' किन्नर समाजाचा संघर्ष यशस्वी, मुंबईत त्यांच्यासाठी झालंय पहिलं सार्वजनिक शौचालय! – InMarathi

किन्नर समाजाचा संघर्ष यशस्वी, मुंबईत त्यांच्यासाठी झालंय पहिलं सार्वजनिक शौचालय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जीवनाच्या विविध टप्प्यांवर प्रत्येकालाच संघर्ष करावा लागतो, परंतु जगण्यासाठी वर्षानुवर्षे जो समाज संघर्ष करत आहे तो समाज म्हणजे किन्नर समाज.

भारतीय समाजजीवनात मानाने जगण्यासाठी आणि अधिकारांसाठी हा समाज आपली हक्काची लढाई लढत आहे, काही प्रमाणात का होईना त्या लढाईला आता यश मिळत आहे.

त्यांच्या प्रयत्नामुळे हळू हळू का होईना, पण समाजात बदल घडून येण्यास सुरवात झाली आहे. मुंबई मध्ये सुरू झालेले पहिले ट्रान्सजेंडर शौचालय हे त्याचं एक उदाहरण म्हणता येईल.

 

transgender im1

 

किन्नर समाज हा गेली अनेक वर्षे भेदभाव सहन करत आहे. या समाजाला नेहमी आपल्या हक्कांसाठी आणि आत्मसन्मानासाठी लढा द्यावा लागतो.

आपल्याला समान दर्जा मिळावा अशीच त्यांची मागणी आहे, परंतु त्यांना इतर सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागते एवढंच काय तर त्यांना मूलभूत सुविधा सुद्धा मिळत नाहीत. शौचालय हे त्यापैकीच एक. आजच्या आधुनिक युगात सुद्धा LGBTQ समाजाला शौचालय सारख्या मूलभूत सुविधेसाठी संघर्ष करावा लागतो.

पण म्हणतात ना, की “प्रयत्नांती परमेश्वर” किंवा “कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती ” त्याप्रमाणे त्यांच्या संघर्षाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.

मुंबई मधील गोरेगांव येथे ट्रान्सजेंडर शौचालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची सोय होईल तसेच त्यांचा सन्मानदेखील टिकून राहील. हे शौचालय महाराष्ट्रातील पहिले ट्रान्सजेंडर शौचालय आहे.

गोरेगावमधील आरे येथील ओंबळे बागेत हे शौचालय बांधलेले असून अशा प्रकारचे हे पहिले शौचालय आहे. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात तसेच समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या सारथी फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने त्याची स्थापना केली आहे.

 

transgender im

 

ट्रान्सजेंडर्सना सुरक्षित जागा उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्याविरुद्ध होणारा लिंगभेद रोखण्याचे उद्दीष्ट असून त्या दिशेने हे एक पाऊल आहे, असे या संस्थेने म्हंटले आहे.

तर ट्रान्सजेंडर समुदायातील एका सदस्याने हे शौचालय कार्यान्वित झाल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे परंतु सरकारने अशा आणखी सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती सुद्धा केली आहे. तसेच शहरातील इतर भागांत सुद्धा अशा प्रकारचे टॉयलेट सुरू करण्याची विनंती केली आहे.

ट्रान्सजेंडर व्यक्तीला आहे मूलभूत सुविधांचा अधिकार –

 

transgender inmarathi

 

सुप्रीम कोर्टाने जारी केलेल्या NALSA judgement आणि Transgender Person Act, 2019 नुसार ट्रान्सजेंडर व्यक्तीला मूलभूत सेवा म्हणजेच शिक्षणाचा, मतदानाचा, आधार कार्ड मिळवण्याचा अधिकार आहे. तसेच त्यांना या सुविधा सुद्धा सरकार द्वारे पुरविल्या गेल्या पाहिजेत.

या बरोबरच स्वच्छ आणि सुरक्षित प्रसाधनगृह हा सुद्धा त्यांचा अधिकार आहे. बऱ्याच मोठ्या कंपन्यांनी जेंडर न्युट्रल टॉयलेट सुरू केले आहेत, परंतु सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे टॉयलेट उपलब्ध नव्हते, आता मात्र सार्वजनिक ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे टॉयलेट सुरू करता येऊ शकतात हे गोरेगांव येथील हे शौचालयच्या उदाहरणावरून कळेल.

सार्वजनिक शौचालयांमध्ये अनेकदा त्यांना तुच्छतेने पहिले जाते किंवा शेरेबाजी केली जाते, त्यामुळे शहरातील पहिले ट्रान्सजेंडर टॉयलेट सुरू केल्याच्या कृतीमुळे किन्नर समुदायाचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल हे नक्की.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?