' ईडीने धाडी टाकून जप्त केलेल्या पैशाचे पुढे काय होते? जाणून घ्या

ईडीने धाडी टाकून जप्त केलेल्या पैशाचे पुढे काय होते? जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांवर सध्या होत असलेली इडीची कारवाई ठाऊक नाही, असा माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही. अगदी लहान मुलांनी सुद्धा याविषयी ऐकलेलं असेल, इतका हा विषय सध्या चर्चेत आहे. त्यातच शिवसेनेचे राज्यसभेचे आमदार संजय राऊत यांची संपत्ती इडीने जप्त केली आणि अनेक उलसुलट चर्चांना उधाण आलं.

कुणी याला सूडबुद्धीने करण्यात आलेली कारवाई म्हणू लागलं, कुणी याच्याशी राजकीय नेत्यांचा काहीही संबंध नाही असं म्हणू लागलं, तर कुणी आणखी काही! या सगळ्यात ‘इडीने जप्त केलेली मालमत्ता’ हा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चिला जातोय. या ‘मालमत्तेचं नंतर नेमकं काय होतं?’, असा प्रश्न अनेकांना पडलेला दिसतोय.

 

ed im

 

कदाचित तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला असेल, आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न तुम्हीदेखील करत असाल. चला तर मग जाणून घेऊयात, याच प्रश्नाचं उत्तर; ‘इडीने जप्त केलेल्या मालमत्तेचं नेमकं होतं तरी काय?’

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जप्त झालेल्या प्रॉपर्टीची किंमत

गोरेगावमधील पत्राचाळ प्रकरणातील घोटाळ्यात संजय राऊत यांच्यावर इडीने कारवाई केली. १०३४ करोड रुपयांच्या या घोटाळ्यात आरोपी ठरलेल्या संजय राऊत यांची तब्बल ११.५ करोड रुपये किंमतीची मालमत्ता इडीने जप्त केली आहे.

संजय राऊत यांनी “मला कुणाचीही भीती वाटत नाही”, असं म्हटलेलं असलं, तरी यातून उलटसुलट चर्चा मात्र सुरु झाल्याच आहेत. ‘प्रॉपर्टीची किंमत काय?’ हा प्रश्न जितका मोठा ठरतोय, तितकाच, ‘प्रॉपर्टीचं होतं काय?’ हा प्रश्न सतावतोय.

 

patra im

संजय राऊत आणि पत्राचाळ प्रकरण; नेमकं कनेक्शन आणि इतिहास जाणून घ्या!

वॉरंट घेऊन CBI लालूंना अटक करायला गेली आणि एका भलत्याच संकटात अडकली!

जप्ती आणलेल्या प्रॉपर्टीचा सांभाळ…

एकदा का प्रॉपर्टीवर जप्ती आली, की त्या प्रॉपर्टीची सगळी काळजी घेण्याचं काम त्या-त्या तपास यंत्रणेचं असतं. आता तुम्ही म्हणाल, जप्त केलेल्या प्रॉपर्टीची काय काळजी घ्यावी लागणार आहे? मात्र प्रत्यक्षात हे सत्य नाही. त्या प्रॉपर्टीचा लिलाव करणं, त्यातून देयक रक्कम वसूल करणं अशा गोष्टी पुढील काळात घडत असतात, किंवा घडू शकतात. त्यामुळेच, ती प्रॉपर्टी जप्त करण्यात आलेली असली, तरी तिची काळजी घेणं, सांभाळ करणं गरजेचं असतं.

 

money inmarathi

 

जप्ती आणलेल्या मालमत्तेची निगा राखणं, काळजी घेणं, सांभाळ करणं ही खरंतर एक डोकेदुखी ठरते. सरकारदेखील यावरील उपाय शोधण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र आजवर तरी यावरील हवा तसा उपाय मिळू शकलेला नाही.

मालमत्तेची विक्री कधी होऊ शकते?

आरोपीची मालमत्ता जप्त केल्यावर त्याच्या विरोधात कोर्टात खटला सुरु होतो. काहीवेळा आरोपी सुद्धा याविरोधात कोर्टात धाव घेतो. त्यामुळेच मालमत्ता जप्त केली असली, तरी त्यासंदर्भात कुठलेही पाऊल उचलण्याची परवानगी सरकारकडे नसते. आरोपी व्यक्तीला कोर्टाने दोषी जाहीर केल्याशिवाय या मालमत्तेवर सरकारचा हक्क असू शकत नाही.

कोर्टाचा हस्तक्षेप हा एकच मुद्दा मालमत्ता विक्रीच्या मधे येत असेल, असा तुमचा समज झाला असेल, तर जरा थांबा. तपासयंत्रणांची आणि सरकारी कारवाईची कार्यपद्धती सुद्धा मालमत्तेवरील हक्काच्या आड येणारा एक अडथळा ठरते. अनेक कायदेशीर प्रक्रिया प्रथम पूर्ण कराव्या लागतात.

सगळ्या मालमत्तांची यादी जोडणं, त्यानंतर या मामत्तेशी निगडित सगळी कायदेशीर कागदपत्रं गोळा करणं, त्यांची सरकारी अर्थमंत्रालयाच्या महसूल विभागाकडून शहनिशा करून घेणं, या तांत्रिक बाबी यात सहभागी असतात.

 

court inmarathi

 

ईडी विरोधात आरोपीने कोर्टात धाव भेटल्यास, आरोप खोटे असल्याचा पुरावा देण्यासाठी त्याला १५० दिवसांपर्यंतची मुदत कोर्टाकडून दिली जाऊ शकते. या सगळ्या पुराव्यांची शहनिशा होऊन, आरोपी दोषी सिद्ध झाला आणि कोर्टाचा निकाल ईडीच्या बाजूने लागला, की मगच जप्ती आणलेल्या मालमत्तेवर ईडीचा हक्क प्रस्थापित होतो.

यातही आरोपीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली असेल, तर तिथला निकाल सुद्धा ईडीच्या बाजूने लागणं आवश्यक असतं. थोडक्यात काय, तर या सगळ्या प्रक्रियेतून गेल्यावरच त्या मालमत्तेची विक्री अथवा लिलाव होऊ शकतो. ईडीने जप्ती आणली, म्हणजे ती मालमत्ता सरकार जमा झाली, असं अगदी सहजसहजी घडत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?