' पैसा-प्रसिद्धी, देखणं रूप; सगळं असूनही मीनाक्षीने ऐन उमेदीत का ठोकला बॉलीवूडला रामराम? – InMarathi

पैसा-प्रसिद्धी, देखणं रूप; सगळं असूनही मीनाक्षीने ऐन उमेदीत का ठोकला बॉलीवूडला रामराम?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

प्रेम कधीही, कुठेही, कोणाशीही होऊ शकते. प्रेम आंधळे असते. प्रेमाबद्दल अशा अनेक गोष्टी प्रत्येकाने ऐकल्या असतील. तथापि, वास्तविक जीवनात, प्रत्येक गोष्टीचा शेवट आनंदी व्हावा आणि प्रेमाचा शेवटही चांगला होईल असे नाही.

याचे उदाहरण म्हणजे गतकाळातील लोकप्रिय अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांचे आयुष्य. इतकी सुंदर अभिनयसंपन्न अभिनेत्री वैयक्तिक प्रेम जीवनात अयशस्वी ठरली. त्याचे तिच्या वैयक्तिक आयुष्यावर इतके दूरगामी परिणाम झाले, की मिनाक्षीला प्रसिद्धीच्या शिखरावर असताना आपले करियर सोडून द्यावे लागले आणि भारतापासून दूर टेक्सासमध्ये स्थायीक व्हावे लागले.

 

meenakshi im3

 

 

असे काय घडले तिच्या आयुष्यात, की तिला हा निर्णय घ्यावा लागला. चला पाहूया.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी ‘मिस इंडिया’ झालेल्या मीनाक्षी शेषाद्री हिला पहिला ब्रेक मिळाला तो ‘पेंटर बाबू’ या चित्रपटात, अभिनेता मनोज कुमार यांनी तिला ही संधी दिली होती. चित्रपट जरी चालला नाही तरी तिच्या कामाचे खूप कौतुक झाले.

त्यानंतर तिला ब्रेक दिला सुभाष घई यांनी. त्यांच्या हीरो चित्रपटाची मीनाक्षी नायिका होती. हीरो चित्रपट प्रचंड गाजला आणि मीनाक्षी स्टार झाली. त्यानंतर मीनाक्षीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि बॉलीवूडवर दबदबा निर्माण केला.

९० च्या दशकात मीनाक्षीने जवळपास प्रत्येक मोठ्या निर्माता-दिग्दर्शकासोबत काम केले. अमिताभ बच्चन, ऋषी कपूरपासून ते गोविंदा, सनी देओल, अनिल कपूरपर्यंत प्रत्येक मोठ्या हिरोसोबत तिने काम केले होते.

 

meenakshi shesadri im

 

१९९० साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात मीनाक्षीने अभिनय केला होता ज्यातील ‘जब कोई बात बिगड जाये…’ हे गाणे कुमार सानू याने गायले होते. त्या चित्रपटाच्या प्रीमिअरच्या वेळी कुमार सानु याने मीनाक्षीला पहिले आणि लव अॅट फर्स्ट साईट झाले.

तो तिच्या प्रेमात पडला, पण पहिल्या वेळी मीनाक्षीने त्याला नकार दिला कारण तेव्हा कुमार सानु विवाहित होता. तरीही चिकाटी न सोडता त्याने मिनाक्षीला होकार देण्यास भाग पाडले. जवळपास तीन वर्षे त्यांचे अफेयर सुरू होते.

 

kumar sanu im 1

 

अखेरीस सानु यांच्या पत्नीला याचा सुगावा लागला आणि ती सांनुपासून विभक्त झाली. या घटनेचा सानु आणि मीनाक्षीच्या नात्यावर देखील परिणाम झाला आणि ते ही एकमेकांपसून दुरावले.

त्यांच्या नात्यामुळे अनेक वादाचे प्रसंग देखील आले त्यातच कुमार सानु याच्या अनेक गर्लफ्रेंड आहेत असे त्याच्या सेक्रेटरीने एका खाजगी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, याने मिनाक्षी खचून गेली होती, कुमार सानूसोबतच मीनाक्षीचे नाव बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर यांच्यासोबतही जोडले गेले आहे, पण या स्टार्सनी कधीच त्यांच्या नात्याचा स्वीकार केला नाही.

त्यानंतर मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘दामिनी’ चित्रपटाच्या सेटवर राजकुमार संतोषी यांनी मीनाक्षीला प्रपोज केले आणि मीनाक्षीच्या बाजूने उत्तर होकार येईल अशी त्यांना अपेक्षा होती, पण मीनाक्षीने राजकुमार संतोषीना नकार दिला.

याच कारणामुळे मीनाक्षीचा एखादा सीन शूट झाला, की संतोषी रिटेकवर रिटेक करत असत. एके दिवशी त्यांनी सिनेमाच्या सेटवर मीनाक्षीला सर्वांसमोर वाईट शिवीगाळ ही केली.

 

meenakshi shesadri im1

 

मीनाक्षीला सर्वांसमोर झालेला अपमान सहन होत नव्हता. कसाबसा तिने हा चित्रपट पूर्ण केला, पण ती मनाने इतकी तुटली की तिने ‘दामिनी’ चित्रपटानंतर कोणताही नवीन चित्रपट साइन केला नाही. १९९६ मध्ये आलेला ‘घायल’ हा तिचा शेवटचा चित्रपट होता.

१९९७ च्या सुरवातीला मीनाक्षीने अमेरिकेत स्थायिक असलेल्या हरिष मैसूर या इन्व्हेस्टमेंट बँकर सोबत लग्न केले व ती चित्रपट सृष्टीचा निरोप घेवून अमेरिकेत स्थायीक झाली. इतकेच नाही तर तिथे ‘चेरीश डान्स स्कूल’ ही भारतीय शास्त्रीय नृत्य शिकवणारी संस्था तिने सुरू केली.

आपले पती हरिष आणि मुले जोश व केंद्रा यांच्यासोबत मीनाक्षी आपले जीवन टेक्सास इथे व्यतीत करत आहे. एका संस्थेत ती भरतनाट्यम, ओडिसी व कुचीपुडी नृत्य शिकवते.

प्रवाहाने एका जागी न थांबता आपला प्रवास सुरू ठेवला तर त्याची पुढे जाऊन नितळ अशी नदी बनते. हेच मीनाक्षीचे उदाहरण आपल्याला शिकवते. लेख कसा वाटला ते जरूर कळवा आणि या व अशा असंख्य विषयांसाठी इनमराठीला फॉलो करा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?