' ट्रेडिंग करतेवेळी निर्णय घेण्यात इंडिकेटर कसं उपयोगी पडतं: सांगतायत नीरज बोरगांवकर – InMarathi

ट्रेडिंग करतेवेळी निर्णय घेण्यात इंडिकेटर कसं उपयोगी पडतं: सांगतायत नीरज बोरगांवकर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

शेअर मार्केट म्हंटलं की आपल्या मनात असंख्य प्रश्न उभे राहतात. नेमकी गुंतवणूक कशी करावी? शेअर्समध्ये गुंतवणूक करावी की म्यूचुअल फंडमध्ये? किती काळासाठी पैसे गुंतवावे? त्यात रिस्क किती? पैसे बुडणार तर नाही ना?

अशा असंख्य प्रश्नांचं निरसन गेली १५ पेक्षा जास्त वर्षे इन्व्हेस्टमेंट गुरु नीरज बोरगांवकर त्यांच्या गुंतवणूक कट्टा या उपक्रमातून करत आहेत.

 

neeraj borgaonkar 2 IM

 

अगदी सामान्यातल्या सामान्यांनासुद्धा अवघड गोष्ट सोपी करून सांगणाऱ्या नीरज बोरगांवकर हे आज आपल्याला शेअर मार्केटविषयी अशीच काही रंजक माहिती देणार आहेत, चला तर जाणून घेऊया ही गुरुकिल्ली नेमकी आहे तरी काय?

===

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी “टेक्निकल अ‍ॅनालिसिस”चा वापर केला जातो. टेक्निकल अ‍ॅनालिसिस हे शेअरचा भाव भविष्यात कुठे जाऊ जाऊ शकेल याचा अभ्यास करण्याचे शास्त्र आहे. हा अभ्यास करण्यासाठी शेअरच्या किमतीच्या चार्टची मदत घेतली जाते.

सोमवार ते शुक्रवार दररोज सकाळी सव्वानऊ ते दुपारी साडेतीन या वेळेमध्ये आपले शेअर मार्केट सुरु असते. या वेळामध्ये शेअर्सच्या किमतींमध्ये सतत चढ-उतार सुरु असतात. या सर्व चढ-उतारांची नोंद चार्टच्या माध्यमातून ठेवली जाते.

“हिस्टरी रिपीट्स इटसेल्फ” अर्थात जे पूर्वी घडून गेलेले आहे त्याची भविष्यात पुनरावृत्ती होत राहणार हा “टेक्निकल अ‍ॅनालिसिस” या शास्त्राचे प्रमुख आधार आहे. जेव्हा आपण विविध शेअर्सच्या चार्टस्‌चा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला असे लक्षात येते की चार्टमधील चढ-उतार हे काही विवक्षित पॅटर्न्सनुसार होतात.

 

share market charts Im

 

शेअरच्या भावामध्ये पूर्वी झालेल्या चढ-उतारांचा गणिती अभ्यास करुन काही इंडिकेटर्स विकसित करण्यात आलेले आहेत. हे इंडिकेटर्स पूर्वीच्या डेटाचा अभ्यास करुन चार्टवर कोणता पॅटर्न तयार होत आहे याची पूर्वसूचना देतात. इंडिकेटर्स म्हणजे काय हे समजण्याकरिता एक उदाहरण देतो. अशी कल्पना करा, की समजा तुम्ही गाडी चालवित आहात. तुमच्या पुढेच अजून एक दुसरी गाडी जात आहे.

समजा या गाडीचा डाव्या बाजूच्या केशरी दिव्याची उघडझाप व्हायला लागली की आपल्याला समजते, की ही गाडी आता डावीकडे वळू शकते.

म्हणजेच आपल्याला एक इंडिकेशन किंवा सूचना मिळते. अगदी त्याचप्रमाणे शेअरचा भाव भविष्यात वर किंवा खाली जाऊ शकणार असेल तर त्याची सूचना आपल्याला चार्टवर लावण्यात आलेले हे इंडिकेटर्स देतात. आणि ते बघून आपण आपले ट्रेडिंगचे निर्णय घेऊ शकतो.

इंडिकेटर्सचे दोन प्रकार आहेत

1 – लॅगिंग इंडिकेटर्स

2 – लीडिंग इंडिकेटर्स

पहिल्या प्रकारचे लॅगिंग इंडिकेटर्स ज्यामध्ये “मूव्हिंग अ‍ॅव्हरेज”, “सुपरट्रेंड”, “बोलिंजर बॅंड” इत्यादींचा समावेश होतो. हे इंडिकेटर्स ट्रेंड सुरु झाल्यानंतर काही काळाने आपल्याला त्या ट्रेंडचे इंडिकेशन देतात.

यामध्ये मिळणारे इंडिकेशन्स ट्रेंडची बर्‍यापैकी चांगली माहिती देतात. परंतु हे इंडिकेशन आपल्याला थोडेसे उशीरा मिळत असल्यामुळे आपल्याला ट्रेंडचा सुरुवातीपासून फायदा मिळवता येत नाही.

दुसर्‍या प्रकारचे लीडिंग इंडिकेटर्स ज्यामध्ये “आरएसआय”, “कमॉडिटी चॅनल इंडेक्स”, “स्टॉकॅस्टिक ऑसिलेटर”, इत्यादींचा समावेश होतो. हे इंडिकेटर्स ट्रेंड सुरु होण्याची शक्यता असेल तेव्हाच आपल्याला त्या ट्रेंडचे इंडिकेशन देतात.

यामध्ये आपल्याला भरपूर ठिकाणी इंडिकेशन मिळते, परंतु या सर्व इंडिकेशन्सची अ‍ॅक्युरसी लेव्हल कमी असते. त्यामुळे आपल्याला चुकीचे सिग्नल मिळण्याची शक्यता यामध्ये जास्त असते.

लॅगिंग व लीडिंग या दोन्ही प्रकारच्या इंडिकेटर्सचे काही फायदे आहेत तर काही तोटे! आपल्याला यशस्वी ट्रेडिंग करायचे असेल तर दोन्ही प्रकारचे इंडिकेटर्स कसे काम करतात हे आधी नीट समजून घेतले पाहिजे आणि दोन्हींचा समतोल साधून आपले ट्रेडिंग निर्णय घेतले पाहिजेत.

शेअर मार्केटमध्ये व म्युच्युअल फंडांमध्ये यशस्वी काम करणे अतिशय सोपे आहे. हे करण्यासाठी असंख्य वेगवेगळ्या पद्धती व स्ट्रॅटेजीज्‌ असतात. आपल्याला जर शेअर बाजारामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपण या पद्धती व्यवस्थित शिकून घेतल्या पाहिजेत.

गुंतवणूक कट्टा या उपक्रमाद्वारे तुम्हाला अश्या विविध पद्धती शिकण्याची संधी मिळते. गुंतवणूक कट्ट्याबद्दल अधिक माहिती नियमितरित्या मिळवण्यासाठी पुढील लिंकवरील फॉर्म भरावा म्हणजे गुंतवणूक कट्ट्याचे नियमित अपडेट्स तुम्हाला मिळत जातील – https://marathimarket.in/user-form

 

neeraj borgaonkar 2 IM

अजून एक महत्वाचे

शेअर बाजारामध्ये “इंट्राडे ट्रेडिंग” करणे तुम्हाला सोयीचे जावे याकरिता तुम्ही आमचा RTSS हा टेलिग्राम चॅनल जॉईन करु शकता. सध्या या RTSS टेलिग्राम चॅनलची दोन आठवड्यांची फ्री ट्रायल उपलब्ध आहे.

पुढील लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला ही फ्री ट्रायल मिळवता येईल – https://marathimarket.in/free-trial

फ्री ट्रायल घेण्याकरिता पहिले टेलिग्राम हे अ‍ॅप तुमच्याकडे इन्स्टॉल करुन घ्या आणि मग वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा. हे केल्यानंतर तुम्हाला START असे बटण दिसेल, त्यावर क्लिक करुन पुढे मिळणार्‍या सूचनांचे पालन करा म्हणजे तुम्ही आपला RTSS हा टेलिग्राम चॅनल जॉईन करु शकाल.

हे करीत असताना काही शंका आली तर आम्हाला connect@guntavnook.com येथे एक ईमेल करा म्हणजे तुमची शंका सोडवून दिली जाईल.

===

टीप : वरील माहिती ही फक्त आणि फक्त तुमच्या ज्ञानात भर पडावी याच उद्देशाने दिली गेली आहे. या माहितीच्या आधारावर शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये, शेअर्समध्ये गुंतवणूक करताना तज्ञ मंडळी यांचा सल्ला घेऊन नीट अभ्यास करूनच गुंतवणूक करावी.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?