' झाला अपघात, मोडली कोटींची टेस्ला, तरीही हा माणूस का मानतोय इलॉन मस्कचे आभार? – InMarathi

झाला अपघात, मोडली कोटींची टेस्ला, तरीही हा माणूस का मानतोय इलॉन मस्कचे आभार?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपल्याकडे असलेल्या मौल्यवान वस्तू आपण नेहमीच प्राणापलीकडे जपतो, पण आपल्या जीवापेक्षा दुसरं काहीच मौल्यवान नाही. एरव्ही आपण कितीही सावधगिरी बाळगून असलो, तरी आपल्या अस्तित्त्वाचं आपल्याला सतत भान नसतं, पण जेव्हा आपला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींचा जीव धोक्यात असतो तेव्हा जीव वाचवण्याची कितीही मोठी किंमत चुकवायची आपली तयारी असते.

एकदा जीव वाचला आणि सगळं काही शांत, स्थिरस्थावर झालं की कदाचित त्यादरम्यान आपल्याला काय काय गमवावं लागलं याबद्दल आपण काहीशी हळहळ व्यक्त करू, पण तरी आपल्या जवळच्या व्यक्तीचा जीव वाचला याबद्दल आपण आधी देवाचे आभारच मानतो.

अशीच काहीशी घटना आपल्या टेस्ला या कारचा अपघात झालेल्या एका इसमाच्या बाबतीत घडलीये. इलेक्ट्रिक कार्सच्या दुनियेतलं टेस्ला हे आघाडीचं नाव. ही कार नेहमी बड्या मंडळींकडे पाहायला मिळते. भारतातल्या केवळ ४ जणांकडेच ही टेस्ला कार आहे. मुकेश अंबानी हे त्यांपैकी एक. यावरून ही कार एखाद्याकडे असणं ही बाब त्या व्यक्तीचा स्टेटस सिम्बॉल समजली जाते हे लक्षात येतं.

 

tesla car im 1

 

टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क हे नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतात. मग ते त्यांच्या कामानिमित्त असो, बिलियनर स्टेटसविषयी असो की त्यांच्या वादग्रस्त ट्विट्स साठी, पण इलॉन मस्क सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलेत. टेस्ला वापरणाऱ्या एका इसमाने एका गोष्टीसाठी इलॉन मस्कचे आभार मानलेत. पण नेमके कशासाठी? जाणून घेऊया.

पॉल केली या व्यक्तीने इलॉन मस्कच्या कारने एका मोठ्या अपघातात आपले आणि आपल्या कुटुंबियांचे प्राण वाचवले असल्याचं इतक्यातच ट्विट केलं आहे. त्याच्या प्रोफाईलवरून ही व्यक्ती एक ‘इलेक्ट्रिक वेहिकल एन्थुझिऍस्ट’ असल्याचं समजतं.

पॉल केली इरलँडचा असल्याची शक्यता आहे. अपघाताच्या या घटनेनंतर पॉलच्या टेस्ला कारची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. भिंतीवर जोरात धडकल्यामुळे कारच्या पुढच्या बाजूची पूर्णतः वाट लागली.

 

tesla car im

 

इतकी दुरवस्था झालेल्या या कारचा फोटो पॉलने ट्विटरवर शेअर केला आहे आणि “माझं कुटुंब सुरक्षित राहिलं याकरता इलॉन मस्क आणि टेस्ला तुमचे आभार. कार उद्वस्थ झालीये पण आम्ही सुखरूप आहोत.”, अशी कॅप्शन दिली आहे. केलीच्या म्हणण्यानुसार, हा अपघात झाला त्यावेळी केली आणि त्याची दोन मुलं त्या कारमध्ये होती.

केलीने लिहिलंय, “माझी दोन मुलं आणि मी कृतज्ञ आहोत. ही घटना घडली त्यावेळी अग्निशामक दल तिथे होतं आणि आम्ही अँब्युलन्सची वाट पाहत होतो तेव्हा पूर्णवेळ ते आमच्यासोबत होतं. आम्हाला काही गंभीर दुखापत झाली नाही याबद्दल मी खरोखरच आभारी आहे.”

केलीने ज्या भिंतीवर ही कार आदळली त्या भिंतींचाही फोटो शेअर केला आहे. ही भिंत अगदी व्यवस्थित उभी आहे मात्र भिंतीचा अगदी थोडासा भाग तुटल्याचं आपल्याला त्या फोटोत दिसतं. अपघातादरम्यान कार भिंतीवर जोरात आदळली आणि तिथेच फिरली असं त्याने म्हटलंय. त्या कुणालाही अगदी थोड्या जखमा वगळता काही गंभीर दुखापत झाली नाही.

 

tesla car im 2

 

पॉल केलीचं ट्विट वाचून त्यावर लोकांनी आपले कसे अपघात झाले होते आणि आपल्या कार्सनी आपल्याला कसं वाचवलं याविषयी ट्विट्स केली आहेत. आपल्या कारची इतकी वाईट अवस्था झाली नव्हती अशीही ट्विट्स काहींनी केली आहेत. बऱ्याच जणांनी पॉल आणि त्याच्या कुटुंबियांसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

पॉल केलीकडे टेस्लाचं Model 3 LR होतं. बऱ्याच वेळा तो ‘ऑटो पायलट’ मोड कसा वापरायचा हेही त्याने नमूद केलं आहे.

एखादा अपघात काही मिनिटांत एखाद्याचं किती मोठ्या प्रमाणावर नुकसान करू शकतो. इतकी महागडी कार विकत घ्यायला पॉल केलीला पाण्यासारखा पैसे ओतावा लागला असेल, पण या अपघातामुळे आपल्या या मौल्यवान कारकडे बघण्याचा पॉलचा दृष्टिकोनच बदलून गेला असेल.

जीव वाचला तर आपल्याकडे असलेल्या मौल्यवान वस्तूंना किंमत असते. आपल्या स्वतःच्या अस्तित्वापलीकडे त्यांना किंमत नाही हीच गोष्ट या प्रसंगातून आपल्या लक्षात येते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?