' तलवारप्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, पण या आधीच्या घटनांविषयी तुमचं मत काय? – InMarathi

तलवारप्रकरणी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, पण या आधीच्या घटनांविषयी तुमचं मत काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गुढीपाडव्याच्या दिवशी शिवतीर्थावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली जाहीर सभा चांगलीच गाजली. या सभेत त्यांनी मांडलेल्या काही मुद्द्यांवर टीका झाली, तर काही प्रश्न उपस्थित झाले. काल, या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्यांनी ठाण्यात पुन्हा एकदा एक जाहीर सभा घेतली, या सभेला लोकांनी तुडुंब गर्दी केली होती.

राज ठाकरे सभेच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर भगवी शाल आणि तलवार देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले, तीच तलवार त्यांनी म्यानातून बाहेर काढून दाखवली. या कृतीमुळे आज राज ठाकरेंविरोधात ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

जाहीर सभेत राज ठाकरे यांनी म्यानातून तलवार काढून दाखवल्याने त्यांनी आर्म्स ऍक्टचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. तलवार दाखवल्याप्रकरणी शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत त्यांच्यासह १० जणांवर ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावर मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कारण या आधी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी सभांमध्ये तलवारी दाखवल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांना फक्त गुन्ह्यात अडकवण्याची ही चाल आहे, असे मनसे नेत्यांचे म्हणणे आहे.

 

raj thackrey im

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, सोनिया गांधी यांनीदेखील आतापर्यंत सभांमधून तलवारी दाखवल्या आहेत, मग यावेळेसच गुन्हा दाखल का झाला, असा प्रश्न मनसेचे नेते विचारत आहेत. यावर तुमचं मत काय?

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?