' करौली इथली सांप्रदायिक दंगल आणि योगी आदित्यनाथ यांचं कनेक्शन: वाचा सत्य काय?

करौली इथली सांप्रदायिक दंगल आणि योगी आदित्यनाथ यांचं कनेक्शन: वाचा सत्य काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मित्रांनो तुम्हाला ‘फिक्शन’ हा शब्द किमान ऐकून तरी माहिती असेलच. ज्यामधे एकाच वेळी वेगवेगळ्या आयमांमध्ये घटना घडताना आपण पाहतो ज्याचे मूळ बरेचदा एकाच गोष्टीत दडलेले असते. आपल्या भारत देशाची अवस्था देखील अशाच एखाद्या फिक्शनस्टोरी सारखीच आहे.

आज आपण देशाला गौरवान्वित करणारा क्षण जगतो तर आपला उद्याचा दिवस चक्क कलम १४४ मध्ये अडकण्याचा असू शकतो. जणूकाही एकाच भारतात आपण असे वेगवेगळे आयाम असणारे भारत पाहत आहोत.

 

sec 144 in kashmir inmarathi

 

मित्रांनो एकीकडे श्रीलंका चीनकडे झुकत असताना, कठीण काळात भारताने मदतीचा हात पुढे केला. किंवा नेपाळ-लिपुलेख सीमा वादाची कटुता मागे ठेवत बिहारमधील जयनगर आणि नेपाळमधील जनकपूर दरम्यान रेल्वे मार्गाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

३ एप्रिल रोजी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी नॅशनल डोप टेस्टिंग लॅबोरेटरीने उत्पादित केलेल्या सहा संदर्भ साहित्याचे लोकार्पण केले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या अशा अभिमानास्पद दिवसांनंतर मात्र येणारा पुढचा दिवस वेगळे परिणाम घेऊन उजाडतो.

जेव्हा पंतप्रधान मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा दोन्ही देशांदरम्यानच्या रेल्वेमार्गाला हिरवा झेंडा दाखवत होते, तेव्हा दुसर्‍या आयामतला भारत मात्र पेटला होता. ठिकाण होते राजस्थान मधील करौली! असे नक्की काय घडले होते करौली मध्ये? काय आहे या मागची खरी स्टोरी? आणि त्यातील दाहकता… चला जाणून घेऊ.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना या देशाच्या काही भागातील समाज अजूनही जुन्या मानसिकतेत वावरत असल्याचे दिसून येते. ब्रिटिश काळात आणि स्वातंत्र्यानंतरही काही भागांत हिंदूंच्या मिरवणुकांवर हल्ले करण्याचे प्रकार घडत आले आहेत.

 

karauli IM

 

हिंदू समाजाने नवसंवत्सरानिमित्त राजस्थानमध्ये करौली येथे जी शोभायात्रा काढली होती, त्या शोभायात्रेवर दगडफेक करण्याची घटना घडली. त्या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचारात अनेक दुकानांची, घरांची जाळपोळ करण्यात आली.

नववर्षानिमित्त करौली येथील हिंदू युवकांनी एका बाईक रॅलीचे आयोजन केले होते. या बाईक रॅलीसाठी शासनाची रीतसर परवानगी काढण्यात आली होती. त्यानुसार, ही बाईक रॅली निघाली.

करौलीच्या हातवाडा बजार या मुस्लीमबहुल भागातील मशिदीजवळ ही शोभायात्रा आली असता त्यावर जोरदार दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर दंगलखोरांनी हिंदूंची दुकाने आणि वाहने पेटवून दिली.

घडले असे की शोभयात्रेतील दुचाकी स्वारांनी हातात भगवे झेंडे घेतले होते. तोच भगवा, जो धर्माचे चिरंतन प्रतीक आहे. पण यात्रेत केवळ तेवढेच नाही डीजे देखील होता. ज्यामधे “टोपी वाला भी सर झुका के जय श्री राम बोलेगा”. हे गाणे वाजवले जात होते. तेव्हाच या शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली.

यानंतर मोटारसायकल रॅलीत सहभागी लोकांनीही दगडफेक केली. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये संघर्ष झाला आणि नुकसान त्यांचेच झाले, ज्यांची या गदारोळात भूमिका नव्हती. दुकाने व वाहने जाळली गेली. दुकाने जळत राहिली, तोपर्यंत ठीक होते.त्यानंतर घरांना आग लागली आणि सगळा गोंधळ उडाला व परिस्थिती हाताबाहेर गेली.

karauli riots IM

 

घटनास्थळी पोलीस दल पोहोचले तोवर २५ लोक जखमी झाले होते. तातडीने संचारबंदी लागू करण्यात आली. ६५० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले. वीज व इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या. ताजी माहिती अशी आहे की ४६ बदमाशांना अटक करण्यात आली आहे.

हिंसाचारात झालेले नुकसान मोजले जात आहे. किमान दीड डझन दुकाने पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. सशस्त्र पोलिसांच्या तुकड्या रस्त्यावर उतरवण्यात आल्या आहेत. ड्रोनद्वारे टेहळणी सुरू असून वरिष्ठ आयपीएस अधिकारी शहरात तळ ठोकून आहेत.

याच दरम्यान गोरखपुर येथे एका तरुणाने आत्मघातकी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. करौली आणि गोरखपूरच्या घटना देशातील तरुण कोणत्या मार्गावर चालले आहेत हे दाखवून देतात.

या प्रकरणी अतिरिक्त पोलीस महासंचालक हवा सिंग घुमरिया यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, परिसरात शांतता राखण्यासाठी कलम १४४ लागू करण्यात आली आहे.

करौलीतील या संपूर्ण घटनेमुळे राजस्थानचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पोलीस महासंचालकांशी चर्चा केली आहे.
मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ‘दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे म्हटले आहे. यासह ‘लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये. शांतता राखावी.

 

ashok gehlot IM

 

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे’, असे आवाहनही त्यांनी केले आहे. ते पुढे असेही म्हणाले की, लोकांनी शांतता राखली पाहिजे आणि त्रास देणारे प्रत्येक धर्मात आहेत, त्यांच्यापासून दूर रहा. अशा समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर पकडण्याचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत.

दोषी मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. एनडीए सरकार सत्तेत आल्यानंतर देशात जे वातावरण निर्माण झाले आहे, ते पाहता पंतप्रधानांनीच देशातील जनतेला आवाहन करावे, की धर्म आणि जातीच्या नावाखाली जे ध्रुवीकरण होत आहे. ते न्याय्य नाही आणि देशाच्या हिताचे नाही.

अप्रत्यक्षपणे उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करताना गहलोत असे ही म्हणाले की खोट्या चकमकी घडवून लोकप्रियता मिळवता येते जे आजकाल BJP चे नेते करत आहेत. पण अशा खोट्या चकमकी घडवून आणून लोकांना आकर्षित करण्याऐवजी कायद्याचे राज्य प्रस्थापित केले तर खरा देशाचा विकास होईल.

 

amarujala.com

 

२०२४ मध्ये राजस्थान मध्ये होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकांना नजरेसमोर ठेवत प्रत्येक राजकीय पक्ष आपली मोट बांधायचा प्रयत्न करतो आहे.

राजस्थान पॅटर्न हा कॉंग्रेससाठी तर उत्तरप्रदेश हा भाजपसाठी प्रचारसाठीचा स्टार मुद्दा ठरणार आहे. हेच योगी आदित्यनाथ आणि राजस्थान यातील कनेक्शन असू शकेल असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?