' उन्हाळा आलाय : पहिले “ह्या” १० गोष्टी अंगिकारा आणि दुष्काळ टाळा! – InMarathi

उन्हाळा आलाय : पहिले “ह्या” १० गोष्टी अंगिकारा आणि दुष्काळ टाळा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : सुहास गुर्जर

===

पाणी…

दरवर्षी पाऊस कमी पडतो आणि उन्हाळ्यात आपल्या तोंडचे पाणी पळायची वेळ येते.

 

water-scarcity marathipizza

 

अशी आणीबाणीची वेळच येऊ नये ह्यासाठी आपणही काही करण्याची गरज आहे. जे करायचे ते फक्त या वर्षापुरतेच करून नाही चालणार, तो आपल्या सवयीचा भाग बनला पाहिजे.

आपण काय काय करू शकतो याचा आपण जरा विचार करू या… पाणी वाचवण्याचे सोपे मार्ग समजून घेऊन त्यांची सवय लावून घेऊ या.

अशी आणीबाणीची वेळच येऊ नये ह्यासाठी आपणही काही करण्याची गरज आहे.

जे करायचे ते फक्त या वर्षापुरतेच करून नाही चालणार, तो आपल्या सवयीचा भाग बनला पाहिजे. आपण काय काय करू शकतो याचा आपण जरा विचार करू या…

पाणी वाचवण्याचे सोपे मार्ग समजून घेऊन त्यांची सवय लावून घेऊ या.

 

१. आपल्या बेसीनच्या नळाच्या आधी आणखी एक नळ असतो. तो बेसीनच्या नळाची दुरुस्ती सोपी व्हावी म्हणून असतो. तसा तुमच्या घरात नसला तर तो बसवून घ्या.

आता हा अगोदरचा नळ योग्य तितकाच कायमचा उघडा ठेवा, की ज्यामुळे बेसीनचा नळ पूर्ण उघडला तरी पाण्याची धार बारीक राहील.

सर्वसाधारणपणे आपल्याला बेसीनचा नळ प्रमाणित उघडण्याची सवय नसते. आपण तो पूर्णच उघडतो. असा पूर्ण उघडल्याने दर मिनिटाला साधारण १० लीटर पाणी वाहते.

 

banner-tap-running-inmarathi

 

म्हणजे ३ मिनिटे आपण तोंड धूत असलो तर शुद्धीकरण केलेले ३० लीटर पाणी वाहून जाते. तेच आपण हा अगोदरचा नळ थोडासा बंद करून ठेवला तर यातील निम्मे पाणी वाचवू शकतो.

घरात ५ माणसे असली तर दिवसात ३/४ वेळा तोंड धुण्यात सहजपणे १५० लीटर पाणी आपण वाहू देत असतो.

२. स्नान एक बादली पाण्यात व्यवस्थित होवू शकते. एक बादली पाणी म्हणजे १५ लीटर पाणी.

खरे तर शॉवर योग्य पद्धतीने आणि शॉवरचा म्हणून आनंद घेत नं बसता वापरला तर शॉवरच्या स्नानाला पाणी कमी लागते.

मध्यंतरीच्या साबण लावण्याच्या काळात शॉवर बंद केला आणि ५ मिनिटात स्नान केले तर ५/७ लीटर पाण्यात शॉवरखाली व्यवस्थित स्नान होवू शकते.

परंतू खूप लोक शॉवरचा आनंद घेत १५/१५ मिनिटे स्नान करत रहातात, त्यामुळे खूप पाणी वाया जाते. म्हणून मी बादलीतील स्नानाची बाजू घेतो आहे.

३. सध्या बाजारात एक बहुदिशा पॉवर शॉवर आला आहे. हा बहुदिशा शॉवर वापरू नका. याने आपण अधिक स्वच्छ होतो वगैरे भ्रमात राहू नका.

याने आपल्या नेहमीच्या साध्या शॉवरच्या कित्येकपट पाणी वाया जाते.

 

shower inmarathi

 

४. आपण दात घासतो, तेव्हा बेसीनचा नळ फक्त जेव्हा आपण चुळ भरण्यासाठी पाणी हातात घेतो, फक्त तेव्हाच उघडा. दात घासण्याच्या पूर्ण प्रक्रियेच्या काळात सतत नळ उघडा ठेवण्याची खूप जणांना सवय असते.

त्या ५ मिनिटात किमान २० लीटर पाणी वाहून जाते. हेच काम आपण फक्त अर्ध्या लीटर पाण्यात सहज करू शकतो.

असे केले तर माणशी वार्षिक ५००० लीटर पाणी वाचू शकते.

५. आपल्या टॉयलेटच्या बेसीनमधून आपण पाणी फ्लश करतो तेव्हा २० लीटर पाणी वाहून जाते. इतके टॉयलेटच्या स्वच्छतेसाठी आवश्यक नसते.

जर आपण आपल्या फ्लशच्या टाकीत ३/४ विटा किंवा पाण्याने भरलेल्या आणि बुच बंद केलेल्या ४ प्लास्टीकच्या बाटल्या ठेवून दिल्यात तर तितके पाणी वाचेल.

शिवाय आपण टॉयलेटच्या छोट्या भेटीसाठी जातो तेव्हा तर इतक्या पाण्याचीही अजिबात गरज नसते.

आजकाल दोन बटणांचे फ्लश बाजारात मिळतात. जर तुम्ही नवीन घर बांधत असाल तर असे फ्लश आपल्या घरात लावून घ्या.

परंतू ज्यांच्याकडे आधीच फ्ल्श आहेत त्यांनी या वेळी फ्लशची लीव्हर दाबल्यावर लगेच तीच लिव्हर उलटी वर दाबली तर वाहणारे पाणी बंद होते. हे मार्ग वापरल्यानेही आपण माणशी वार्षीक किमान ५००० लीटर पाणी वाचवू शकतो.

 

dual-flush-toilet-inmarathi04

 

६. ज्यांच्याकडे बाग आहे त्यांनी आपल्या बाथरूमच्या छोट्या भेटीत आपण सोडलेले पाणी एका त्या कामासाठी ठेवलेल्या जगमधे साठवून जर बागेत झाडाला घातले तर झाडे जास्त चांगली वाढतात.

७. कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन जरूर वापरा. परंतू त्या आधी एका गोष्टीची खात्री करून घ्या की त्या मशीनच्या ताकदीएवढे कपडे त्यात धुण्यासाठी साठलेले आहेत.

रोज मशीन वापरू नका. साधारण घरातल्या माणसांच्या संख्येनुसार काहींच्या घरी ३ दिवसांनी पुरेसे कपडे साठतील, काहींच्या ५ दिवसांनी.

कपडे कमी म्हणून त्या प्रमाणात कमी पाण्याचा वापर होत नाही. कपडे अगदी कमी असले तरी जवळजवळ तितकेच पाणी वापरले जाते, जितके पूर्ण कपॅसिटी एवढे कपडे धुतले जातात.

वॉशिंगमशीन मधे साधारण एका वापरात ७० लीटर पाणी वापरले जाते. मग त्यात एक कपडा असो किंवा पूर्ण ५ किलो, म्हणजे १५/२० कपडे असोत.

जर आपण रोज मशीन वापरण्याऐवजी फक्त दोन दिवसाआड वापरले तरी वर्षात ३०००० लीटर पाणी वाचेल. हे करण्यासाठी आपली अंतर्वस्त्रे दोन तीन सेटमधे ठेवलीत तरी हरकत नाही.

ती बनण्यासाठी त्यामानाने खूपच कमी पाणी वापरले गेलेले असेल…!

 

washing clothes inmarathi

 

८. आपली वाहने धुण्यासाठी पाईपने वाहते पाणी वापरू नका. असे करणार्‍या लोकांनाही नम्र भाषेत असे करण्याला विरोध करा, त्यांना समजावून सांगा.

होजने, पाईपने एक कार धुण्यात किमान ५०० लीटर पाणी वापरले जाते आणि फुकट जाते. तेच काम दोन बादल्या पाण्यात होवू शकते, म्हणजे फक्त ३० लीटर पाण्यात.

म्हणजे वर्षात किती पाणी वाचेल, पहा गणित करून.

आम्ही तर सांगलीतील काही उद्योजकांनी १९७० मध्ये एक ब्रश तयार केला होता, ज्या ब्रशने एक बादली पाण्यात संपूर्ण एस टी बस धुवून दाखवली होती.

परंतू त्याकाळात फार कार नव्हत्या, त्यामुळे यात व्यावसायिक यश आले नाही आणि आमचे उत्पादन बंद पडले.

आपल्यातले कोणी व्यावसाईक हा ब्रश बनवण्यास तयार असेल तर मी त्याला त्याचे तंत्रज्ञान द्यायला तयार आहे. आहे का कोणी? करा संपर्क माझ्याशी.

आणि हो – जर तुम्ही पावसाचे पाणी साठवू शकत असाल तर ते पाणी कार धुण्यासाठी वापरा.

९. आपल्या नळांना एरिएटर बसवून घ्या. त्यानेही भरपूर पाणी वाचते. यामुळे पाण्यात हवा मिसळली जाते आणि भरपूर पाणी येत असल्याचा एक भास होतो, मानसिक समाधान मिळते.

स्वच्छता चांगली होतेच, पण पाणीही कमी लागते.

१०. आपल्या पैकी काही श्रीमंतांच्या घरात कदाचित स्विमिंग पूलही असेल. (अशक्य वाटतयं? माझ्या दोन मित्रांच्या घरात आहे, तुम्हापैकीही काहींच्या घरात असेल बहुधा) जेव्हा वापरात नाही तेव्हा त्या पाण्यावर वरून एक टरपोलीनचे कव्हर घाला.

बाष्पिभवनाने उडून जाणारे पाणी कमी होईल. तर मित्रांनो, ह्या फार सोप्या सवयी आहेत.

आपल्या रोजच्या दिनचर्येत वरील छोटे छोटे बदल केले तर शेकडो लिटर पाणी आपण वाचवू शकतो…!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?