' निवृत्तीनंतरही दरमहिना उत्पन्न मिळण्यासाठी काय करावं? या टिप्सचा नक्की वापर करा – InMarathi

निवृत्तीनंतरही दरमहिना उत्पन्न मिळण्यासाठी काय करावं? या टिप्सचा नक्की वापर करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मंडळी..आपण शिकतो,नोकरी करतो ,पैसे कमावतो पण आपण आपले पैसे गुंतवण्यात मात्र कमी पडतो.कमावलेले पैसे जर वेळेत गुंतवले किंवा मिळणाऱ्या रक्कमेची जर योग्य बचत(सेव्हिंग्स) होत राहिली तर तेच पैसे आपल्याला आपल्या भविष्यात मदतीला येऊ शकतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे आता आपण ज्या कार्यक्षमतेने काम करतोय किंवा जे काम करतोय तेच काम आपण पुढच्या वीस वर्षांनी तितक्याच क्षमतेने करू शकत नाही.त्यामुळे आता आपल्याला मिळणाऱ्या पैशातून सेव्हिंग्स करणे हे येणाऱ्या काळाची गरज आहे.

 

savings inmarathi

 

विशेषतः आपल्या निवृत्तीनंतर आपल्याला नियमीतपणे मिळणारे वेतन बंद होते.त्या काळात खर्चाचे आर्थिक गणितं जुळवण्यास जरा धांदल उडू शकते.अश्या वेळी योग्य वेळी केलेली सेव्हिंग्स किंवा गुंतवलेले पैसे आपल्याला उपयोगी पडू शकतात..

चला तर मग.. रिटायरमेंट नंतर गुंतवणूक कुठे करायला हवी ?, सर्वसामान्य नागरिकासाठी गुंतवणुकीचे पर्याय कोणते आहेत ? हे सर्व आपण जाणून घेऊयात..

*एफडी(FD):मुदत ठेव*

जेव्हा एखादी व्यक्ती विशिष्ट वेळेसाठी विशिष्ट रक्कम बँकेत जमा करते तेव्हा त्याला एफडी(FD) म्हणतात. भारतातील अनेक बँका ही सुविधा देत आहेत. बचत खात्यात जमा केलेल्या रकमेपेक्षा FDमध्ये जमा केलेली रक्कम जास्त आहे.

 

FD IM

FDचे फायदे:

1.आपण त्यात जमा केलेली रक्कम वेळेपूर्वीच तोडली जाऊ शकते.
2.एफडीमध्ये जमा झालेल्या रकमेवरही अधिक व्याज दिले जाते.
3.मुदत ठेवीसह, आपले पैसे सुरक्षित आहेत.
4.आपली एफडी पूर्ण झाल्यावर, त्याचे नूतनीकरण करून आपल्याला अधिक फायदा होऊ शकेल.
5.साध्या एफडी दरमहा व्याजासह उत्पन्न असू शकते.

*म्युच्युअल फंड ( Mutual Fund)*

म्युच्युअल फंड हा एक गुंतवणूकीचा पर्याय आहे. गुंतवणूकदार कर बचत, संपत्ती निर्माण करणे, नियमित उत्पन्न मिळवणे हे उदिष्टे साध्य करू शकतात.समभाग (Equity Shares) निगडित म्युच्युअल फंड योजना मध्ये शेअर बाजाराची आणि कंपनीच्या व्यवसायाची जोखिम अंतर्भुत असते व कर्जरोखे (Bonds) निगडीत योजना मध्ये व्याज दराचे बदलाची व पतदर्जाची/ दीवाळखोरीची जोखिम अंतर्भुत असते. समभाग निगडीत योजनांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या जास्त जोखिम असते.

 

mutual funds inmarathi
the financial express

 

थोडक्यात काय तर निवृत्तीनंतर काम करणे आवश्यक नाही. तुम्ही काम न करताही पैसे कमवू शकता. यासाठी तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता कारण तो सुरक्षित पर्याय आहे.

*राष्ट्रीय पेन्शन योजना – (National Pension Scheme)*

नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) ही स्वैच्छिक सेवानिवृत्ती बचत योजना आहे, जी लोकांना मोठा दिलासा देते. जर तुम्हाला तुमच्या पत्नीच्या नावावर खाते उघडायचे असेल, तर या योजनेत तुम्ही कोणतीही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता.EPF प्रमाणेच NPS वर कर लागत नाही. या दोन्ही योजनांचा हा पहिला फायदा आहे.

 

pension inmarathi

 

निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी म्हणूनच नॅशनल पेन्शन स्कीम महत्त्वाचा पर्याय ठरते. यामध्ये गुंतवलेल्या पैशांपैकी ६०% रक्कम ही निवृत्तीनंतर काढता येते आणि उरलेली रक्कम दरमहा घेते येते. ज्यांना निवृत्तीनंतर सगळे पैसे एकत्र हातात घेण्याची इच्छा असेल, ते या योजनेचा विचार करू शकतात.

या योजनेत गुंतवलेल्या पैशांपैकी काही रक्कम इक्विटीमध्ये गुंतवली जात असली, तरी या योजनेतली एकूण जोखीम तशी कमी आहे.
लोकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना आणली आहे. या योजनेत तुमचे पैसे सुरक्षित राहतात.

*कर्मचारी भविष्य निर्वाह निधी – (Employee’s Provident Fund)*

गुंतवणूक करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शेअर बाजाराशी संबंध असणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये काही प्रमाणात धोका हा असतोच. म्हणून कोणत्याही प्रकारची जोखीम नसणाऱ्या EPF मध्ये गुंतवणूक करण्याचा फायदा लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. केंद्र सरकार दरवर्षी या भविष्य निर्वाह निधीसाठीचा एक विशिष्ट व्याजदर जाहीर करतं.

 

epf inmarathi
indianmoney.com

गेल्या काही वर्षांमध्ये या व्याजदरांमध्ये घट झाली असून भविष्यातही घट होण्याची शक्यता आहे.मात्र केंद्र सरकारचा या गुंतवणुकीच्या पर्यायात थेट संबंध असल्याने काही प्रमाणात सुरक्षीतता आहे.

*पीपीएफ (PPF)*

निवृत्तीनंतर पीपीएफ हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला फक्त पैसे जमा करावे लागतील आणि तुम्ही व्याज घेत राहाल. त्याचा व्याजदर ८.७ टक्के आहे आणि त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे व्याज पूर्णपणे करमुक्त आहे. तुम्ही बँक आणि पोस्ट ऑफिसमधून PPF उघडू शकता. याचा लॉक-इन कालावधी १५ वर्षांचा आहे.

 

ppf inmarathi

 

*ज्येष्ठ नागरिक बचत योजना*

वयाच्या ६० वर्षानंतर या योजनेत गुंतवणूक करता येते. याशिवाय, जर एखाद्या कर्मचाऱ्याने स्वेच्छानिवृत्ती सेवा (VRS) घेतली असेल, तर ते वयाच्या ५५ ​​व्या वर्षापासून त्यात गुंतवणूक करू शकतात.

 

senior-citizens-inMarathijpg

यामध्ये एक व्यक्ती जास्तीत जास्त १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकते. या गुंतवणुकीवर आयकर सवलत मिळते. डिसेंबर २०१८ला संपलेल्या तिमाहीसाठी, योजनेवर वार्षिक८.७  टक्के दराने व्याज मिळते.

यांसारख्या अनेक गुंतवणुकीच्या व बचतीच्या पर्यायांचा वापर करून आपण आपले निवृत्तीनंतरचे जीवन आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर बनवू शकतो…!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?