' संजय राऊत आणि पत्राचाळ प्रकरण; नेमकं कनेक्शन आणि इतिहास जाणून घ्या! – InMarathi

संजय राऊत आणि पत्राचाळ प्रकरण; नेमकं कनेक्शन आणि इतिहास जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक भूकंप होत आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थनातील काही आमदारांनी बंड केले आहे. यावरून संजय राऊत या आमदारांवर चांगलेच तोंडसुख घेताना दिसून येत आहेत. कालच्या एका भाषणात संजय राऊतांनी याच बंडखोर आमदारांवर जहरी टीका केली. आज त्यांना पुन्हा एकदा ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे ते प्रकरण म्हणजे पत्राचाळ…

ईडीची पीडा काही केल्या महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या मागून काही कमी होत नव्हती. महाविकास आघाडीच सरकार स्थापन झाल्यापासूनच त्यातील नेत्यांवर ईडी सीबीआयची मंडळी धाडी टाकत होते. भाजपचे किरीट सोमय्यांनी हसन मुश्रिफांपासून ते अगदी अनिल परबांपर्यंत अनेकांच्या मागे ते हाथ धुवून मागे लागले होते.

 

ed im

 

महाविकास आघाडीचे फायर ब्रँड संजय राऊत कायमच चर्चेत असतात, नुकतंच ईडीने संजय राऊत यांची अलिबाग आणि दादरमधील प्रॉपर्टी जप्त केली होती. याआधी शिवसेनेचे ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांची प्रॉपर्टी जप्त ईडीने जप्त केली आहे. संजय राऊत याआधी सुद्धा पत्रा चाळ प्रकरणात अडकले आहेत, नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात…

 

sanjay raut im

 

काय आहे पत्रा चाळ प्रकरण?

संजय राऊत यांचे खास असलेले प्रवीण राऊत यांचा पत्रा चाळ प्रकरणात मोठा सहभाग आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना ईडीने ताब्यात घेतले होते. प्रवीण राऊत यांचा सफाळे येथे रिअल इस्टेटचा व्यवसायाय आहे.

२००७ साली HDIL ची भागीदारी असलेली गुरुआशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीने पत्रा चाळीच्या पुनर्विकास करण्याबाबतचा करार म्हाडासोबत केला होता. याठिकाणी एकूण ३००० फ्लॅट्स बांधले जाणार होते त्यातील ६७२ फ्लॅट्स हे पत्रा चाळीतील रहिवाश्यांना दिले जाणार होते उर्वरित फ्लॅट गुरुआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीकडे राहणार होते.

 

raut im

 

प्रवीण राऊत यांनी गुरुआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला गोरेगावमधील सिद्धार्थ नगर भागातील पत्राचाळीच्या भूखंडामध्ये म्हाडा अधिकारांच्या वतीने हा घोटाळा केला आहे. गुरुआशिष या कंपनीला काही वर्षांपूर्वी या पत्राचाळीचा पुर्नविकास करायचा होता. मात्र चाळीतील लोकांच्या परवानगीशिवाय हा व्यवहार करण्यात आला. आणि त्यानंतर हा भूखंड अन्य बिल्डरांना १०३४ करोड रुपयांना विकला होता.

 

patrachawl im

बच्चन कुटुंबीय EDच्या जाळ्यात? नेमकं प्रकरण काय आहे?

रिक्षा चालवणं, अंडा भुर्जीची गाडी ते थेट ‘मातोश्री’वर असलेलं वजन! एक प्रेरणादायी प्रवास

२०१८ साली गुरुआशिष कन्स्ट्रक्शन कंपनी विरोधात FIR दाखल करण्यात आली होती, त्यानंतर प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली. प्रवीण राऊत हे गुरुआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीच्या संचालकांपैकी एक आहेत.

मागच्याच वर्षी संजय राऊत यांच्या पत्नीची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. प्रवीण राऊत यांच्या पत्नीने संजय राऊत यांच्या पत्नीला ५५ लाखांचे इंटरेस्ट फ्री लोन दिले होते. यावर त्यांच्या पत्नीने असे स्पष्टीकरण दिले होते की दादर परिसरात एक फ्लॅट घेण्यासाठी हे कर्ज घेतले होते, त्यानंतर चौकशी दरम्यान दोघांच्या पत्नींच्या नावे अवनी कन्स्ट्रक्शन ही कंपनी आहे.

ईडीने संजय राऊत यांच्या पत्नीला चौकशी साठी बोलावले म्हणून संजय राऊत चांगलेच खवळले होते. ईडी मुद्दाम महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास देत आहे, तसेच या षडयंत्रामागे भाजपचा हात आहे असा आरोप देखील त्यांनी केला होता.संजय राऊतांची आता तर प्रॉपर्टी जप्त झाली होती त्यात आता पुन्हा एकदा त्यांना चौकशीसाठी सामोरे जावे लागणार असल्याने राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळले जाणार हे नक्की.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?