' 'ठाकरे' आडनावामागचा अज्ञात इतिहास आणि त्यांच्या वेगळ्याच स्पेलिंगमागील ब्रिटीश कनेक्शन

‘ठाकरे’ आडनावामागचा अज्ञात इतिहास आणि त्यांच्या वेगळ्याच स्पेलिंगमागील ब्रिटीश कनेक्शन

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ठाकरे! हे ऐकल्यावर किंवा वाचल्यावर ठाकरे घराण्यातल्या सगळ्याच व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतातच. संपूर्ण भारतात एकही माणूस असा नसेल ज्याला ठाकरे घराण्यातली एकही व्यक्ती ठाऊक नसेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

महाराष्ट्रातल्या तर प्रत्येकाला म्हणजे अगदी कळायला लागलेल्या लहान पोरापासून म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येकाला ठाकरे घराणं माहीत आहे. या ठाकरे घराण्यातली प्रमुख नावं म्हणजे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे आणि अमित ठाकरे!

 

thackray im

 

तुम्हाला माहिती असणारी माहितीच तुम्हाला परत एकदा थोडक्यात सांगण्याचा प्रपंच. प्रबोधनकार ठाकरे मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते.

बाळासाहेब ठाकरेंनी मराठी शिवसेना पक्षाची उभारणी केली. तसेच ते उत्तम वक्ते आणि व्यंगचित्रकार होते.

 

balasaheb 2 inmarathi

 

उद्धव ठाकरे हे सध्याचे महाराष्ट्राचे आणि शिवसेनेचे पहिलेच मुख्यमंत्री आहेत. ठाकरे घराण्यातले निवडणूक लढवून जिंकून येणारे आदित्य ठाकरे पहिलेच नेते.

 

uddhav thackary im

 

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. तेही बाळासाहेबांप्रमाणे उत्तम वक्ते आणि व्यंगचित्रकार आहेत. अमित ठाकरे सध्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आहेत.

 

raj im

 

समस्त ठाकरे घराण्याची माहिती केवळ एकाच आर्टिकलमध्ये बसणं केवळ अशक्य आहे. त्यामुळे वर जी माहिती दिली आहे ती फक्त ठळक माहिती आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्या दिलेल्या माहितीशिवाय प्रत्येक ठाकरे कुलोत्पन्नावर माहिती द्यायची ठरवली तर पुस्तकही कमी पडेल.

असो! पण हे कितीही खरं असलं तरी ठाकरे घराण्याचा इतिहास सर्वश्रुत नाही. म्हणजे त्यांचं पूर्वी काही वेगळं आडनाव होतं का? होतं तर ते काय होतं? त्यामागचा इतिहास काय? हे जाणून घेण्यासाठी हे आर्टिकल शेवटपर्यंत वाचा.

ठाकरे घराण्याचं मूळ कुठं आहे? त्यांनाच आणखी काही आडनावं होती का?

नाशिक जिल्ह्यामध्ये धोडप नावाचा किल्ला होता. त्या किल्ल्याचे किल्लेदार ठाकरे घराण्यातले एक पूर्वज होते. त्यांनी इंग्रजांशी निकराची लढाई केली होती. त्यामुळं त्यांची स्मृती म्हणून प्रबोधनकारांच्या आजोबांनी धोडपकर हे एक एक्सट्रा आडनाव लावलं होतं.

तसं बघायला गेलं तर ठाकरे घराणं पंत सचिवांच्या भोर संस्थानातल्या पाली गावचं. याबाबतीत प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये लिहून ठेवलं आहे. प्रबोधनकारांचे पणजोबा पूर्वी पाली गावात राहायचे. मात्र इस्टेटीच्या वादामुळं त्यांनी पाली गाव सोडलं आणि ते ठाण्याला वकील तिथं त्यांनी नावलौकिक मिळवला.

तो एवढा की न्यायाधीश सोडल्यास बाकीच्यांना कोणालाही बसायला खुर्ची नव्हती. सगळे खालीच बसायचे. मात्र प्रबोधनकारांच्या पणजोबांना म्हणजेच कृष्णाजी माधव उर्फ अप्पासाहेबांना बसायला खुर्ची मिळत होती.

त्यांचा मुलगा म्हणजे प्रबोधनकारांच्या आजोबांनीही कोर्टात नोकरी केली. पण त्यांची ठाण्याहून पनवेलला बदली झाली आणि मग ते तिथंच स्थायिक झाले. त्यामुळं आम्ही धोडपकरांचे पनवेलकर झालो असं प्रबोधनकार म्हणतात. पण आजोबांनी धोडपकर हेच आडनाव कायम वापरलं.

 

thackray family im

 

तरीही प्रबोधनकारांनी लिहिलं आहे की त्यांच्या वडिलांनी मात्र प्रबोधनकारांना शाळेत घालताना त्यांचं आडनाव ठाकरे असंच लावलं. तेच आजतागायत चालू आहे.

मूळ इतिहास तर समजला, पण Thackeray असं स्पेलिंग का?

सर्वसामान्य भारतीय कोणत्याही शब्दाचं स्पेलिंग इंग्रजीमध्ये करताना त्याच्या उच्चारानुसार करतो. मग असं असतानाही ठाकरे या शब्दाचं स्पेलिंग Thackeray असं का? ते तर Thakre किंवा Thakare असं असायला हवं नाही का?

खरं तर Thackeray या स्पेलिंगनुसार त्याचा उच्चार थॅकरे असा होतो. मग त्याचा उच्चार आपण ठाकरे असा का करतो? या स्पेलिंगच्या जडणघडणीमागे पण एक इतिहास आहे.

 

thackray 1 im

 

विल्यम मेकपीस थॅकरे या प्रसिद्ध ब्रिटिश कादंबरीकाराचा जन्म १७८१ मध्ये कलकत्त्यात झाला होता. त्यांचे वडील ईस्ट इंडिया कंपनीमध्ये कामाला होते. थॅकरे यांच्या कथा आणि कादंबऱ्यांवर काही मालिका आणि चित्रपटही निघाले होते. त्यांचं लिखाण हे मुख्यतः विडंबन आणि उपहासात्मक होतं. हीच गोष्ट प्रबोधनकार ठाकरेंना आवडत होती. त्या गोष्टीचे आणि थॅकरेचे ते चाहते असल्याने त्यांनी आपल्या आडनावाचे स्पेलिंग Thackeray असं करायला सुरुवात केली. त्यांच्या नंतरच्या पिढ्याही तेच स्पेलिंग सध्या वापरताना आपल्याला दिसतात.

म्हणूनच गेल्या अनेक दशकांपासून आपण या घराण्याचे नाव Thackeray असं लिहीत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?