' मंदीवाल्यांना केले बाजाराने "एप्रिल फूल": वाचा नीरज बोरगांवकर काय म्हणतायत

मंदीवाल्यांना केले बाजाराने “एप्रिल फूल”: वाचा नीरज बोरगांवकर काय म्हणतायत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण सहज आजूबाजूला चौकशी केली तर अशी अनेक उदाहरणं सापडतील जेव्हा सर्वसामान्य लोक डायट प्लॅन किंवा फिटनेस प्लॅन नियमित पाळू शकत नाहीत! यामध्ये अपयश येण्यामागे ते आपल्याला शेकडो कारणे आहेत.

जी लोकं यशस्वी झाली आहेत त्यांची आपण खोलात जाऊन चौकशी केली तर आपल्या लक्षात येईल यामागे केवळ यशाचा मंत्र हा एकच आहे ते म्हणजे सातत्य.

 

success mantra IM

 

इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत जर विचार केला तर सामान्य गुंतवणूकदारासमोर असलेले प्रश्न काही याहून वेगळे नाहीत. पण इन्वेस्टर समोर काही वेगळी कठीण  कारणं आणि चॅलेंजेस देखील असतात.

गुंतवणुकीचे निर्णय घेणे त्यांच्यासाठी खूप कठीण जातं कारण त्यांना असलेलं मर्यादित नॉलेज, मनातील भीती आणि एकांगी विचार करण्याची पद्धत (Bias). सामान्य गुंतवणूकदार इन्वेस्टमेंट पासून दूर राहण्याचं कारण म्हणजे मार्केटचे स्वरूप; मार्केट सतत वर-खाली, दोलायमान परिस्थितीत असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

गोल्ड, बॉन्ड, म्युच्युअल फंड आणि शेअर्स यामधील व्यवहार आता खुप सोपे आणि सोयीचे झाले आहेत, आड येते ती निर्णय-क्षमता.

योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये नेमकं काय करायचं हे समजून सांगणारी विश्वासाची, जबाबदार व्यक्ती हवी, अशीच एक व्यक्ती म्हणजे नीरज बोरगांवकर!

 

neeraj borgaonkar IM

 

गेल्या अनेक वर्षांपासून ते सामान्य इन्वेस्टरला या गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर नीट उलगडून सांगत आहेत.

===

निफ्टी 17670.45 (205.70)
सेन्सेक्स 59276.69 (708.18)
बँकनिफ्टी 37148.50 (774.90)
डॉलर 75.97

निफ्टीमधील टॉप गेनर्स – NTPC BPCL POWERGRID INDUSINDBK HDFC

निफ्टीमधील टॉप लूझर्स – HEROMOTOCO TECHM DIVISLAB SBILIFE DRREDDY

Nifty High-Low – 17,422.70 – 17,703.70

 

nifty chart 5 IM

 

आज १ एप्रिल, नविन आर्थिक वर्षाचा पहिला दिवस. आज भारतीय शेअर बाजारामध्ये चांगली तेजी बघायला मिळाली. भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये सकाळपासूनच तेजीचे वातावरण दिसत होते. दुपारी दीड नंतर ही तेजी अजूनच वाढली आणि बाजार एक मोठी झेप घेत 17688 या पातळीच्या जवळ बंद झाला.

बॅंक निफ्टीमध्येदेखील सकाळपासून तेजीचे वातावरण होते आणि दुपारी साडेबारानंतर बॅंकनिफ्टीमध्ये प्रचंड तेजी सुरु झाली आणि बॅंकनिफ्टी 34159 या पातळीवर बंद झाला.

ऑटो सेक्टर, फायनान्शिअल सर्व्हिसेस, एफएमसीजी, आयटी, मिडिया, मेटल, रिअ‍ॅलिटी हे सर्व सेक्टर्स चांगल्या तेजीमध्ये होते. फक्त फार्मा शेअर्समध्ये थोडेसे नकारात्मक वातावरण दिसत होते.

share market IM

 

गेल्या काही दिवसांपासूनच बाजारामध्ये तेजीचे वारे वाहत आहेत. निफ्टीसाठी पुढील रेझिस्टन्स पातळी 18200 च्या आसपास दिसत आहे. तसेच खालच्या बाजूला 16800 या पातळीच्या जवळ एक स्ट्रॉंग असा सपोर्ट दिसत आहे. निफ्टी 17600 च्या वर टिकत असेल तर बाजारामध्ये तेजी कायम राहू शकते आणि बाजार वरची रेझिस्टन्स पातळी 18200 गाठू शकतो असे संकेत बाजारामध्ये दिसत आहेत.

बॅंकनिफ्टीमध्ये देखील चांगली तेजी दिसत असून पुढील रेझिस्टन्स 37600 च्या आसपास दिसत आहे. तसेच खालच्या बाजूला 35300 वर स्ट्रॉंग असा सपोर्ट दिसत आहे. 36300 ही पातळी जर टिकली तर बॅंकनिफ्टी वरची रेझिस्टन्स पातळी 37600 गाठू शकेल. निफ्टी व बॅंकनिफ्टी फ्युचर्स व ऑप्शन्स मध्ये काम करणार्‍यांसाठी एक बुलिश व्ह्यु घेऊन काम करण्याची संधी सध्या बाजारामध्ये दिसत आहे.

शेअर मार्केटमध्ये व म्युच्युअल फंडांमध्ये यशस्वी काम करणे अतिशय सोपे आहे. हे करण्यासाठी असंख्य वेगवेगळ्या पद्धती व स्ट्रॅटेजीज्‌ असतात.

आपल्याला जर शेअर बाजारामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपण या पद्धती व्यवस्थित शिकून घेतल्या पाहिजेत. गुंतवणूक कट्टा या उपक्रमाद्वारे तुम्हाला अश्या विविध पद्धती शिकण्याची संधी मिळते.

गुंतवणूक कट्ट्याबद्दल अधिक माहिती नियमितरित्या मिळवण्यासाठी आपला Neeraj Borgaonkar हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करुन ठेवा

नीरज बोरगांवकर युट्यूब चॅनलची लिंक – https://marathimarket.in/youtube

 

neeraj borgaonkar featured 7 IM

 

अजून एक महत्वाचे

शेअर बाजारामध्ये “इंट्राडे ट्रेडिंग” करणे तुम्हाला सोयीचे जावे याकरिता तुम्ही आमचा RTSS हा टेलिग्राम चॅनल जॉईन करु शकता. सध्या या RTSS टेलिग्राम चॅनलची दोन आठवड्यांची फ्री ट्रायल उपलब्ध आहे. पुढील लिंकवर क्लिक केल्यास तुम्हाला ही फ्री ट्रायल मिळवता येईल – https://marathimarket.in/free-trial

फ्री ट्रायल घेण्याकरिता पहिले टेलिग्राम हे अ‍ॅप तुमच्याकडे इन्स्टॉल करुन घ्या आणि मग वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

हे केल्यानंतर तुम्हाला START असे बटण दिसेल, त्यावर क्लिक करुन पुढे मिळणार्‍या सूचनांचे पालन करा म्हणजे तुम्ही आपला RTSS हा टेलिग्राम चॅनल जॉईन करु शकाल. हे करीत असताना काही शंका आली तर आम्हाला connect@guntavnook.com येथे एक ईमेल करा म्हणजे तुमची शंका सोडवून दिली जाईल.

“गुंतवणूक कट्टा” हा खास मराठी माणसांकरिता चालवला जाणारा एक उपक्रम असून यामध्ये एक “पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन” नावाचा ऑनलाईन कोर्स आम्ही तयार केलेला आहे.

 

neeraj borgaonkar 2 IM

 

या कोर्सची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याकरिता एका मोफत वेबिनारचे आयोजन केले आहे. हा वेबिनार आज रात्री नऊ वाजता घेतला जाईल.

पुढील लिंकवर रजिस्टर केल्यास बरोब्बर रात्री ९ वाजता हा वेबिनार तुम्हाला बघता येईल. वेबिनार सुमारे एक ते दीड तास चालेल आणि यामध्ये तुम्हाला आपल्या पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅनची संपूर्ण माहिती व्यवस्थित दिली जाईल. हा वेबिनार नक्की अटेंड करा.

रजिस्ट्रेशन लिंक – https://www.guntavnook.com/webinar

===

टीप : वरील माहिती ही फक्त आणि फक्त तुमच्या ज्ञानात भर पडावी याच उद्देशाने दिली गेली आहे. या माहितीच्या आधारावर शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये, शेअर्समध्ये गुंतवणूक करताना तज्ञ मंडळी यांचा सल्ला घेऊन नीट अभ्यास करूनच गुंतवणूक करावी.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?