' आजवर कुठल्याच अभिनेत्याला न जमलेली 'ही' गोष्ट मिथुनदांनी करून दाखवलीये!

आजवर कुठल्याच अभिनेत्याला न जमलेली ‘ही’ गोष्ट मिथुनदांनी करून दाखवलीये!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजच्या घडीला कुठल्या क्षेत्रात स्पर्धा नाही! पण गोष्ट जेव्हा सिनेसृष्टीची असते तेव्हा तिथल्या प्रचंड स्पर्धेचं स्वरूप इतर क्षेत्रांपेक्षा कमालीचं वेगळं आणि अधिक आव्हानात्मक असतं. कलाकारांना या स्पर्धेत आपले पाय घट्ट रोवून उभं राहावं लागतं.

डोक्यात हवा गेली तर अगदी आता आतापर्यंत प्रकाशझोतात असलेल्या कलाकाराची लगेचच पीछेहाट होते. त्यामुळे चित्रपटांच्या निवडीपासून फिटनेसपर्यंत सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत कलाकाराला फार जागरूक राहावं लागतं.

 

bollywood actors inmarathi

 

आपली शिस्तबद्ध जीवनशैली, प्रोफेशनॅलिझम आणि उत्तम अभिनयामुळे अनेक अभिनेत्यांनी या इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. अमिताभ बच्चन यांच्यासारखे अभिनेते या वयातही आपलं स्टारडम टिकवून आहेत.

वर्षानुवर्षे उत्तम कामं केलेले, सुपरहिट चित्रपट दिलेले अनेक अभिनेते चित्रपटसृष्टीत आहेत. पण त्या कुणालाही आजवर जमली नाही अशी एक गोष्ट मिथुन दांनी करून दाखवली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कुठलाही विक्रम निर्माण होणे ही नकळतपणे घडणारी गोष्ट असते. प्रयत्नपूर्वक विक्रम तोडून नवा विक्रम करता येतो. पण आधीचा विक्रम घडण्यापूर्वी तो विक्रम घडेल याची कुणालाही कल्पना नसते. त्या विक्रमामुळे विक्रम करणाऱ्याची एक खास ओळख निर्माण होते.

कुठलाही सुपरस्टार करू शकला नाही असा एक विक्रम मिथुन चक्रवर्ती यांनी इतक्यातच केलाय. कुठला विक्रम आहे हा? आणि तो कशामुळे झाला? जाणून घेऊ.

 

mithun da final im

 

१९७६ साली आलेल्या ‘मृगया’ या बंगाली चित्रपटातून मिथुन दांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यांच्या या चित्रपटातल्या अभिनयासाठी त्यांना नावाजलं गेलं होतंच. शिवाय, या पहिल्यावहिल्या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही बहाल करण्यात आला होता. त्यानंतर मिथुन दांनी हिंदी चित्रपटांमधून कामं करायला सुरुवात केली.

बरीच वर्षं कामं करूनही म्हणावं तसं यश त्यांच्या वाट्याला येत नव्हतं. पण म्हणतात ना, ‘वक्त से पहले और किस्मत से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता’. त्याचप्रमाणे, मिथुनदांची वेळ यायची बाकी होती.

१९८२ साली त्यांचा ‘डिस्को डान्सर’ हा चित्रपट आला आणि यशाची दारं त्यांच्यासाठी खुली झाली. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला. यातली गाणी लोकांनी डोक्यावर घेतली आणि त्यानंतर मिथुनदा ‘डिस्को डान्सर’ म्हणूनही ओळखले जाऊ लागले.

mithun disco dancer IM

 

बी. सुभाष यांचा हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर विदेशातही गाजला होता. अगदी रशियातसुद्धा मिथुन दांचे अनेक चाहते होते. हा चित्रपट रशियातील सगळ्यात जास्त कमाई करणारा परदेशी चित्रपट ठरला.

हा त्यांचा पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट होता ज्याने रातोरात मिथुन दांना स्टार केलं. त्यानंतर त्यांनी प्यार झुकता नहीं, कसम पैदा करने वाले की, जागीर, गुलामी अशा एकापेक्षा एक हिट चित्रपटांची मेजवानी रसिकांना दिली.

गेल्या काही वर्षांत मिथुनदा मोठ्या पडद्यावर आपल्याला फारसे दिसले नव्हते. पण कुणाचं नशीब कधी पालटेल सांगता येत नाही. असंच काहीसं मिथुनदांच्याही बाबतीत घडलंय.

गेल्या बऱ्याच दिवसांपासून ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद अजूनही कमी झालेला नाही. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणाऱ्या या चित्रपटातल्या आपल्या अप्रतिम अभिनयामुळे मिथुन दा नव्याने चर्चेत आलेत. याच चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी एक विक्रम केलाय.

 

 

१९८२ साली आलेला त्यांचा ‘डिस्को डान्सर’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. आता तब्बल ४० वर्षांनी आलेला त्यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपटही ब्लॉकबस्टर ठरलाय.

४० वर्षं ब्लॉकबस्टर चित्रपट देण्याचा विक्रम मिथुन दांनी केलाय. मिथुनदांव्यतिरिक्त इतके दिग्गज अभिनेते-अभिनेत्री इंडस्ट्रीत असूनही इतका दीर्घकाळ ब्लॉकबस्टर चित्रपट देण्याचा विक्रम अन्य कुणाच्याही नावावर नाही.

९० च्या दशकात मिथुनदांच्या आयुष्याने एक वेगळंच वळण घेतलं होतं. त्यांनी हॉटेल व्यवसायात आपली क्षमता आजमावून पाहिली आणि ऊटी मध्ये आपला हॉटेल व्यवसाय सुरू करून त्यावर लक्ष केंद्रित केलं. यादरम्यान त्यांनी कमी बजेटच्या बी-ग्रेड चित्रपटांमधून कामं केली होती.

हॉटेलमध्ये आणि हॉटेलच्या आसपासच्या परिसरात त्यांनी या चित्रपटांचं शूटिंग केलं. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. २००० सालापासून त्या दशकाच्या मधल्या काळापर्यंत त्यांनी आपल्यात परिवर्तन घडवून आणत ‘कॅरॅक्टर ऍक्टर’ अशी आपली नवी ओळख निर्माण केली.

 

mithun in the kashmir files IM

 

‘बॉस’, ‘चांदनी चौक टू चायना’, ‘वीर’, ‘किक’ अशा चित्रपटांमध्ये ते मुख्य भूमिकांमध्ये नव्हते. पण या चित्रपटांमधून त्यांनी छोट्या पण प्रभावी भूमिका साकारून प्रेक्षकांना नव्याने आपल्या अभिनयाच्या प्रेमात पाडलं.

कुठल्याही क्षेत्रात कुणीही एखादा विक्रम केला की आधीचा विक्रम तोडून नवा विक्रम कोण करणार याची आपल्याला उत्सुकता असते.

मिथुनदांचा हा हटके विक्रम तोडणं कुणाला सहजासहजी शक्य होईल का आणि हा विक्रम तोडून नवा विक्रम झालाच तर तो कधी आणि कुणामुळे होईल हे येणारा काळच ठरवेल. मिथुन दांच्या या आगळ्यावेगळ्या विक्रमामुळे त्यांच्या असंख्य चाहत्यांना निश्चितच आनंद होईल.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?