' १ एप्रिलपासून खिशाला बसणार आणखीनच चाट, या गोष्टी होणार महाग! – InMarathi

१ एप्रिलपासून खिशाला बसणार आणखीनच चाट, या गोष्टी होणार महाग!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महागाईची समस्या आपल्या पाचवीला पुजलेली आहे. त्यातून आपली सुटका होत नाही. त्यामुळे आपल्या ऐपतीप्रमाणे नीट नियोजन करून त्यानुसार आवश्यक तिथे खर्च आणि आवश्यक तिथे बचत करण्यावर आपला कायमच भर असतो. त्यात कोरोनामुळे सगळी परिस्थिती आणखीनच कठीण होऊन बसलीये. अनेकांच्या नोकऱ्या या काळात गेल्या. पुन्हा जम बसेपर्यंत मध्ये बराच काळ गेला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या काळात गरीब श्रीमंतांमधली दरी आधीपेक्षाही आणखी वाढली. सगळ्याच प्रकारचं अस्थैर्य अनुभवणाऱ्या आपल्यातल्या अनेकांना अचानक नव्याने समोर उभ्या ठाकलेल्या आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागलं.

 

Inflation and Economy.Inmarathi
indiatoday.in

“सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही.” या वाक्याचा या काळात अनेकांना प्रत्यय आला असेल. आपापल्या परीने जो तो या सगळ्याशी अजूनही झुंजतोच आहे. त्यात यंदाच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामुळे अनेकांची निराशा झाली आहे. १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत अनेक मूलभूत बदल होणार आहेत.

काही गोष्टी स्वस्तही होतील. पण ज्या गोष्टी महागणार आहेत त्यांचं प्रमाण फारच जास्त आहे. आपल्या नेहमीच्या वापरातल्या गोष्टींच्या बाबतीतच हे घडणार असेल तर? आपल्याला काही या गोष्टी खरेदी करणं टाळता येणार नाहीये. त्यामुळे हा बदल स्वीकारण्याखेरीज आपल्याला गत्यंतर नाही. १ एप्रिल पासून साधारण कुठल्या गोष्टींच्या किंमती वाढतील हे जाणून घेऊ.

१. औषधं :

औषधं ही आपल्याला कधीतरीच लागणारी मात्र अत्यावश्यक गोष्ट आहे. पेन किलर तर हमखास घराघरांत असतेच. शेड्युल्ड औषधांमध्ये १० टक्क्यांपेक्षा जास्त करवाढ करण्याला सरकारने मंजुरी दिल्यामुळे आणि ड्रग प्राइसिंग ऑथॉरिटी ऑफ इंडियाने शेड्युल्ड औषधांच्या किंमतीत १०.७ टक्क्यांनी करवाढ करण्याची परवानगी दिल्यामुळे १ एप्रिल पासून पेन किलर, अँटीबायोटिक्स, अँटी व्हायरससोबत अत्यावश्यक औषधांच्या आणि ८०० पेक्षा जास्त औषधांच्या किंमती वाढणार आहेत.

 

generic-medicine-inmarathi

 

२. कपडे :

मॅकिन्से बिझनेस ऑफ फॅशनच्या अहवालानुसार ग्राहकांपर्यंत कपड्यांचा पुरवठा करणारी जी साखळी आहे तिच्या दडपणामुळे सरासरी ३.२ टक्क्यांनी कपड्यांच्या किंमतीत वाढ होईल. आता कोरोनाचा प्रभाव तसा कमी झालाय. साथीच्या काळात जे ग्राहक दुकानांमध्ये येऊन गेले असतील त्यांच्याकडून विषाणू पसरले गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या दुकानांमधले वॉर्डरोब्स स्वच्छ करण्याचं काम सुरू आहे. २०२२ सालात १५ % फॅशन एग्झिक्युटिव्ह्ज १० टक्क्यांनी किंवा त्यापेक्षा जास्त किंमती वाढवतील असा अंदाज आहे.

 

new clothes inmarathi

 

३. वायरलेस इअरबड्स :

ज्यांना वायरलेस इअरबड्स वापरायची सवय आहे ते आता जरासे खट्टू होतील. कारण, इयरबडच्या निर्मितीमध्ये वापरण्यात येणाऱ्या भागांवर आयात शुल्क वाढवण्यात आले आहे. त्यामुळे वायरलेस इअरबड, नेकबॅन्ड हेडफोन आणि यांसारखी गॅजेट्स विकत घेण्यासाठी आता आधीपेक्षाही जास्त खर्च येणार आहे. हेडफोन्सच्या थेट आयातीवर आता २० % अधिक शुल्क आकारलं जाईल त्यामुळे हेडफोन्स खरेदी करताना आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. प्रीमियम हेडफोनही महागण्याची शक्यता आहे.

 

earbuds

४. रेस्टॉरन्ट्स :

कोरोनाचे परिणाम सगळ्याच ठिकाणी आणि सगळ्याच स्तरांतल्या लोकांवर झालेत. रेस्टॉरन्ट्सवाल्यांपुढे वेगळ्याच समस्या निर्माण झाल्या आहेत. रेस्टॉरन्ट्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये वाढ व्हावी या हेतूने त्यांच्या वेतनात वाढ करण्यात आलीये. याचा परिणाम मेन्यूकार्डवरच्या मेन्यूच्या किंमतींवर होऊन आता हे पदार्थ आणखी महागले आहेत.

 

hotel inmarathi

 

५. गॅस सिलेंडर :

गॅस सिलेंडरच्या किंमती हल्ली दर महिन्याला बदलत असतात. सध्या पेट्रोल, डिझेल, एलपीजीच्या किंमतींमध्ये वाढ होताना दिसतेय. या पार्श्वभूमीवर एप्रिलमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमती वाढू शकतात.

 

gas cylinder-inmarathi04
livemint.com

 

६. घरं :

२०१९-२०च्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने ४५ लाख रुपयांपर्यंत घर खरेदी करणाऱ्यांना गृहकर्जावर अतिरिक्त १.५० लाख रुपये प्राप्तिकर सूट देण्याची घोषणा केली होती. २०२० आणि २०२१ च्या अर्थसंकल्पांमध्ये ही सुविधा वाढवली गेली होती.

मात्र १ फेब्रुवारीला वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून ही सुविधा वाढवली जाणार नाही असे नमूद केले आहे. त्यामुळे, केंद्र सरकार १ एप्रिल पासून पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांना कलम 80EEA अंतर्गत कर सवलतीचा लाभ देणे बंद करणार आहे.

 

home-loan-inmarathi

 

७. नेहमीचे खाद्यपदार्थ :

एप्रिलच्या १ तारखेपासून दूध, अंडी, मांस असे दैनंदिन आयुष्यातले आवश्यक खाद्यपदार्थही महागणार आहेत. कामगारांच्या समस्या आणि मालाचा पुरवठा करणाऱ्या साखळीच्या दडपणामुळे पेप्सी आणि कोकाकोलानेही किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता खरेदी करायला जाताना आपल्याला नेहमीपेक्षाही अधिक रक्कम पाकिटात ठेवावी लागणार आहे. या वर्षी ओरियोची बिस्किटं, सॉर पॅच किइस आणि रिट्स क्रॅकर्स यांच्याही किंमतीत वाढ होणार आहे.

 

milk inmarathi

 

८. वाहनं : 

नव्या कारच्या किंमती गगनाला भिडल्या आहेतच. पण आता वापरलेल्या ट्र्क आणि कारच्या किंमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे सेकंड हॅन्ड कार घ्यायची म्हटली तरी आता दहा वेळा विचार करावा लागेल.

 

car showrrom im

 

याच बरोबरीने क्रिप्टोमध्ये देखील बदल होणार आहेत. पेट्रोलचे दर वाढणार आहेत. या सगळ्यावरून आपल्यातल्या बहुतेकांची आर्थिक ओढाताण यावर्षीही सुरूच राहणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

पैशांच्या बाबतीत पूर्वीसारखा सुकाळ यावा ही आशा करणं यापुढे फिजूल ठरेल कारण ही शक्यता दिवसागणिक जास्तच दुरापास्त होत चालली आहे.

त्यामुळे आता अधिकाधिक काम करून आणि शक्य होईल तितकी काटकसर करून आपला खिसा कसा गरम ठेवता येईल हे पाहणं सगळ्यांच्याच दृष्टीने योग्य ठरेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?