' ”तुम्ही जॉईन व्हा, इतरांनादेखील सामील करा” लोकांना चुना लावणाऱ्या कंपनीला ED चा दणका! – InMarathi

”तुम्ही जॉईन व्हा, इतरांनादेखील सामील करा” लोकांना चुना लावणाऱ्या कंपनीला ED चा दणका!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अगदी आत्ताआत्तापर्यंत घरी येऊन, किंवा फोनवरून अॅमवे प्रॉडक्ट्स विकणारे हायप्रोफाईल विक्रेते तुमच्याही घरी आले असतील. महागड्या गोळ्या, तितकीच महागडी क्रीम्स, हर्बल औषधं यांची तुम्हाला किती गरज आहे? तुमच्या उच्च जीवनशैलीसाठी अॅमवेचा आधार किती महत्वाचा आहे? ही बाब तुमच्याही मनावर त्यांनी कोरली असेल.

यापैकी काही विक्रेते तुमची मावशी, मामी, बहीणही असू शकतील. त्यांच्या आग्रहाला भुलून तुम्ही अॅमवेची प्रॉडक्ट्स घेतलीही असतील आणि त्यानंतर त्या विक्रेत्यांनी तुम्हालाच त्यांच्या गटात सामील केल्याने काही काळानंतर तुम्हीही घरोघरी जाऊन अॅमवेचा प्रचार करू लागला असाल…

 

amway im

 

ही गोष्ट अनेकांना त्यांचीच वाटेल. कारण अनेक मध्यमवर्गीय घरांमध्ये काही काळापुर्वी अॅमवे नावाचं वादळ आलं होतं. या वादळात अनेकांनी आपले हात धुवून घेतले. मात्र आता याच कंपनीचा बाजार उठलाय. अनेकांच्या घरात आजही याचे पडसाद उमटत आहेत. कदाचित तुमच्या आसपासही तुम्हाला या वादळात भरडली गेलेली तुमची सख्खी माणसं सापडतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पण असं काय झालं की महागडे प्रॉडक्ट्स विकून कोटींची उलाढाल करणाऱ्या अॅमवेवर ईडीचं संकट कोसळलंय?

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर ईडीच्या धाडी पडल्या आहेत. अगदी याची सुरवात ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांच्यापासून सुरु झाली ते महाविकास आघाडीचे चाणक्य म्हणून ओळखले गेलेले संजय राऊत यांच्यावर देखील ईडीने कारवाई केली आहे, या दोघांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.

ईडीचे चटके केवळ नेत्यांनाच बसले नाहीत तर बिल्डर मंडळी असो किंवा वाहन उद्योगातील व्यवसायिक मंडळी, अनेक बड्या मंडळींच्या विरोधात ईडने कारवाईचा सपाटा लावला आहे. आता ईडीच्या रडारवर अॅमवे सारखी कंपनी आली आहे.

 

ed im

या कंपनीत कामासाठी नव्हे, तर चक्क झोपण्यासाठी पगार मिळतो. ते ही एक लाख रुपये!

इन्कम टॅक्स, जीएसटी तसाच युट्युब टॅक्स…! हो आता युट्युबर भरणार एक नवा कर!

मार्केटिंग हा प्रकार आपल्याकडे रुळायला तसा वेळ गेला मात्र नंतर संपूर्ण उद्योगविश्व् या एका संकल्पेनवर जगू लागलं, भारताने मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारले आणि  इतर परदेशी कंपन्यांसाठी भारत एक हक्काची बाजारपेठ बनली, ज्या भारतीय मंडळींना सकाळच्या नाश्त्यामध्ये पोहे, उपमा खायची सवय होती त्या मंडळींना केलॉग्स, मॅग्गीची सवय, याच  कंपन्यांनी उत्तम  मार्केटिंग आणि जाहिरातीतून पटवून दिली.

मार्केटिंग जाहिरात याच बरोबरीने हळूहळू एक प्रकार वाढला तो म्हणजे चेन मार्केटिंग! एका व्यक्तीने तीन जणांना जोडायचे आणि त्यांनी आणखीन पुढे चार जणांना!  याची साखळी तयार करून कंपनीच्या वस्तू काही डिस्काउंटमध्ये विकत घेऊन इतरांच्या माथी मारायच्या, निव्वळ काही पैशांच्या मोबदल्यात हा प्रकार लोकांच्या पसंतीस उतरू लागला यातीलच एक दादा कंपनी म्हणजे अॅमवे ही कंपनी!

 

amway 1

 

ईडीने याच कंपनीवर कारवाई केली आहे, ईडीने ७५७ करोड इतकी संपत्ती जप्त केली असून, कंपनीवर मनी लौंड्रीन्गचे आरोप देखील केले आहेत.

कारवाई करण्यामागचं कारण :

मिडीयाशी बोलताना ED चे अधिकारी असं म्हणाले की ही कंपनी, डायरेक्ट सेलिंगच्या नावाखाली पिरॅमिड स्कीम चालवत आहे तो एक  फसवणुकीचा प्रकार आहे. यात केलेल्या चौकशीतून असं कळले की कंपनीचे सदस्य इतर लोकांना जोडून कंपनीच्या वस्तू फक्त कागदोपत्री विकत आहेत. कंपनीने तयार केलेल्या वस्तू बाजारात उपलब्ध असलेल्या वस्तूंपेक्षा अतिशय महाग आहेत.

 

amway 4 im

 

लोकांची फसवणूक कशी होते?

कंपनीचा मुख्य उद्देश हा वस्तूंमधील विविधतेवर भर न देता केवळ लोकांना जोडणे आणि त्यांना मोठमोठाली स्वप्न दाखवून त्यांच्याकडून सुरवातीला रजिस्ट्रेशनच्या नावाने पैसे उकळणे. या चेन मार्केटिंगच्या नादात हजारो जण कंपनीशी जोडले जातात, पर्यायाने प्रत्येकाचे डिपॉझिट कंपनीला मिळते.

मोबदल्याच्या नादात हे विक्रेते घरोघरी जाऊन उत्पादनांची विक्री करतात, त्यातून होणारा नफा हा अर्थातच कंपनीच्या खिशात जातो.

लोकांना पूर्णपणे कंपनीची माहिती न सांगता सेमिनार्समधून अथवा घरोघरी जाऊन कंपनीचे मोठे अधिकारी इतरांना कंपनीचे सदस्य बनवतात. वर म्हटल्याप्रमाणे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहरेची स्वप्न दाखवून त्यांना यात ओढले जाते. एखादी व्यक्ती जर सदस्य बनली की तिला वस्तू घेण्यास सांगतात आणि त्यावस्तू इतरांना विकण्यासाठी सांगतात.

 

amway 2

 

वस्तुस्थिती अशी आहे की सदस्य जितके जास्त या वस्तू विकतील तितके कमिशन त्यांच्या सिनियर (अपलाइन) मंडळींना मिळते. आणि महत्वाचे म्हणजे अपलाइन मंडळींना मिळणाऱ्या कमिशनमुळे वस्तूंच्या किमती वाढतात.

पिरॅमिड योजना आहे तरी काय?

सरकारने अचानक बंदी घातलेल्या या योजनेमध्ये नेमकं काय आहे? तर यामध्ये मनी सर्क्युलेशनने पैसे फिरवले जातात म्हणजे काय? तर लोकांना कंपनीशी जोडून त्यांच्याकडून ‘रजिस्ट्रेशन फी’ स्वरूपात पैसे घेतले जातात, आणि एखादी व्यक्ती जर कंपनीची सदस्य बनली तर त्या व्यक्तीला कमिशन दिले जाते.

याचंच एक सोपं उदाहरण बघुयात कंपनीने ‘अ’ नावाच्या व्यक्तीकडून १०००रुपये घेऊन त्याला सदस्य बनवून घेतले, तर ‘अ’ नावाच्या व्यक्तीला असे सांगण्यात येते की तू आणखीन दोन जणांना सामील करून घेतलेस तर कंपनी तुम्हाला १५०० रुपये कमिशन म्हणून देईल, तसेच भविष्यात ‘अ’ या व्यक्तीने आणखीन लोक जोडले तर जास्त कमिशन ‘अ’ या व्यक्तीला मिळेल.

सुरवातीला कमिशनच्या नावाखाली बरीच आमिष दाखवली जातात मात्र लोकांकडून घेतलेला पैसे लोकांकडेच फिरवला जात असल्याने हा एक प्रकारचा घोटाळा आहे हे सिद्ध झालं आहे.

 

pyramid inmarathi

 

डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय?

थोडक्यात म्हणजे आपण जसे किराणा मालाचे सामान दुकानातून घेतो तसेच डायरेक्ट सेलिंग कंपन्या आपला माल ग्राहकांना त्यांच्या एजन्टकडून विकतात, त्या एजन्टला त्याचे कमिशन मिळते.

कंपनीच्या या एजन्टने त्याच्या खालोखाल जर अनेक ग्राहकांना जोडले तर त्या एजन्टला त्याचा नफा मिळतो. याचाच अर्थ एक व्यक्तीला जोडणे तो आणखीन त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना जोडेल अशा पद्धतीने लोकांना जोडून नफा मिळवणे, असं या योजनेचे गणित आहे.

 

direct selling inmarathi

 

सरकारने काही महिन्यांपूर्वी या दोन्ही योजनांवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते, सरकारचं असं म्हणणं आहे की यासारख्या योजनांमधून केवळ ग्राहकांची फसवणूक होऊ शकते.

याचाच परिपाक म्हणजे लोकांचे जीवमान सुधारण्याची स्वप्न दाखवणाऱ्या या कंपनीला आता स्वतःच्याच भविष्याची चिंता वाटत आहे, ईडीने केलेल्या कारवाईत ५७५ करोड रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आता या प्रकरणात कंपनीनेही आपली बाजू मांडली असून कारवाईचा शेवट नक्की कोणाच्या बाजूने होणार हे येणारा काळ ठरवेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?