' सचिनपेक्षाही दमदार क्रिकेट खेळणारा हा खेळाडू केवळ ‘एका’ कारणामुळे पडला मागे – InMarathi

सचिनपेक्षाही दमदार क्रिकेट खेळणारा हा खेळाडू केवळ ‘एका’ कारणामुळे पडला मागे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या आयुष्याची अशाश्वती किती असते याचे अनेक अनुभव आपल्याला अनेकदा येतात. यात कधी आपण कळत-नकळत एखाद्याच्या यशात अडथळा बनतो तर कधी दुसरे कोणीतरी आपल्या यशात अडथळा बनते. पण आपल्या यशात अडथळा बनणारी ती व्यक्ति जर आपला सख्खा भाऊ असेल तर? तर तेव्हा तो एक नासुर बनून आयुष्यभर टोचत राहतो.

 

 

याचे जिवंत उदाहरण म्हणजे ज्यांना मुंबईचे विवि रिचर्ड्स म्हणून ओळखले जात होते ते क्रिकेटपटू ‘अनिल गुरव’. आजच्या विराट कोहली, हार्दिक पंड्या ला ओळखणार्‍या पिढीला अनिल गुरव माहिती असण्याचे कारण नाही पण ज्यानी ८०ते ९०च्या दशकातील क्रिकेट पाहीले आहे त्यांना अनिल गुरव नक्कीच माहिती असतील. या अनिल गुरव यांची कहाणी म्हणजे घरच्या दिव्याने घराला आग लावली की काय होते हे सांगणारी आहे.

 

cricket stadium inmarathi

 

सचिनच्या १० वर्षांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवसांपैकी तो एक दिवस होता जेव्हा त्याला त्याचा नायक, त्याचा आदर्श अनिल गुरव यांनी SG बॅट दिली. रमाकांत आचरेकर सरांचे आवडता विद्यार्थी असल्याने, अनिल गुरवने आधीच आपल्या पुल आणि कट शॉट्सने मुंबई क्रिकेट सर्किट्सवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली होती.

मुंबईचे व्हिव्हियन रिचर्ड्स म्हणून प्रसिद्ध असलेला, कुरळे केस असलेला अनिल गुरव ८०च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात मुंबईतील बहुतेक तरुण क्रिकेटपटूंसाठी रोल मॉडेलच्या स्थानावर पोहोचू लागला होता. सचिन आणि कांबळी हे त्याचे सर्वोत्कृष्ट चाहते असल्याने ते नेहमी त्याला जवळून फलंदाजी करताना पाहत असत आणि त्याने खेळलेल्या प्रत्येक रणनीतिक शॉटचा आनंद घेत असत.

 

anil gurav im

वयाच्या तिशीनंतर क्रिकेटमध्ये पदार्पण करून यशस्वी होणारे हे ५ भारतीय खेळाडू

वयाच्या ४ थ्या वर्षी ६५ किमी धावणारा बुधिया सिंग कुठे आहे? जाणून घ्या

८०च्या दशकात रमाकांत आचरेकर यांनी जोपासलेल्या फलंदाजीतील प्रतिभावंतांपैकी अनिल गुरव हा सचिनपेक्षा आठ वर्षांनी मोठा होता. रमाकांत आचरेकर अनेकदा अनिल गुरव म्हणजे त्यांच्या कोचिंग अकादमीतील युवा क्रिकेटपटूंसाठी फलंदाजीसाठी परिपूर्ण पाठ्यपुस्तक आही अशा शब्दांत त्यांचे वर्णन करायचे.

अनेक शालेय आणि क्लब क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर विपुल शतकांसह अनेक वर्चस्व गाजवणारे विक्रम जमा होते. इथे या कहाणीला ट्विस्ट मिळाला. जेव्हा एक अजित तेंडुलकर आपल्या भावाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी प्रयत्नशील होता, तेव्हा दूसरा अजित गौरव मात्र आपल्या भावाच्या यशात अडथळा बनला होता. अनिल चौकारासाठी चेंडू मारत असताना, त्याच्या भावाने, अजितने शार्प शूटर बनून लोकांना मारायला सुरुवात केली होती.

अनिलचा धाकटा भाऊ अजित, त्याचे मित्र मंडळ आणि कंपनी मुंबईच्या अंडरवर्ल्डकडे झुकत असल्याने अनिल चे जीवन विस्कळीत झाले होते.अनिलला शांतपणे खेळू देण्यासाठी त्याच्या आईने दोन्ही भावांना भावांना वेगळे केले.

अजित कुटुंबापासून दूर राहण्यास नाखूष असला तरी, त्याने कौटुंबिक संपर्क टाळला, जेणेकरून त्याचा उदयोन्मुख क्रिकेटर भाऊ आणि आई आनंदी जीवन जगू शकेल. पण तरीही त्याच्या गुंडगिरीची झळ कुटुंबाला बसलीच…आणि त्याच्या ठावठिकाणाविषयी कुटुंबाला वारंवार चौकशीला सामोरे जावे लागले. याचा परिणाम अनिलच्या कारकीर्दीवर झाला. त्याने त्याचा आत्मविश्वास गमावला.

 

underworld-dons-inmarathi
hindi.firstpost.com

 

अनिलसाठी १९८४ हे खास वर्ष होते. हे ते वर्ष होते जेव्हा तो मुंबई अंडर-१९ संघाकडून खेळला तेव्हा प्रथमच राष्ट्रीय निवडकर्त्यांच्या नजरेत तो आला होता . पश्चिम रेल्वे, बॉम्बे स्कूल्स, न्यू इंडिया अॅश्युरन्स क्रिकेट क्लब आणि ससानियन क्रिकेट क्लब यांसारख्या संघांसाठी त्याच्या नावाखाली असंख्य शेकडो नोंदणीकृत सह्या असल्याने, ‘अनिल गुरव’ हे नाव राष्ट्रीय संघासाठी संभाव्य शब्दांमध्ये वारंवार वापरले जाऊ लागले. १९९५च्या रणजी हंगामात मुंबईकडून खेळताना, त्याने प्रतिस्पर्धी, दिल्ली विरुद्ध नाबाद २५६ धावांची खेळी केली.

 

young sachin tendulkar inmarathi

 

आपल्या भावाच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यांना सतत पोलिसांच्या चौकशीला आणि दंडुकेशाहीला सामोरे जावे लागले याची परिणीती शरीर आणि मनाने खचण्यात झाली आणि १९९३ नंतर त्यांनी क्रिकेटचे ग्राऊंड पहिले नाही. एकीकडे सचिन यशाची नवनवीन शिखरे गाठत होता त्याचवेळी त्याचा आदर्श भावामुळे पोलिस चौकीचे उंबरे चढत होता. …

 

gurav im

 

अनिल गुरवचा भाऊ अजित हा गुंड सर्किटमध्ये शार्प शूटर असल्याने त्याच्या भावाची चौकशी करण्यासाठी अनिलला पोलिसांकडून वारंवार शारीरिक छळ करण्यात येत होता. त्याचा भाऊ अजितसोबतच्या गुन्हेगारी कारवायांशी त्याचा कोणताही संबंध नसल्याचे सिद्ध झाले तोपर्यंत उशीर झाला होता आणि अनिलला साधा क्रिकेट शॉटही नीट खेळता येत नव्हता.

तो उदासीनता आणि मद्यपानाचा बळी होता, ज्यामुळे त्याचे आयुष्य आणखी बिघडले. सचिन क्रिकेटचा देव बनला आणि हा चमकता सितारा एका कारखान्यातला सामान्य कामगार …आज ४८ वर्षीय अनिल गुरव डोळे चोळत आपल्या दुर्गंधीयुक्त पलंगावरून उठतात. आपण खेळलेल्या क्रिकेटला इतर स्वप्नानसारखे आणखी एक सामान्य स्वप्न समजतात.

 

anil gurav im 1

 

तोंड धुवून त्यांच्या लहानपणी जमवलेल्या ट्रॉफीजवळ काही पैसे शोधतात आणि मग सरळ बारमध्ये घुसतात. ते आपली चाळ सोडत असताना, जवळच्या झोपडीतील ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही सेटवर कोनातरी क्रिकेटपटूचे कौतुक होत असते. टीव्ही स्पीकर त्या क्रिकेटपटूच्या च्या घोषणांनी गुंजत असताना, समांतर जगात वानखेडेवरचा जमाव अजूनही “गुरव! गुरव!” असा जयघोष करत असतो…मुंबईचा हा विव रिचर्ड्स सध्या व्यसनमुक्ती उपचारांतर्गत मुंबईच्या उपनगरातील एका झोपडीत हालखीचे जीवन जगत आहे.

 

मित्रांनो ही कहाणी कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा . आणि इनमराठी वाचत रहा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?