' प्रभू श्रीरामांच्या नावे असलेल्या नोटा या देशात चलनात आहेत – InMarathi

प्रभू श्रीरामांच्या नावे असलेल्या नोटा या देशात चलनात आहेत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

तुम्हाला हे माहीतच असेल की जगभरातील विविध देशांच्या चलनावर विविध व्यक्तींची, चिन्हांची किंवा अन्य प्रतिमांची चित्रे आढळतात.

भारतातल्या सगळ्या नोटांवर आपल्याला महात्मा गांधींचे छायाचित्र दिसते.

त्याचप्रमाणे प्रत्येक देशाच्या नोटांवर व्यक्ती किंवा तेथिल झेंड्याचे चित्र दिसून येते.

या नोटांवर जे छायाचित्र असते, ते बदलता येत नाही, आणि अशा नोटांवर देवाधिकांचे चित्र ठेवता येत नाही हे नियम तुम्हाला नक्कीच ठाऊक असतील.

पण आज आम्ही तुम्हाला अश्या एका चलनाबद्दल माहिती देणार आहोत ज्यावर चक्क प्रभू रामांची प्रतिमा आणि रामनाम आहे. काय विश्वास बसत नाही?

पण हे खरं आहे.

तर ही रंजक गोष्ट तुम्ही जाणून घेतलीच पाहिजे.

 

ram-currency inmarathi
jagran.com

 

हे चलन कोणत्याही देशाचे अधिकृत चलन नाही.

प्रभू रामांना मानणाऱ्या एका संस्थेमार्फत हे चलन जारी करण्यात येते.

नेदरलँड्समध्ये महर्षी महेश योगी यांची द ग्लोबल कंट्री ऑफ वर्ल्ड पीस’ ही संस्था स्थित आहे.

या संस्थेने २००२ सालापासून प्रभू रामांच्या नावे असलेल्या नोटा वापरात आणण्यास सुरुवात केली.

 

ram-currency-inmarathi
globalgoodnews.com

 

ही स्वयंसेवी संस्था जगभरात प्रसिद्ध असून या संस्थेचे लाखो अनुयायी आहेत.

प्रभु श्रीरामांवर या सा-यांची भक्ती असते.

अभ्यासकांच्या मते, अमेरिकेतही या संस्थेचे अनुयायी या नोटांचा वापर करतात.

संस्थेमार्फत मेडिटेशन, अध्यात्म यांबद्दल शिक्षण दिले जाते आणि जगात शांती कायम राहावी या दृष्टीने विविध माध्यमांतून प्रसार केला जातो.

संस्थेमार्फत जारी करण्यात आलेल्या या नोटांचा अनेक अमेरिकन आणि युरोपियन देशांमध्ये प्रसार करण्यात आला आहे आणि लोक त्यांचा वापर करतायेत हे विशेष!

 

(महर्षी महेश योगी) tmhome.com

 

१, ५ आणि १० या किंमतीमध्ये उपलब्ध असलेले हे चलन अतिशय आकर्षक असून प्रत्येक रामभक्ताला भुरळ घालणारं आहे.

चकाकणाऱ्या रंगांचा वापर केल्याने नोट अधिक सुंदर भासते.

नोटेवर राम राज्य मुद्रा असा उल्लेख असून प्रभू रामांची प्रसन्न प्रतिमा देखील छापण्यात आली आहे. सोबतच हिंदू धर्मातील पूज्यनीय कामधेनु गाय आणि कल्पवृक्ष देखील नोटेवर पाहायला मिळतो.

ज्या नेदरलँड्समध्ये ही संस्था आहे तेथील जवळपास ३० गावांमध्ये आणि १०० पेक्षा अधिक शहरांमध्ये अधिकृत चलनाप्रमाणे खरेदी-विक्रीसाठी या नोटेचा वापर होतो.

 

ram-currinmarathi
jagran.com

 

येथील सरकारने देखील या चलनाचा वापर वैध ठरवला आहे, याचमुळे नेदरलँड्सच्या दुकानांमध्ये एक राममुद्रेच्या बदल्यात दहा युरो मिळतात.

अहवालानुसार तब्बल १ लाख लोक या राम मुद्रेचा वापर करत आहेत.

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ व्यवहारासाठीच या चलनाचा वापर होतो असे नाही तर लोक बँकेत देखील या नोटा जमा करू शकतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?