' नशीब असावं तर असं …टाईमपास म्हणून तिकीट घेतलं आणि लागली १.५ कोटींची लॉटरी – InMarathi

नशीब असावं तर असं …टाईमपास म्हणून तिकीट घेतलं आणि लागली १.५ कोटींची लॉटरी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

माणसाला नशिबापेक्षा जास्त किंवा नशिबात लिहिल्यापेक्षा कमी कधीच काही मिळत नाही, असं म्हणतात. नशिबाचे फासे उलटले तर राजाचा रंक होतो तर कधी रंकाचा राजा. प्रत्येक व्यक्ती एमानेइतबारे आपलं काम करून आपली गुजराण करत असते. परंतु सगळ्यांनाच कधीतरी आपल नशीब चमकेल आणि आपले चांगले दिवस येतील अशी कुठेतरी वेडी आशा असते. ‘अपना टाईम आयेगा ‘ अशी होप प्रत्येकाच्या मनात नाही म्हंटल तरी असतेच तर अशीच नशीबाची घंटी वाजली आहे एका तरुणीची.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

एखादा चमत्कार तेंव्हाच होतो जेंव्हा तुम्ही त्याची सर्वात कमी अपेक्षा करता. एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर उरलेल्या पैशातून आपण फारतर एखाद चॉकलेट खरेदी करतो किंवा एखादी तत्सम कमी गरजेची वस्तू घेतो. पण अशाच उरलेल्या पैशातून खरेदी केलेल्या लॉटरीच्या तिकिटाने तुम्हाला करोडपती बनवलं तर? अशी साधी कल्पनाही आपण करत नाही.

 

money notes inmarathi

 

दक्षिण कॅरोलिना, यूएसए मधील एका महिलेने विजेते तिकीट खरेदी करण्यासाठी चक्क तिच्या खरेदीतून उरलेल्या पैशांचा वापर केला आणि आत्ता ती लॉटरी जिंकण्याचा आनंद साजरा करत आहे.

१.५ कोटींहून अधिक जिंकणारी ही महिला दक्षिण कॅरोलिना मध्ये अँडरसनमधील पिअरमन डेअरी रोडवरील पॉवर ट्रॅक १३येथे तिच्या कार मध्ये इंधन भरण्यासाठी आली होती. इंधन भरल्यानंतर उरलेल्या पैशातून तिने स्क्रॅच-ऑफ तिकीट खरेदी केले होते.

 

loo im

 

जेव्हा ती महिला पुन्हा आपल्या कार मध्ये जाऊन बसली तेंव्हा तिने ते तिकिट स्क्रॅच केले. त्यामध्ये तिचा सर्वात शेवटचा म्हणजे विजेता क्रमांक आल्याने तिला तिच्या नशिबावर विश्वास बसत नव्हता. तिने थोडेथोडके नाही तर तब्बल २००००० डॉलर एवढे पैसे जिंकले आहेत.

 

petrol inmarathi

 

भारतीय चलनामध्ये सांगायचं झालं तर या महिलेने १.५ करोड रुपये जिंकले आहेत. आपल्या अनुभवा बद्दल सांगताना ती महिला म्हणते की, “माझा माझ्या नशिबावर विश्वास बसत नव्हता. त्यावेळी माझा श्वास थांबला होता. आयुष्यात मला कधीतरी लॉटरी लागेल यावर माझा विश्वास होता पण ते इतक्या लवकर होईल असं मला वाटलं नव्हतं ” झटक्यात करोडपती झाल्यानंतर आनंद गगनात न मानवणे साहजिकच आहे म्हणा.

 

dollars im

८००० चा पगार ते ५० लाखांचा मालक, भारी नशीबवान माणसाची गोष्ट!

मोजकेच पैसे खिशात असतांना आयुष्य पणाला लावून “यश” मिळवणारा अवलिया…

एवढंच नाही लॉटरी जिंकल्यानंतर तिच्या बरोबरच लॉटरी विक्रेता सुद्धा भाग्यवान ठरला आहे . पॉवर ट्रॅक स्टोअर जिथून तिने भाग्यवान तिकीट खरेदी केले होते त्या दुकानाला विजेत्याला तिकीट विकण्यासाठी $2,000 चे कमिशन देखील मिळाले आहे.

लॉटरी अधिकार्‍यांच्या मते, या गेम मधली अजून काही बक्षिसे शिल्लक आहेत. यातील विजेत्यांना पारितोषिक तसेच काही प्रतिष्ठित ठिकाणांना भेट देण्याची संधी सुद्धा मिळणार आहे.

कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम आपल्याकडे प्रसिद्ध आहे. पण ह्या महिलेला त्या प्रश्नांची अचूक उत्तरे देण्याची सुद्धा तसदी घ्यावी लागली नाही तिला नशिबाने एका स्क्रॅच मध्ये करोडपती बनविले आहे. अशा व्यक्तीला भाग्यवानचं म्हणायला हवे, नाही का?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?