' हनुमान चालीसावरून राजकारण तापलं, पण ही रचना अकबराच्या तुरुंगात लिहिली गेली असं इतिहास सांगतोय

हनुमान चालीसावरून राजकारण तापलं, पण ही रचना अकबराच्या तुरुंगात लिहिली गेली असं इतिहास सांगतोय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

म्हणतात आंधळ्याच्या गाई देव राखतो आणि ते काही खोटे नाही अशा अनेक घटना आपण घडताना बघतो. यामागे प्रत्येकाची भक्ती किंवा आपल्या ईश्वराप्रती असलेली श्रद्धा करणीभूत असते. पण तुम्हाला जर सांगितले की १६ व्या शतकात संत गोस्वामी तुलसीदास यांच्या सोबत अशी काही घटना घडली होती आणि त्यातूनच बजरंगबलीचे प्रसिद्ध स्तोत्र ‘हनुमान चालीसा’ चा जन्म झाला होता तर नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल, हो ना?

 

hanuman chalisa im

 

सध्या हनुमान चालीसा आणि अजान यांवरून धार्मिक तेढ निर्माण झाली आहे. राजाकारणही तापले आहे, प्रत्येक पक्षाने आपली भुमिका घेतली आहे. आता लाऊडस्पिकरवर हनुमान चालीसा लावावी की अजान? या वादात पडण्यापेक्षा हनुमान चालीसाची सुरुवात नेमकी कशी झाली? ही रचना कोणी केली? या प्रश्नांची उत्तरे शोधणेही तितकेच गरजेचे आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

चला तर मग जाणून घेवू आजकाल ज्या हनुमान चालीसा पठनावरून राजकारण तापले आहे त्या हनुमान चालिसा आणि ते रचणार्‍या गोस्वामी तुलसीदास यांची कहाणी.

कलियुगात ज्याला संकटमोचक असे म्हणले जाते ते हनुमानजी आहेत. त्यांची स्तुती करण्यासाठी अनेक श्लोक, स्तोत्रे, रचना रचल्या गेल्या आहेत. ज्यात हनुमान बाहुक, हनुमानाष्टक आणि हनुमान चालीसा प्रमुख आहेत. यापैकी हनुमान चालीसा सर्वाधिक वाचले आणि पठन केले जाणारे स्तोत्र आहे.

कोणत्याही युगात भगवंताची प्राप्ती सहज शक्य असेल, तर ते युग आहे:- कलियुग! या विधानाची पुष्टी करणारे श्लोक तुलसीदासजींनी रामचरितमानस मधील या दोह्यात लिहिले आहे:-

‘कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नार उत्तरहि परा।’

म्हणजे कलियुगात मोक्षप्राप्तीचे एकच ध्येय आहे, ते म्हणजे भगवंताचे नाम घेणे. तुलसीदास हे १६ व्या शतकातील प्रसिद्ध संत आणि रामभक्त होते. त्यांच्या भक्तीच्या आणि त्यांना प्रभू रामाचे दर्शन झाल्याच्या वंदता त्या काळात सर्वदूर पसरल्या होत्या. ही गोष्ट त्याकाळातील मुघल शासक अकबर याच्या कानी गेली आणि उत्सुकतेपोटी म्हणा किंवा त्यातील खरेखोटेपणा जाणून घेण्याच्या उद्देशाने,अकबराने तुलसीदास यांना आपल्या दरबारात बोलावून घेतले.

 

tulsidas im

 

त्याने तुलसीदास यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला की एकतर त्यांनी श्रीरामांचे दर्शन अकबराला घडवावे किंवा त्याच्या स्तुतीपर काव्यग्रंथ रचावा. यावर प्रभू केवळ त्यांच्या भक्तांना दर्शन देतात असे गोस्वामिनी अकबराला संगितले यावर संतप्त होवून अकबराने तुलसीदास यांना कारागारात टाकले.

आपल्याला या तुरुंगवासातून सोडवावे अशी प्रार्थना तुलसीदास यांनी भगवान बजरङ्गबली यांच्याकडे केली. तीच प्रार्थना ‘हनुमान चालीसा म्हणून प्रसिद्ध झाली. तुरुंगात असताना गोस्वामींनी अवधी भाषेत हनुमान चालीसा लिहिली. अखंड चाळीस दिवस त्याचे पठन केले.

 

tulsidas 1 im

 

हनुमान चालिसा लिहिण्याचे काम पूर्ण होताच असे म्हणतात की अचानकच असंख्य माकडांनी फतेहपूर सिक्रीला वेढा घातला आणि परिसरावर हल्ला केला. माकडांची ही दहशत रोखण्यात अकबराचे सैन्यही अपयशी ठरले.

 

monkey im

 

काही केल्या या माकडांचा उपद्रव कमी होईना. तेव्हा कोणीतरी अकबराला तुलसीदास यावर मार्ग काढू शकतील असे सुचवले. तेव्हा मग अकबराने नाइलाजाने एका मंत्र्याच्या सल्ल्यानुसार तुलसीदासजींची तुरुंगातून सुटका केली.

तुलसीदासजींची तुरुंगातून सुटका होताच माकडे संपूर्ण परिसर सोडून निघून गेली असे म्हणतात. अकबराला तुलसीदासजींच्या भक्तीचा महिमा कळला. त्याच क्षणी त्यांनी तुलसीदासजींकडे क्षमा मागितली आणि त्यांना तुरुंगातून मुक्त करत सन्मानाने निरोप दिला.

एवढेच नाही तर अकबराने त्या दिवसानंतर तुलसीदासजींचा आयुष्यभर आदर केला.

अशाप्रकारे तुलसीदासजींनी हनुमान चालिसा रूपात माणसाला अडचणीच्या काळातून बाहेर पडण्याचा मार्ग सांगितला आहे. आपल्या ईश्वरावर असलेला विश्वास आणि श्रद्धा आपल्याला संकटातून तारतात हेच खरे.

 

hanuman im

 

मित्रांनो हनुमानजींच्या आणि प्रभू राम यांच्या भक्तीरसात ओथंबलेल्या या स्तोत्राचे पठन करून एकदा तरी हा भक्तीचा अनुभव घ्यायला हवा. लेखाबद्दलचा अभिप्राय आम्हाला कमेंटबॉक्समध्ये जरूर कळवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?