' शाब्दिक कोटी असावी अशी; जेव्हा रेखावरून अटलजींनी काढला होता अमिताभला चिमटा – InMarathi

शाब्दिक कोटी असावी अशी; जेव्हा रेखावरून अटलजींनी काढला होता अमिताभला चिमटा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कविता, भाषणे आपल्या सगळ्यांना माहिती आहेतच, मात्र त्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक किस्सेदेखील प्रसिद्ध आहेत. असाच एक किस्सा म्हणजे त्यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांची फिरकी घेतली होती तेव्हाचा.. राजकारणातही हळूच चिमटे काढत त्यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर निशाणा साधला होता. काय होता तो किस्सा पाहुयात..

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अमिताभ यांना निवडणूक लढवण्याची गरज नव्हती..

ही गोष्ट १९८७ च्या बोफोर्स स्कँडलनंतरची ज्यात अनेक मोठी नावे लोकांसमोर आली. त्यांतच एक नाव होतं अमिताभ बच्चन. याचदरम्यान एका मुलाखतीत अटलजींना जेव्हा बच्चन यांच्याबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा ते त्या मुलाखतीत अटलजींनी बिग बी आणि त्यांच्या भावावरही निशाणा साधला होता. बच्चन यांनी निवडणूक लढवायला नको होती, असे वाजपेयींनी स्पष्टपणे सांगितले होते.

 

atal bihari IM

 

ते म्हणाले की.. “बच्चन हे देखील या घोटाळ्यात आरोपी आहेत, पण त्यांच्या भावावर आणखी आरोप आहेत. ते भारतातील आपला जमलेला व्यवसाय सोडून स्वित्झर्लंडला का गेले? ते तिथे काय करत आहेत?

त्यांची मुलं महागड्या शाळांमध्ये शिकतात, त्यांची फी कोण भरते?, हे प्रश्न संसदेत आणि बाहेरही उपस्थित केले गेले आहेत, पण आजपर्यंत समाधानकारक उत्तर मिळालेले नाहीत. यामुळे पंतप्रधानांच्या (राजीव गांधी) प्रतिमेला तडा गेला आहे.”

अमिताभ विरोधात रेखाला उभं करेन…

 

rekha amitabh inmarathi

 

दरम्यानच्या काळात बच्चन आणि रेखा यांच्या लव्ह स्टोरीच्या चर्चांना उधाण आले होते. मीडिया आणि सर्वांच्या बोलण्यात त्यांच्याच अफेयरची चर्चा होती. याच काळात अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरच्या अफवांवर वाजपेयींनीदेखील खिल्ली उडवली होती.

ते हलक्याफुलक्या पद्धतीने म्हणाले की, “निवडणुकीपूर्वी मला पत्रकारांनी विचारले होते की, अमिताभ तुमच्या विरोधात लढले तर मी काय करू? मी म्हणालो, की मला रेखाला आमच्या बाजूने लढण्यासाठी विनंती करावी लागेल. कारण मी त्याच्याशी स्पर्धा करू शकत नाही. अभिनेत्याचा मित्र असणे ही एक गोष्ट आहे, पण त्या मैत्रीमुळे राजकारणावर परिणाम होऊ देणे ही चांगली गोष्ट नाही.”

 

amitabh rekha inmarathi

घोटाळ्यात नाव आलं आणि खासदारकी गेली..

अमिताभ बच्चन १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून हेमवती नंदन बहुगुणा यांना पराभूत करून पहिल्यांदा काँग्रेसतर्फे खासदार बनले होते, पण बोफोर्स घोटाळ्यात नाव आल्यानंतर १९८७ मध्ये त्यांनी राजीनामा दिला.

 

amitabh bachchan inmarathi

 

परदेशात संपत्ती ठेवल्यामुळे त्यांना अनेक भारतीयांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते आणि खासदारकीही गमवावी लागली होती . पुढे या आरोपांचे निकाल समोर आल्यानंतर त्यांनी ही भावनिक पोस्ट लिहिली होती..

“आरोप हे वेगवान आणि चिघळणारे आहेत.. वादात सत्य मागे राहते..आणि त्यांच्यावरील विश्वास नाहीसा होते. एक न थांबणारे वाळवंट वादळ जे फक्त आपल्या आयुष्याचेच नाही तर आपली सभ्यता आणि जागेचा पाया नष्ट करते..

मी आणि माझे कुटुंब जेव्हा बोफोर्स घोटाळ्याच्या आरोपांनी भारलेले होते, तेव्हा त्यांनी आमच्या अस्तित्वाचा आजवरच्या सर्वात वाईट काळ होता..२५ वर्षांनंतर, या घटनेच्या फिर्यादीने सत्य सार्वजनिक केले – बच्चन खरे होते!! २५ वर्षांनंतर..!!”

थोडक्यात काय तर अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाणीची कमाल फक्त राजकीय सभेत विरोधकांवर राजकीय टीका करण्यात पटाईत नव्हती, तर भारतातील एका मोठ्या सुपरस्टारला कोणतीही अर्वाच्य भाषा न वापरता घायाळ करणारी होती.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?