' पोलिसांचा नाईलाज की कामगारांचा उद्रेक: ‘पर्लसिटी’च्या वादग्रस्त घटनेमागचं दाहक सत्य – InMarathi

पोलिसांचा नाईलाज की कामगारांचा उद्रेक: ‘पर्लसिटी’च्या वादग्रस्त घटनेमागचं दाहक सत्य

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या चित्रपट क्षेत्रात मोठा बदल घडतान आपण बघत आहोत. द काश्मिर फाईल्सने केलेली ऐतिहासिक कमाई पाहता आता येणारा काळ हा अशाच वास्तववादी सिनेमाचा असणार आहे हे कुणीही सांगेल!

याबरोबरच बॉलिवूडकडे लोकांनी आता पाठ फिरवून दाक्षिणात्य सिनेमाला पसंती दिली आहे. अल्लू अर्जुनच्या पुष्पाने भल्याभल्या लोकांना झोपवून टाकलं हे आपण पाहिलं.

 

pushpa 1 im

 

आता अशाच एका साऊथच्या दिग्दर्शकाकडून असाच एक वास्तववादी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याच सिनेमाविषयी आणि ती घटना नेमकी काय होती याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत!

वेत्रीमारन हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि चित्रपट निर्माते आहेत , जे तमिळ चित्रपट क्षेत्रात काम करतायत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

२०२१ पर्यंत, त्यांनी ७२ व्या व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमधून पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, आठ आनंद विकतन सिनेमा पुरस्कार, दोन फिल्मफेअर दक्षिण पुरस्कार आणि अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इटालिया पुरस्कार जिंकले आहेत.

अलीकडेच त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एका माहितीपटाच्या समर्थनार्थ एक पोस्टर शेअर केले आहे. या माहितीपटाचे नाव पर्ल सिटी मॅसेकर आहे.

 

pearlcity short film IM

पर्लसिटी म्हणजे नेमकं काय रे भाऊ?

पर्लसिटी म्हणजे थुथुकुडी (तुतिकोरीन) हे तामिळनाडूचे एक प्रसिद्ध शहर आहे, जे बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर वसलेले असून किनारी शहर असल्याने येथे अनेक बंदरे आहेत.

हे ठिकाण समुद्रकिनारी पसरलेल्या मिठाच्या चादरींसाठी देखील ओळखले जाते. ज्यावर प्रक्रिया करून मीठ तयार केले जाते. परंतु पांड्या राजवंशाच्या काळापासून मोत्यांच्या उत्पादनासाठी हे शहर जगप्रसिद्ध आहे. मोत्यांमुळे थुथुकुडीला ‘पर्ल सिटी’ म्हणतात.

 

pearlcity 2 IM

काय आहे पर्ल सिटी हत्याकांडाचे गूढ?

थुथुकुडी येथे स्टरलाइट कॉपर मेल्टिंग प्लांट हा तांबे वितळण्याचा कारखाना आहे. तेथे राहणार्‍या लोकांचा या वनस्पतीमुळे येथील वातावरण दूषित होत असल्याचे प्रदीर्घ काळापासून या प्लांटला विरोध होता. त्यामुळे तेथील लोकांना आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे.

असे तेथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे होते. काही संशोधन संस्था आणि तामिळनाडू प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्याची तपासणी सुरू केली असता स्टरलाइट थुथुकुडीची हवा, पाणी आणि मातीची हानी करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

२०१० साली मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा प्लांट बंद करण्यात आला होता. पण सर्वोच्च न्यायालयाने २०१३ मध्ये मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला. सुप्रीम कोर्टाने स्टरलाइटला १०० कोटींचा दंड ठोठावला.

 

sterlite IM

 

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचा (एनजीटी) निर्णय देखील स्टरलाइटच्या बाजूने लागल्या नंतर प्लांट पुन्हा सुरू करण्यात आला.

काही काळातच तामिळनाडू प्रदूषण नियंत्रण मंडळाने गॅस गळतीमुळे प्लांट बंद करण्यास सांगितले. मात्र तो प्लांट चालवणाऱ्या गटाने गॅस गळतीची घटना नाकारली. गॅस गळती झाली हे त्यांनी कधीच मान्य केले नाही.

पोलिस आणि आंदोलकांमध्ये संवादाचा अभाव :

मार्च-एप्रिल २०१८ मध्ये, थुथुकुडीमध्ये स्टरलाइटसारखा आणखी एक नवीन मेल्टिंग प्लांट सुरू होणार असल्याची चर्चा संपूर्ण गावामध्ये सुरू झाली. नागरिकांचा आधीच जुन्या प्लांटवर राग असल्याने दुसरा प्लांट सुरू होऊ नये म्हणून शहरात ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाली.

हे आंदोलन जवळ जवळ ९९ दिवस सातत्याने चालले . परंतु स्टरलाइट विरोधी आंदोलनाच्या १०० व्या दिवशी म्हणजे २२ मे २०१८ रोजी आंदोलनाला हिंसक वळण लागले.

 

thothokudi IM

 

आंदोलनकरी २० हजार लोकांचा जमाव घेऊन थुथुकुडी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचले मागण्या अमान्य होत असल्या कारणाने त्यांनी दगडफेक करण्यास आणि वाहने जाळण्यास सुरुवात केली.

प्रचंड असलेल्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी प्रथम लाठीचार्ज केला. मात्र त्याचा कोणताही परिणाम जमावा वर झाला नाही म्हणून नाइलाजास्तव पोलिसांनी गर्दीला नियंत्रित करण्यासाठी गोळीबार सुरू केला.

२२ आणि २३ मे रोजी झालेल्या या गोळीबारात एकूण १३ जणांचा मृत्यू झाला तर १०२ आंदोलनकरी जखमी झाले आहेत. पोलिसांच्या लाठीमाराने जखमी झालेल्या एका आंदोलकाचे पाच महिने कोमात राहिल्यानंतर ऑक्टोबर २०१८ मध्ये निधन झाले. या संपूर्ण घटनेला ‘पर्ल सिटी हत्याकांड’ असे नाव देण्यात आले.

 

sterlite 2 IM

आंदोलन कर्त्यांनाच आता स्टरलाइट पुन्हा चालू करायचा आहे?

२२ आणि २३ मे रोजी झालेल्या या पर्ल सिटी हत्याकांडानंतर तामिळनाडू सरकारने स्टरलाइट प्लांट कायमस्वरूपी बंद करण्याची घोषणा केली. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने सरकारचा हा निर्णय बाजूला ठेवत तामिळनाडू प्रदूषण मंडळाला स्टरलाइट पुन्हा सुरू करण्यास सांगितले.

फेब्रुवारी २०१९ मध्ये, हे प्रकरण NGT च्या अधिकार व कार्य क्षेत्राबाहेर आहे असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. यासोबतच त्यांनी या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयात जाण्याचे आदेशही एडीएमके पक्षकारांना दिले आहेत तेव्हापासून स्टरलाइट कॉपर मेल्टिंग प्लांट बंद आहे.

थोड्या कालावधी नंतर थुथुकुडी मधील तांत्रिक संस्थांनी केलेल्या अभ्यासात असे निदर्शनास आले की स्टरलाइट बंद होण्यापूर्वी आणि नंतर तेथील हवेच्या गुणवत्तेत फारसा फरक पडला नाही. हवेतील सल्फर डायऑक्साइडच्या प्रमाणातही त्यांना फरक अढळला नाही.

मात्र, हा प्लांट बंद झाल्यानंतर अनेक नवीन समस्यांना तेथील नागरीकांना तोंड द्यावे लागले. त्या प्लांटमध्ये काम करनारे २० हजार लोक तडकाफडकी बेरोजगार झाले.

 

sterlite 3 IM

 

या व्यवसायाशी संबंधित असलेल्या सुमारे एक लाख लोकांना याचा फटका बसला आणि भारतात चांगल्या प्रतीच्या तांब्याचे उत्पादन कमी झाले.

२०२१-२२ मधील काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, ज्यांनी स्टरलाइट बंद करण्यासाठी निदर्शने केली, त्यांना आता ती उघडायची आहे. स्टरलाइट प्लांट पुन्हा सुरू करण्यासाठी लोक याचिका करत आहेत.

तो प्लांट बंद पडल्याने त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावले गेले आणि तिथे पसरलेल्या साथीच्या रोगानंतर परिस्थिती वरचे वर वाईट होत गेली.

ह्या माहितीपटाचा उद्देश नेमका काय?

पोलिसांकडून २०१८ मध्ये झालेल्या गोळी बारामध्ये मरण पावलेल्या लोकांना न्याय मिळावा, या उद्देशाने हा माहितीपट तयार केला आहे या माहितीपटामध्ये या हत्याकांडाचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या लोकांशी चर्चा करण्यात आली आहे.

 

thothokudi truth IM

 

या प्रकरणावर नियंत्रण ठेवण्यात सरकार ला मिळालेले अपयश, आणि एकंदर संपूर्ण परिस्थिती यावरती प्रश्न उपस्थित केले जात असतानाच जनतेवरती बेछूट गोळीबार करणाऱ्या पोलिसांविरोधात काही च पुरावे नसल्याचीही चर्चा आहे.

या माहितीपटाचे लेखन आणि दिग्दर्शन एमएस राज यांनी केले आहे. राज यांनी याआधी ‘जल्लीकट्टू’वरील बंदीच्या निषेधार्थ मरिना बीचवर झालेल्या आंदोलनावर ‘मरीना पुराची’ नावाचा माहितीपट बनवला आहे. हा माहितीपट सेन्सॉर बोर्डाकडून मंजूर करून घेण्यात निर्मात्यांना बराच घाम गाळावा लागला .

आता एम.एस. राज ‘पर्ल सिटी हत्याकांड’ घेऊन येत आहे. त्यांना आमच्या टीमकडून माहिती पटासाठी हार्दिक शुभेच्छा!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?