' महागाईने सामान्यांना ‘पिळून’ काढणाऱ्या लिंबाचा भाव यंदा का वधारलाय? – InMarathi

महागाईने सामान्यांना ‘पिळून’ काढणाऱ्या लिंबाचा भाव यंदा का वधारलाय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या प्रचंड उकाड्याने आपण सगळेच हैराण झालोय. उन्हाळा म्हटला की घराघरांत दुपारच्या चहाच्या वेळी हमखास लिंबू सरबत घेतलं जातं.

 

lemon water InMarathi

 

मात्र यंदाचा उन्हाळा काही वेगळाच आहे. सध्या लिंबाचे काहीच्या काही वाढलेले भाव बघून सगळ्यांचेच धाबे दणाणलेत. एरव्ही १० रुपयांत ४-५ लिंबं विकत घेता येतात. पण आता उन्हाळ्यात जेव्हा आपल्याला लिंबांची सर्वाधिक गरज आहे तेव्हा एक लिंबू १०-१५ रुपयांना मिळतंय.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सर्वसामान्यांसाठी ही भाववाढ अनाकलनीय आहे त्यामुळे लोकांना आता लिंबासारखी साधी गोष्टही परवडेनाशी झालीये. मुस्लिम बांधवांचा सध्या रमझानचा महिना चालू असल्यामुळे त्यांना आहारात लिंबू लागतंच आहे. लिंबू इतकं महागलंय की त्याची आता थेट पेट्रोल, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, सोनं यांच्याशी स्पर्धा होतेय.

 

lemon im

 

या सगळ्या परिस्थितीत सोशल मीडियावर मात्र लिंबाच्या भाववाढीवरच्या मिम्सनी धुमाकूळ घातलाय. भारत हा लिंबांचं सर्वाधिक उत्पन्न करणारा देश असताना ही अशी परिस्थिती का उद्भवली आहे?

लिंबांच्या जगातल्या उत्पादनातलं सुमारे १७% उत्पादन भारतात होतं. आपल्या देशात आंध्र प्रदेशात लिंबाचं उत्पादन सर्वाधिक होतं.देशभरात दररोज जवळपास एका ट्रकमध्ये २१ टन लिंबांचा माल अशा २५ ट्रकांमधून माल पुरवला जातो. तोच माल सध्या केवळ ५च ट्र्क पुरवला जातोय इतका लिंबांचा पुरवठा कमी होतोय.

लिंबाचं उत्पादन वर्षातून तीनदा घेता येऊ शकतं. पण उन्हाळ्यात लिंबांना सर्वाधिक मागणी असल्यामुळे उन्हाळातलं उत्पादन सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं.

 

lemon 1 im

 

देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये लिंबू कमालीचं महागलंय. सध्या महाराष्ट्रातल्या शहरांमधले एका लिंबाचे दर पाहून घाम फुटेल अशी परिस्थिती आहे. मुंबईत १ लिंबू ८ ते १५ रुपयांना, पुण्यात ८ ते १० रुपयांना, कोल्हापूरमध्ये ८ ते १० रुपयांना, नाशिकमध्ये १० ते १२ रुपयांना, तर विदर्भात आणि नागपूरमध्ये १० रुपयांना एक लिंबू मिळतंय. लिंबांचे दर इतके वाढण्यामागे नेमकी काय कारणं आहेत? जाणून घेऊ.

गेल्या २ वर्षांच्या कोरोना काळात लिंबू उत्पादकांचं खूप नुकसान झालंय. ते वेळेवर औषधं, फवारणी, खत आणि त्याचं जे व्यवस्थापन असतं ते करू शकलेले नाहीत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अवकाळी आलेल्या पावसाने लिंबाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं.

 

lemon farming im

 

५ लाखाला मिळणाऱ्या एका ट्रकची किंमत आजच्या घडीला ३१ लाख रुपये आहे.

वेळीच सावरलं नाही, तर आपल्या शेजारील आणखीन एका राष्ट्रावर ओढवेल आपत्ती

सोन्याची लंका म्हणून ओळखला गेलेला देश आज या कारणांमुळे कर्जबाजारी झालाय

दुसरं कारण आहे, फेब्रुवारीनंतर भयानक वाढलेलं तापमान! महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश या लिंबू उत्पादक राज्यांमधला जीवघेणा उष्मा याला कारणीभूत ठरलाय. प्रचंड उष्णतेपायी अनेक पिकांचं नुकसान झालंय. उभ्या राहिलेल्या पिकांचीही या सगळ्यात वाट लागलीये. नुकत्याच झालेल्या गुजरातमधल्या वादळाचाही लिंबाच्या पिकावर विपरीत परिणाम झालाय.

 

climate im

 

लिंबाचे दर वाढण्यामागे पेट्रोल, डिझेल, सीएनजी यांच्या वाढत्या किंमतींमुळे वाहतूक खर्च वाढलाय आणि त्यामुळे भाजीपाला महागलाय हे देखील कारण आहे.

आणखी एक कारण म्हणजे मागणीच्या मानाने पुरवठ्यात झालेली प्रचंड घट. मागणी-पुरवठ्यातल्या तफावतीमुळे फेब्रुवारी महिन्यात ५०-६० रुपयांना मिळणाऱ्या लिंबांचे भाव आता थेट २००-३०० रुपयांपर्यंत पोहोचल्याचं म्हटलं जातंय.

दोन वर्षांच्या कोरोनाकाळात लिंबांचं उत्पादन बऱ्यापैकी असलं तरी बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना कुठलाच फायदा झाला नाही. त्यांचा उत्पादन खर्चदेखील निघाला नव्हता. यावर्षी बाजारभाव चांगला असला तरी अतिवृष्टी आणि धुक्यामुळे हस्त बहरातली लिंबाची फळं केवळ ५ ते १० % च निघाली. पण देशभरातून सुमारे ३१.१७ लाख टन लिंबांचं उत्पादन दरवर्षी घेतलं जातं त्यामुळे वाढलेल्या भाववाढीचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकेल.

 

lemon farm im

 

शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी असं म्हटलंय की सलग दोन्ही बहर गळून गेलेल्या दुर्मिळ वर्षांपैकी हे एक वर्ष आहे. मे महिन्यात नवं पीक येईल तेव्हा लिंबांचे हे वाढलेले दर कमी होतील अशी आशा ते व्यक्त करत आहेत. पण त्यासाठी आधी हे तीव्र ऊन कमी व्हायला हवं.

लिंबासारख्या दैनंदिन वापरातल्या गोष्टींच्या किंमती अशा गगनाला भिडू लागल्या तर जगणं अवघड होईल. त्यामुळे हे भाव लवकरात लवकर पूर्ववत होतील अशी आशा करूया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?