' साऊथ-इंडियन म्हणून खाल्ली जाणारी इडली दक्षिणेकडची नाहीच, वाचा मूळ गोष्ट! – InMarathi

साऊथ-इंडियन म्हणून खाल्ली जाणारी इडली दक्षिणेकडची नाहीच, वाचा मूळ गोष्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मित्रांनो प्रत्येक प्रांताची जशी वेगळी बोली भाषा असते वेगळी वेश भूषा असते अगदी तसेच त्या त्या प्रांताची वेगवेगळी खाद्य परंपरा देखील असते. जसे कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा, मुंबईचा वडापाव , पुण्याची मिसळ, आणि उडप्यांची इडली.

इडली हा खाद्य प्रकार अतिशय निराळा आणि भन्नाट आहे. आख्या देशभर विचारत सुटलात तरी एक ही माणूस असा सापडणार नाही ज्याने इडलीवर प्रेम केल नाही. का म्हणून काय विचारताय इडली आहेच अशी सगळ्यांची आवडती.

 

idli IM

 

तुम्ही सगळ्यांनी चेन्नईच्या प्रसिद्ध रेस्टॉरंट चेन ‘माल्लीपू इडली’ बद्दल नक्कीच ऐकलं असेल. टाईम्स ऑफ इंडिया यांच्या रिपोर्टनुसार, २०१५ मध्ये चेन्नईतील त्याच रेस्टॉरंट चेनच्या मालक आणि केटररने हे सुरू केले होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हा दिवस अगदी खास बनवण्यासाठी, एनियावनने सुमारे १३२८ प्रकारच्या इडल्या आणि ४४ किलोचे इडली केक तयार केले आणि ते बुरेटने कापले आणि अशा प्रकारे ३० मार्च हा जागतिक इडली दिवस म्हणून साजरा करण्याचा करार निश्चित झाला.

तेव्हापासून दरवर्षी ३० मार्च हा दिवस जगभरात जागतिक इडली दिन म्हणून साजरा केला जातो. परंतु याहून ही एक गोष्ट आहे जी अतिशय आश्चर्यकारक आहे की साऊथ – इंडियन म्हणून खाल्ली जाणारी इडली, ही दक्षिणेची नाहीच, पेचात पडलात ना? चला तर पाहूया इडलीची मूळ कहाणी!

इडली ही नाश्त्याच्या टेबलची जान आणि शान आहे. सांबर आणि तिखट नारळाच्या चटणीसह उत्तम चव असलेला एक प्रचंड लोकप्रिय स्नॅक म्हणून संपूर्ण भारतभर त्याचा फन्ना उडवला जातो. गल्लोगल्ली सायकल वर इडली सांबार घेऊन फिरणारे अनेक फेरीवाले आपणास सकाळच्या वेळी पाहायला मिळतात.

 

idli 2 IM

 

डाळ तांदळापासून तयार केलेल्या या खाद्यान्नाला भारतीय जिभेला तृप्त करण्याचे वरदान अगदी सहज मिळाले असेल असे ही वाटून जाते. ३० ते ४० ग्रॅमच्या इडलीमध्ये फक्त १ ग्रॅम प्रथिने आणि ७ ते ८ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. व्हिटॅमिन ए आणि फॉलिक अॅसिड सोबतच इडलीमध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखी खनिजेही चांगली असतात.

तज्ज्ञांच्या मते, इडली हे निरोगी जीवनशैली, वजन वाढणे, लहान मुले आणि हृदयरोगींसाठी उत्तम अन्न आहे, तर मधुमेहाच्या रुग्णांनी मर्यादित प्रमाणात सेवन करावे, असे म्हटले जाते.

डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरी (DFRL) ने तर भारताच्या पहिल्या मानव अंतराळ मोहिमेचा भाग म्हणून अंतराळवीरांसाठी चटणी पावडर आणि सांबार पावडरसह ‘स्पेस इडली’ विकसित केली आहे.

कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांनी इडली या रेसिपीचा शोध लावल्याचा दावा केला असताना, खाद्य इतिहासकार के टी आचाय यांच्या मते इडली सध्याच्या इंडोनेशियामधून 800-1200 CE च्या सुमारास भारतात आली असावी.

k t achaya IM

 

जो भूभाग व प्रदेश आता इंडोनेशिया म्हणून संबोधल्या जातो त्या प्रदेशावर एकेकाळी शैलेंद्र, इसियान व संजय घराण्यातील हिंदू राजांची सत्ता होती. वेगवेगळी राजघराणी जेव्हा भारत भेटीला येत तेव्हा त्यांच्यासोबत येणारे स्वयंपाकी कदाचित त्यांच्यासोबत त्यांच्या विशेष पाककृती आणत असत.

आचाय नमूद करतात की इंडोनेशियन पाककृतीमध्ये आंबवलेले आणि वाफवलेले पदार्थ खाण्याची प्रदीर्घ परंपरा आहे आणि केडली ही इडलीची सर्वात जवळची बहीण असल्याचे दिसते.

आचाय कबूल करतात की इडलीचा उल्लेख पूर्वकाळी ‘इडलागे’ म्हणून केला जात असे ज्याचा उल्लेख शिवकोटियाचार्य यांनी ९२० सीईच्या कन्नड भाषेतील ग्रंथ वद्दराधनेमध्ये केला आहे.

आपला उगम स्त्रोत नक्की कोणता हे माहीत नसतानाही  इडलीने शतकानुशतके अनेक खाद्य प्रकारांना ऊर्जा व प्रेरणा दिली आहे.

 

idli 3 IM

 

मोठ मोठ्या थाळी-आकाराच्या इडल्यांपासून ते अगदी छोट्या छोट्या ‘मिनी’ इडल्यांपर्यंत आणि गोवन सन्नास, मँगलोरियन खोतिगे आणि पानात वाफवलेल्या मुडदे इडल्यांपर्यंत, हा सुंदर खाद्य प्रकार निःसंशयपणे भारतीय पाककृती आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?