पंतप्रधानांसोबत असणाऱ्या अंगरक्षकांच्या बॅगेमध्ये काय असते?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

हे आपल्या सर्वांनाच माहित आहे की पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजी ‘स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (विशेष सुरक्षा दल) यांच्याकडे असते. एसपीजी माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेकडे देखील लक्ष देतात.

पंतप्रधान जेथून जातात, तेथे त्यांच्या आजूबाजूला एसपीजीचे अचूक निशानेबाज तैनात असतात. एसपीजीचे सैनिक FNF-२००० असॉल्ट राइफल, ऑटोमॅटीक गन आणि १७-एम नावाचे खतरनाक पिस्तुल यांसारखी आधुनिक हत्यारे वापरतात.

बरं तर तुम्ही कधी या अंगरक्षकांकडे लक्षपूर्वक बघितले आहे का? या अंगरक्षकांच्या हातामध्ये ब्रीफकेस किंवा सुटकेस देखील असते.

तुम्ही ह्याची झलक २६ जानेवारीच्या परेड मध्ये बघितली असेल, परंतु  कधी तुम्हाला प्रश्न पडलाय का की, या ब्रीफकेस त्यांच्याकडे का असतात? आणि त्यामध्ये असते तरी काय? चला तर आज याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

 

prime-minister-security-marathipizza01
thelotpot.com

ही सुटकेस वास्तवात एक न्यूक्लियर बटन असते जी खूप पातळ दिसते. खरेतर हे एक पोर्टेबल बुलेट प्रूफ शील्ड किंवा पोर्टेबल फोल्डआउट बॅलिस्टिक शील्ड असते. जे एखाद्या हल्ल्यावेळी खोलता येते आणि ते एनआईजी लेवल-३ ची सुरक्षा प्रदान करते.

जेव्हा अंगरक्षकांना कोणत्याही धोक्याविषयी सूचना मिळते, तेव्हा अंगरक्षक हे शील्ड खाली झटकून पंतप्रधानांचे होणाऱ्या हल्ल्यापासून रक्षण करतात. ही सुटकेस एखाद्या ढालीप्रमाणे काम करते जी विशिष्ट व्यक्तीला तात्काळ आणि अस्थायी सुरक्षा देते.

prime-minister-security-marathipizza02
plus.google.com

या ब्रीफकेस मध्ये गुप्त पाकीट सुद्धा असते त्यामध्ये पिस्तुल ठेवली जाते. एसपीजीच्या बरोबर एक काऊंटर अॅटॅक (कॅट) CAT (Counter Assault Team) सुद्धा असते.

ही टीम “एफ.एन-२०००”, पी-९०, ग्लोक-१७, ग्लोक-१९ आणि “एफ.एन-५” सारखी हत्यारे हाताळण्यात निष्णात असते. या टीमला अतिशय खडतर  प्रशिक्षण दिलेले असते आणि ह्यांची खासियत ही आहे की पंतप्रधानांवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्यावेळी ही टीम तातडीने कारवाई करते.

एसपीजी देशाच्या विशिष्ट व्यक्तींव्यतिरिक्त राजकीय नेत्यांना आणि आंतरराष्ट्रीय पाहुण्यांना सुद्धा सुरक्षा प्रदान करते. एसपीजी कॅबिनेट सचिवालयाच्या अधिपत्याखाली येते आणि यांचे डीजी भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी असतात.

एसपीजीच्या कमांडोची निवड ‘केंद्रीय सशस्त्र पोलीस दल’ आणि ‘रेल्वे सुरक्षा दल’ मधील सैनिकांमधून केली जाते, परंतु त्यांना आदेश देण्याचा हक्क आयपीएस किंवा आरपीएफ अधिकाऱ्यांच्या हातात असतो.

prime-minister-security-marathipizza03
indiatoday.intoday.in

एसपीजी प्रत्येकवेळी विशिष्ट व्यक्तींना सर्वोच्च सुरक्षा प्रदान करते. असे अंगरक्षक पंतप्रधानांवरील कोणतेही संकट आपल्यावर झेलून पंतप्रधानाना सुखरूप ठेवतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

 

One thought on “पंतप्रधानांसोबत असणाऱ्या अंगरक्षकांच्या बॅगेमध्ये काय असते?

  • November 18, 2018 at 10:42 am
    Permalink

    खूप छान.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?