' कट्टर शिवसैनिक, पण तरीही या नेत्यांनी व्यक्त केली महाविकास आघाडीबद्दल नाराजी – InMarathi

कट्टर शिवसैनिक, पण तरीही या नेत्यांनी व्यक्त केली महाविकास आघाडीबद्दल नाराजी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. पाच वर्ष आम्ही पूर्ण करू अशी ठाम मते असणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच आघाडीतून बाहेर पडून बंडखोरी केली आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले ५० आमदार सध्या गुवाहाटीमध्ये आहेत पुढील राजकीय डावपेच आखण्यासाठी तिकडे गेले असावेत असा अंदाज बांधला जातोय. मात्र या आघाडीबद्दल शिवसेनेत काही जणांनामध्ये आधीपासून नाराजी होती.

भाजपसोबत राहून आम्ही २० वर्ष सडत राहिलो, अशी ओरड शिवसेनेच्या नेत्यांकडून होतच असते. एकेकाळी सख्या भावाप्रमाणे राहणारे शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून  एकमेकांच्या विरोधात उभेच ठाकले आहेत.

महाविकास आघाडी सरकार स्थापन व्हायच्या आधीपासूनच त्यांच्यात शीतयुद्ध सुरु होते हे साऱ्या जनतेने बघितले होते. मुख्यमंत्री आमचाच होणार अशा मतावर संजय राऊत ठाम होते आणि अखेर त्यांनी आपले मत खरे करून दाखवले. उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी केली आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले.

 

mahavikas aghadi inmarathi

 

शिवसनेच्या या निर्णयामुळे भाजप चांगलाच खवळला, सत्तेत आल्यापासून शिवसेनेतल्या मातब्बर मंडळींच्या मागे ईडीची पीडा सुरु झाली, प्रताप सरनाईकांपासून ते अगदी संजय राऊत असो अनेकांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागले. शिवसेना आणि भाजपमधील ही कुरघोडी जरी सुरु असली तरी एकीकडे शिवसेनेतील काही मंडळी या महविकास आघाडीवर चांगलीच नाराज आहेत. त्यांनी ही नाराजी अगदी उघडपणे मांडली आहे, ते नेमके काय म्हणाले आहेत जाणून घेऊयात…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

संजय जाधव :

कोणतीही तमा न बाळगता आपल्या बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले परभणीचे खासदार संजय जाधव, एकेकाळी शिवसेनेत सामान्य कार्यकर्ता म्हणून ओळखले जायचे. आपला राजकीय प्रवास नगरपरिषदेपासून सुरवात करून तो दिल्लीपर्यंत नेला, दोन वेळा ते परभणी मतदार संघातून निवडणून आले.

 

sanjay shiv im

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात त्यांनी आपल्या बिनधास्त बोलण्यातून नाराजी व्यक्ती केली ते असं म्हणाले की वेळ आली तर राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही पायाखाली घालू, अशा शब्दात त्यांनी थेट इशारा दिला.

अनंत गीते :

मुंबईच्या महानगरपालिकेत नगरसेवकापासून आपल्या राजकीय प्रवास सुरु करणारे अनंत गीते सलग सहा वेळा लोकसभेवर निवडणून आले आहेत. रत्नागिरी मतदार संघातून ते सर्वप्रथम निवडणून आले, २०१९ साली ते रायगड मतदार संघातून राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांच्याकडून पराभूत झाले.

 

suni-gite inmarathi
loksatta.com

 

मध्यंतरी ते एका भाषणादरम्यान असं म्हणले की राष्ट्रवादीचा जन्मच मुळात काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे त्यामुळे शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाही. त्यांच्या या विधानाने चांगलीच खळबळ माजली होती.

गजानन कीर्तिकर :

शिवसेनेत जसे आरे ला कारे करणारे शिवसैनिक आहेत त्याचप्रमाणे शांततेत काम करणारे शिवसैनिक देखील आहेत. मूळचे मुंबईचे असलेले गजानन कीर्तिकर बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. पेशाने ते रिजर्व बँकेत कामाला होते मात्र शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपले आयुष्य समाजकार्यसाठी वाहून घेतले.

 

gajanan im

 

शिवसेनेचे संजय राऊत कायम म्हणतात हे सरकार ठाकरे सरकार आहे, याच वाक्यावर गजानन कीर्तिकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली ते म्हणाले आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार मात्र लाभ घेतंय पवार सरकार.

श्रीरंग बारणे :

पिंपरी चिंचवड हा परिसर खरं तर राष्ट्रवादी काँगेस पक्षाचा बालेकिल्ला, खुद्द शरद पवार यांच्या नातवाला याच मतदार संघात धूळ चारणारे दुसरे तिसरे कोणी नसून ते आहेत श्रीरंग बारणे, पिंपरी चिंचवड महानगपालिकेपासून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरवात केली आणि २०१९ साली ते खासदार म्हणून निवडणून आले.

 

barne im

जालना येथील कार्यक्रमादरम्यान ते असं म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेत आहेत. निधी वाटपरवरून देखील त्यांनी टीका केली होती.

तानाजी सावंत :

शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या तानाजी सावंत महविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून त्यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने ते चांगलेच नाराज आहेत, सध्या ते उस्मानाबाद येथील परांडा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात.

महाविकास आघाडीतील निधी वाटपावरून ते देखील नाराज झाले आहेत. सोलापुरात एका कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली ते असं म्हणाले की राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोघे शिवसेनेबरोबर सत्तेत आहेत ना मग शिवसेनेवर अन्याय का करताय? आमचा सतत अपमान होणार असेल तर साहेब एकदा विचार करा, अशा शब्दात त्यांनी आपले मते मांडली आहेत.

 

tanaji im

 

महाविकास आघाडी सरकार ६ महिन्यात कोसळेल, वर्षभरात कोसळेल अशी भाकीत विरोधी पक्ष करत असतोच मात्र आज जवळजवळ अडीच वर्ष होऊन गेली तर सरकार अस्तित्वात होते मात्र आता अशा भूकंपामुळे ते पुन्हा अस्थिर झाले आहे हे नक्की…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?