' "माणसांची लायब्ररी" : एक असा प्रयोग जो ८५ हून अधिक देशांतील प्रत्येकाला थक्क करून सोडतोय

“माणसांची लायब्ररी” : एक असा प्रयोग जो ८५ हून अधिक देशांतील प्रत्येकाला थक्क करून सोडतोय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कथन हे संवादाचे एक शक्तिशाली साधन आहे, त्याचा योग्य वापर केल्यास, अंतर भरून काढण्यात मदत होऊ शकते.

एखाद्या गोष्टीबद्दलच्या अनुभवांची देवाणघेवाण केल्यास त्या गोष्टीबद्दलचे अथवा विषयाबद्दलचे आपले पूर्वग्रह बदलण्यास देखील मदत मिळू शकते. त्यासाठी कथाकथन हे माध्यम यासाठी जास्त सोयीस्कर आहे.

आपण आजवर अनेक विषयांची, संकल्पनांची अनेक छापील पुस्तके वाचली आहेत, पण त्यापेक्षा जर अशी पुस्तके आपल्या समोर बसून कथा, घटना, अनुभव सांगावे लागले, तर ते जास्त परिणामकारक असू शकेल आणि म्हणूनच, ज्ञानाची देवाणघेवाण करण्याच्या जुन्या कल्पनेवर आधारित ‘ह्युमन लायब्ररी’ (ज्याला जिवंत ग्रंथालय असेही म्हणतात) या नव्या संकल्पनेचा जन्म झाला.

 

human library im

 

ह्युमन लायब्ररी हे अगदी नियमित लायब्ररीसारखे आहे जिथे लोक पुस्तके वाचण्याऐवजी अनुभवण्यासाठी जातात. फरक एवढाच आहे की ही पुस्तके छापील नसून काही मानवी स्वयंसेवक आहेत ज्यांनी पुस्तकांप्रमाणे त्यांच्या अनुभवांबद्दल स्वारस्य असलेल्या प्रेक्षकांसमोर मोकळेपणाने बोलणे आणि त्यांना विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देणे निवडले आहे.

प्रत्येक स्वयंसेवक म्हणजे एका विशिष्ट विषयावरील पुस्तक असते. स्वारस्य किंवा रुची असलेले वाचक नियुक्त केलेल्या ठिकाणी (वेळ आणि ठिकाण आयोजकांद्वारे निश्चित केले जातात) काही ठराविक वेळेच्या कालावधीसाठी मानवी पुस्तक वाचू शकतात आणि विषयाबद्दल स्पष्ट चर्चा करू शकतात.

एका सेशन साठी तीस मिनिटे ही वेळ सर्वसामान्य प्रमाण आहे. निवडलेली जागा आरामदायक असावी आणि मोकळ्या आणि प्रामाणिक चर्चेसाठी पुरेशी गोपनीयता असावी हे याचे मुख्य नियम आहेत. वाचक आपण निवडलेल्या मानवी पुस्तकाला प्रश्न देखील विचारू शकतात ज्यांची उत्तरे मानवी पुस्तके त्यांना शक्य तितक्या चांगल्या प्रकारे देतात.

 

human library im2

 

जेव्हा वाचक पुस्तक पूर्ण करतात, तेव्हा ते पुस्तक परत करू शकतात आणि उपलब्ध असलेले दुसरे पाहू शकतात. मानवी ग्रंथालयाची सुरुवात २००० मध्ये रोनी आणि डॅनी अबर्गेल हे दोन भाऊ आणि सहकारी अस्मा मौना आणि क्रिस्टोफर एरिचसेन यांनी ‘रोस्किल्ड फेस्टिव्हल’, कोपनहेगन येथे केली होती.

ते ‘स्टॉप द व्हायोलन्स’ नावाच्या स्थानिक एनजीओ गटाचे सदस्य होते आणि त्यांच्या मित्राची हत्या झाल्यानंतर त्यांना ही कल्पना सुचली. पीअर ग्रुप एज्युकेशनद्वारे डॅनिश तरुणांना हिंसेविरुद्ध जागरूकता निर्माण करणे आणि एकत्रित करणे हे या संकल्पनेचे ध्येय होते.

रोस्किल्डचे तत्कालीन महोत्सव संचालक श्री. लीफ स्कोव्ह यांनी ‘Stop The Violence’ ला एक मानवी लायब्ररी तयार करण्यासाठी प्रोत्साहित केले जे हिंसाचार विरोधी प्रबोधन आणि परस्पर संवाद वाढवण्यावर लक्ष केंद्रित करू करेल.

मूलतः हिंसाचाराचा सामना करण्यासाठी एक कार्यक्रम म्हणून ह्या संकल्पनेचा जन्म झाला होता, परंतु सामाजिक अन्याय आणि भेदभाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठ म्हणून नंतर ती विकसित झाली आहे.

तेव्हा चार दिवस चाललेल्या या कार्यक्रमात १००० हून अधिक लोक सहभागी झाले होते आणि पन्नासहून अधिक मानवी पुस्तके उपलब्ध होती. जरी ते यशस्वी झाले असले तरी सुरुवातीला प्रगती खूपच कमी होती.

 

human library im1

 

२००८ मध्ये, ही संकल्पना यूएसए आणि कॅनडापर्यंत पोहोचली आणि तेव्हापासून ८५ हून अधिक देशांत तिचा प्रचार आणि प्रसार झाला आहे.

प्रत्येक “मानवी” पुस्तक त्यांच्या अनुभवांचा सारांश आपल्या वाचकाला सांगते, त्यांच्या दैनंदिन जगण्याचे वर्णन करते,जसे की ते त्यांच्या फावल्या वेळेत काय करतात, ते काय अनुभवतात, काय आणि कोणकोणते विचार करतात.

ही मानवी पुस्तके त्यांच्या कथेसाठी शीर्षक देखील निवडतात, ज्यामुळे ऐकणार्‍यासोबत चर्चा होण्यात आणि विषय चांगला समजण्यात मदत होऊ शकते.

प्रकल्पाची सर्वात वेगळी वैशिष्ट्ये म्हणजे त्याचा साधेपणा आणि आशावादी दृष्टीकोन. भूतकाळात या इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या लोकांचे या प्रकल्पाबद्दल असे निरीक्षण आहे, की ते सहभागी असलेल्या अनेकांसाठी गहन अनुभव असू शकतात.

यातील बहुतेक संभाषणे शांत वातावरणात होतात, जसे की लायब्ररी, बैठकीची खोली किंवा, ह्युमन लायब्ररीच्या आवारातील बाग. जेणेकरून बोलणे, ऐकणे आणि संवाद मोकळेपणाने होऊ शकेल.

 

human library im3

 

मानवी लायब्ररी ही एक अशी सुरक्षित संकल्पना आहे जिथे आपण आपल्या एखाद्या विषयीच्या पूर्वाग्रहांना आव्हान देऊ शकतो, विविधता एक्सप्लोर करू शकतो, आपण एकमेकांपासून कसे वेगळे आहोत हे जाणून घेऊ शकतो आणि त्याशिवाय कधीही भेटणार नसलेल्या लोकांशी संवाद साधू शकतो.

बेरोजगारी, आरोग्यविषयक शंका, नवीन आणि ट्रेंडिंग विषयांचे अज्ञान असे अनेक विषय मानवी वाचनालयातील ट्रेंडिंग विषय आहेत. अबर्गेलची ही कल्पना आत्ताच्या वायफाय युगातही बेस्ट सेलर बनली आहे.

मानवी ग्रंथालयाने ८५ हून अधिक देशांतील ग्रंथालये, संग्रहालये, उत्सव आणि शाळांमध्ये उपक्रम आयोजित केले आहेत. मानवी वाचनालयाअंतर्गत जगातील ५० पेक्षा जास्त भाषांमध्ये १००० हून अधिक मानवी पुस्तके वितरीत केली जातात.

भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात, एक मजबूत सामाजिक बांधणी विणण्यासाठी सहानुभूती आणि करुणा आवश्यक आहे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही की, मानवी लायब्ररी हे “पुस्तक” बनून वैयक्तिक भावना व्यक्त करण्याचा एक उत्तम मार्ग आहे ज्यातून इतर लोक नवनवीन अनुभव शिकतात.

ह्युमन लायब्ररीचे मुख्य आव्हान हे आहे की सर्वोत्कृष्ट कथा असलेले लोक सर्वोत्कृष्ट कथाकार असतीलच असे नाही. त्यामुळे आधी या मानवी पुस्तकांना प्रशिक्षण द्यावे लागते.

 

human library im4

 

माजी फार्मास्युटिकल व्यावसायिक अंदलीब कुरेशी यांनी मुंबई शहरात मानवी वाचनालय सुरू केले. जी आता खऱ्या आणि असंपादित कथांना जिवंत करण्यासाठी जागा बनले आहे.

“मला मुंबईत एक सुरुवात करायची होती कारण हे शहर आश्चर्यकारक वास्तविक जीवनातील कथांनी भरलेले आहे. माझ्यासाठी पुस्तकांची समस्या नेहमीच ही आहे, की ते एकतर्फी संवाद आहेत. परंतु इथे तुम्हाला आश्चर्यकारकपणे वास्तविक आणि मनोरंजक कथा ऐकायला मिळतात आणि अगदी तुमच्या ‘पुस्तकांशी’ संवाद साधता येतो, जे तुम्ही नियमित लायब्ररीत करू शकत नाही.

मुंबई बरोबर भारतात दिल्ली, हैदराबाद, इंदूर, चेन्नई आणि बेंगलोर सारख्या शहरातून मानवी वाचनालयाचा उपक्रम सुरू झाला आहे. अगदी कोरोना काळातही गुगल मीट द्वारे हा उपक्रम सुरू ठेवण्यात आला होता.

ह्युमन लायब्ररी, IMF सारख्या संस्था आणि Daimler, Heineken, Ebay आणि Microsoft सारख्या मोठ्या कॉर्पोरेशनसह कामगारांना शिक्षित करण्यासाठी, विविधता आणि सहिष्णुता वाढवण्यासाठी आणि सर्वसमावेशक कामाच्या वातावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी काम करते.

मित्रांनो आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि आपले अनुभव शेअर करण्यासाठी जागा शोधताय? मग आता ह्युमन लायब्ररी अर्थात मानवी वाचनालय आहे ना! या आणि बोला, ऐका , व्यक्त व्हा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?