचा आहे.

raj-rajeshwari-temple-bihar-marathipizza02
wahgazab.com

याच अनोख्या गोष्टीमुळे हे मंदिर जगभरातील लाखो भक्तांना आपल्याकडे आकर्षित करत आहे. खुद्द शास्त्रज्ञांनी सुद्धा हे मान्य केले आहे की रात्रीच्या वेळी मंदिरात निशब्द शांतता असून देखील शब्द घुमत असतात, म्हणजे नक्कीच येथे काहीतरी अद्भुत आहे किंवा असे काहीतरी वैज्ञानिक कारण आहे जे आजही पडद्याआड आहे.

 

raj rajeshwari tripur tempal 1 InMarathi

उत्तर भारतातील प्रसिद्ध तांत्रिक भवानी मिश्र याने जवळपास ४०० वर्षांपूर्वी या मंदिराची स्थापना केली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्या वंशाचे कुटुंबिय पुजारी बनत आले आहेत. हे मंदिर तंत्र साधनेसाठी प्रसिद्ध आहे आणि इथे प्रत्येक साधकाची इच्छा पूर्ण होते.

तंत्र साधनेनीच इथे देवीची प्राण प्रतिष्ठा (स्थापना) केली गेल्याचे सांगितले जाते. उत्सवाच्या वेळी येथे संपूर्ण रात्रभर साधक मंदिरात साधना करत असतात. या मंदिरात राज राजेश्वरी त्रिपुर सुंदर देवीच्या मूर्ती बरोबर बगलामुखी देवी, तारा देवी, दत्तात्रेय भैरव, बटूक भैरव, अन्नपूर्णा भैरव, काल भैरव इत्यादी देवांच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत.

raj-rajeshwari-temple-bihar-marathipizza03
thehook.news

या गोष्टीवर कितपत विश्वास ठेवावा हे आम्ही तुमच्यावर सोडत आहोत, पण हे देखील नाकारता येत नाही की या मंदिरातील या रहस्याला भेदणारे ठोस कारण आजही कोणाला देता आलेले नाही.

 

raj rajeshwari tripur tempal 2 InMarathi

 

अनेकजण असे म्हणतात की कदाचित मंदिरातील देवी मनुष्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असेल. असो यावर आजवर अनेकांनी अनेक मते मांडली आहेत, ज्यापैकी काही मते तर अतिशय बालिश आहेत.

पण या चमत्कारिक गोष्टीमुळे मंदिराची कीर्ती मात्र सातासमुद्रापार पसरली आहे आणि त्याचाच पुरावा म्हणून की काय दिवसागणिक मंदिराबाहेरची रांग रोज वाढतच आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?