' “शेअर मार्केटमध्ये चुकूनही करु नका या ५ गोष्टी” नीरज बोरगांवकर यांची पंचसूत्री! – InMarathi

“शेअर मार्केटमध्ये चुकूनही करु नका या ५ गोष्टी” नीरज बोरगांवकर यांची पंचसूत्री!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण सहज आजूबाजूला चौकशी केली तर अशी अनेक उदाहरणं सापडतील जेव्हा सर्वसामान्य लोक डायट प्लॅन किंवा फिटनेस प्लॅन नियमित पाळू शकत नाहीत! यामध्ये अपयश येण्यामागे ते आपल्याला शेकडो कारणे आहेत.

जी लोकं यशस्वी झाली आहेत त्यांची आपण खोलात जाऊन चौकशी केली तर आपल्या लक्षात येईल यामागे केवळ यशाचा मंत्र हा एकच आहे ते म्हणजे सातत्य.

 

success mantra IM

 

इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत जर विचार केला तर सामान्य गुंतवणूकदारासमोर असलेले प्रश्न काही याहून वेगळे नाहीत. पण इन्वेस्टर समोर काही वेगळी कठीण  कारणं आणि चॅलेंजेस देखील असतात.

गुंतवणुकीचे निर्णय घेणे त्यांच्यासाठी खूप कठीण जातं कारण त्यांना असलेलं मर्यादित नॉलेज, मनातील भीती आणि एकांगी विचार करण्याची पद्धत (Bias). सामान्य गुंतवणूकदार इन्वेस्टमेंट पासून दूर राहण्याचं कारण म्हणजे मार्केटचे स्वरूप; मार्केट सतत वर-खाली, दोलायमान परिस्थितीत असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

गोल्ड, बॉन्ड, म्युच्युअल फंड आणि शेअर्स यामधील व्यवहार आता खुप सोपे आणि सोयीचे झाले आहेत, आड येते ती निर्णय-क्षमता.

योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये नेमकं काय करायचं हे समजून सांगणारी विश्वासाची, जबाबदार व्यक्ती हवी, अशीच एक व्यक्ती म्हणजे नीरज बोरगांवकर!

 

neeraj borgaonkar IM

 

गेल्या अनेक वर्षांपासून ते सामान्य इन्वेस्टरला या गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर नीट उलगडून सांगत आहेत.

===

सध्या सर्वजण दुय्यम उत्पन्न मिळवण्याचा एक मार्ग म्हणून शेअर मार्केटकडे बघत आहेत. लॉकडाऊनच्या काळामध्ये भारतीय शेअर बाजारामध्ये उघडण्यात आलेल्या डीमॅट अकाऊंट्सच्या संख्येने सर्व रेकॉर्ड्स ब्रेक केले. करोडो लोकांनी शेअर बाजारामध्ये काम करायची सुरुवात केली.

आजच्या आर्टिकलमध्ये आपण काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. सध्याच्या शेअर मार्केटची तुलना “कॅलिफोर्निया गोल्ड रश” या घटनेशी करता येईल. 1848 सालामध्ये कॅलिफोर्नियाच्या “कलोमा” या भागामध्ये सोन्याच्या खाणी आहेत असा शोध लागला.

या बातमीमुळे लाखो लोक या कलोमा रीजनकडे सोने मिळवण्यासाठी येऊ लागले. अगदी त्याचप्रमाणे आपल्या शेअर बाजारामध्ये भरपूर मोठी संधी आहे हे सर्वांना समजल्यामुळे सर्वजण शेअर बाजाराकडे आकृष्ट होत आहेत. परंतु शेअर मार्केटमध्ये आपले कष्टाचे पैसे गुंतवण्याअगोदर यामधील खाचाखोचा जाणून घेणे हे अतिशय आवश्यक आहे.

आजच्या लेखामध्ये आपण शेअर बाजारामध्ये चुकूनही करु नयेत अश्या पाच गोष्टी बघणार आहोत

१ – करु नये अशी पहिली गोष्ट म्हणजे – “अभ्यास न करता बाजारात येणे”

 

share market studu IM

 

जगातील इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणेच शेअर ट्रेडिंग हादेखील एक व्यवसाय आहे. आणि इतर सर्व व्यवसायांप्रमाणेच या व्यवसायाचेदेखील काही नियम आहेत. ट्रेडिंगला सुरुवात करण्याअगोदर आपल्याला या नियमांचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे

२.  करु नये अशी दुसरी गोष्ट म्हणजे – “आपले पैसे इतरांना सांभाळण्यासाठी देणे”

बाजारामध्ये तुम्हाला असे अनेक लोक भेटतील जे तुम्हाला चांगल्या परताव्याचे आमिष दाखवतील. आमच्या स्कीममध्ये तुमचे पैसे गुंतवा आणि चांगला परतावा मिळवा किंवा तत्सम गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे, अश्या प्रकारच्या सर्व स्कीम्स या बेकायदेशीर असतात. दुसर्‍यांचे पैसे जर सांभाळायचे असतील तर SEBI कडून तशी परवानगी घेणे आवश्यक असते. आणि अश्या परताव्याच्या जाहिराती करणार्‍या कोणाकडेच ही परवानगी नसते. तुम्हाला जर शेअर बाजार कळत नसेल तर तुम्ही सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजरचा सल्ला घेऊ शकता,

तसेच सेबी मान्यताप्राप्त अश्या “पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्कीम” (PMS) मध्ये तुमचे पैसे गुंतवू शकता. परंतु अश्या PMS मध्ये गुंतवायची किमान रक्कम ही पन्नास लाख रुपये इतकी आहे. त्यामुळे तुम्ही जर लहान गुंतवणूकदार असाल तर तुम्ही अश्या PMS मध्ये गुंतवणूक करु शकत नाही.

 

portfolia management scheme IM

 

लहान गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचा उत्तम मार्ग म्हणजे “म्युच्युअल फंड्स” हा असतो. म्युच्युअल फंडांमध्ये तुम्ही 100 रुपयांपासून गुंतवणूक करु शकता. म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक चांगले प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत. गुंतवणूक कट्ट्याद्वारेदेखील एक अतिशय सोपा असा इन्व्हेस्टर हा प्लॅटफॉर्म विकसित केलेला आहे. या प्लॅटफॉर्मच्या मदतीने तुम्ही सोप्या प्रकारे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करु शकता.

( इन्व्हेस्टर प्लॅटफॉर्मची लिंक – https://investor.guntavnook.com )

३. करु नये अशी तिसरी गोष्ट म्हणजे – “शेअर मार्केट हे इझी मनी मिळवण्याचे साधन आहे असे समजणे”

प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये पैसे मिळवण्याकरिता काही ना काही काम करीत असतो. काहीजण नोकरी करतात, काहीजण व्यवसाय करतात. आपल्या नोकरी किंवा व्यवसायामधून पैसा कमावण्यासाठी किती कष्ट करावे लागतात हे फक्त ते काम करणारा व्यक्तीच सांगू शकेल.

असे असताना शेअर बाजारामध्ये तुम्ही याल आणि रातोरात श्रीमंत व्हाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ही कल्पना साफ चूक आहे. किंवा हिंदी भाषेमध्ये ज्याला “खयाली पुलाव” म्हणतात तसे आहे. इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणेच शेअर बाजारामध्ये देखील कष्ट आहेत, अभ्यास आहे, संयम आहे. आपल्याला जर येथे यशस्वी व्हायचे असेल तर कष्ट, अभ्यास, संयम याला पर्याय नाही.

४. करु नये अशी चौथी गोष्ट म्हणजे – “सुरुवातीलाच भरपूर पैसे इन्व्हेस्ट करणे”

तुम्हाला जर पोहायला शिकायचे असेल तर तुम्ही थेट खोल समुद्रामध्ये उडी मारता का? सर्वात पहिले तुम्ही एखाद्या उथळ जागी सराव करता. किंवा गावाकडे पाठीला डबे बांधून विहिरीत उतरण्याची पद्धत आहे. गावाकडे ज्याला पोहता येते अश्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली आपण पहिले विहिरीमध्ये, तळ्यात, नदीच्या काठावर सराव करतो.

असे करत करत आपल्याला पोहणे जमायला लागले की मगच आपण खोल पाण्यात जाण्याचे धाडस करतो. परंतु शेअर मार्केटमध्ये नविन माणसाची होत असणारी सर्वात मोठी चूक म्हणजे तो एकदम मोठी रक्कम शेअर बाजारामध्ये गुंतवतो. कारण त्याला एकदम जास्त पैसे मिळवायचे असतात. पण तुम्ही ही चूक अजिबात करु नका.

 

investment new inmarathi
disha finance & investment

 

शेअर बाजाराच्या समुद्रामध्ये उतरताना शंभर रुपये, पाचशे रुपये, पाच हजार रुपये अश्या लहान रकमेपासून सुरुवात करा. दोन पाच महिने सराव करा आणि तुमच्यामध्ये थोडासा आत्मविश्वास निर्माण झाला की मगच तुमची गुंतवणूक वाढवा.

५. करु नये अशी पाचवी गोष्ट म्हणजे – “टिप्सवर अवलंबून राहणे”

शेअर बाजारामध्ये “टिप्स” किंवा “कॉल” देणारे तुम्हाला भरपूर सापडतील. या सर्व टिप्स किंवा कॉल्स चालत नाहीत असे मी म्हणत नाही. परंतु ही टिप त्या व्यक्तीने कोणत्या आधारावर काढली? याचा विचार आपण केला पाहिजे.

शेअर मार्केटमध्ये काय प्रकारचे चढ-उतार होऊ शकतील याचा अभ्यास करण्यासाठी “टेक्निकल अ‍ॅनालिसिस” नावाचे एक शास्त्र आहे. या शास्त्राच्या आपण जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे. आपण जितके या विषयामध्ये खोल जाऊ तितके यश आपल्याला मिळणार आहे हे लक्षात ठेवा.

समजा तुम्हाला आज कोणी टिप दिली, तुम्ही शेअर घेतले, प्रॉफिट झाला. इथपर्यंत ठीक आहे. पण उद्या जर त्या व्यक्तीने टिप दिली नाही तर? किंवा उद्याची त्याची टिप चालली नाही तर? किंवा त्याने चुकीच्या हेतुने काही चुकीची टिप दिली तर? या सर्व प्रश्नांमध्ये अडकण्यापेक्षा तुम्हीच टेक्निकल अ‍ॅनालिसिस का नाही शिकत? तुम्ही एकदा मासा पकडायला शिकलात की तुम्हाला आयुष्यभर दुसर्‍या कोणावर अवलंबून रहावेच लागणार नाही!

तुम्हाला शेअर बाजारचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेता यावे यासाठी गुंतवणूक कट्ट्याद्वारे “पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन” हा उपक्रम चालवला जातो. या उपक्रमाची संपूर्ण माहिती घेण्यासाठी एका नि:शुल्क वेबिनारचे आयोजन केले आहे.

 

neeraj borgaonkar 2 IM

तुम्हाला जर याविषयी जाणून घ्यायचे असेल तर वेबिनारसाठी तुमचे नाव रजिस्टर करा म्हणजे वेबिनारची लिंक तुम्हाला ईमेलवर पाठवण्यात येईल.

वेबिनार रजिस्ट्रेशन लिंक – https://www.guntavnook.com/webinar

===

टीप : वरील माहिती ही फक्त आणि फक्त तुमच्या ज्ञानात भर पडावी याच उद्देशाने दिली गेली आहे. या माहितीच्या आधारावर शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नये, शेअर्समध्ये गुंतवणूक करताना तज्ञ मंडळी यांचा सल्ला घेऊन नीट अभ्यास करूनच गुंतवणूक करावी.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?