' ‘मातोश्रींना’ महागडं घड्याळच नाही, या ५ गोष्टी दिल्यात, तरीही ती खुश होईल – InMarathi

‘मातोश्रींना’ महागडं घड्याळच नाही, या ५ गोष्टी दिल्यात, तरीही ती खुश होईल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’, अशी आपल्याकडे म्हण फार पूर्वीपासून चालत आली आहे, अगदी सिनेमावाले, लेखक मंडळींनी आई या व्यक्तीरेखेवर आपली करियर घडवली आहेत. मदर इंडिया सिनेमापासून ते अगदी वास्तव सारख्या सिनेमापर्यंत आपल्या पोटच्या मुलाला मारणारी एक वेगळ्या धाटणीची आई दाखवली आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आज मेरे पास गाडी हैं बंगला हैं तुम्हारे पास क्या है? अशा थाटात बच्चनजीं आपल्या मोठ्या भावाला प्रश्न विचारात त्यावर प्रांजळपणे मोठा भाऊ उत्तर देतो मेरे पास माँ हैं, बॉलीवूडमधला आईवरच हा अजरामर डायलॉग आजतागायत लोकांच्या लक्षात आहे. आईच जस आपल्या मुलांवर निस्सीम प्रेम असतं त्याचप्रमाणे मुलांचे देखील आपल्या आईवर प्रेम असत.

 

sunil dutt mother India IM

 

मदर्स डेला अनेकजण आपल्या आईला भेटवस्तू देतात, लांब परदेशात असलेली मुलं व्हाट्सअँपच्या माध्यमातून शुभेच्छा देत असतात. आपापल्या ऐपतीप्रमाणे आपल्या आईला भेटवस्तू देत असतात, सध्या शिवसेनेचे मुंबई महानगपालिकेचे स्थायी समितेचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर आयटी डिपार्टमेंट धाडी टाकल्या ज्यात त्यांनी काही महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्या आहेत.

खरं तर भेटवस्तू देणं ती महाग असो किंवा स्वस्त त्यातील तुमची भावना महत्वाची असते. महागड्या वस्तूंऐवजी तुमच्या आईला खालील गोष्टी देऊन तुम्ही नक्कीच तुमचं नातं दृढ करू शकता…

 

gift inmarathi

 

 

वेळ :

आजच्या ५g च्या जमान्यात लोकांना फास्ट लाईफशी सवय झाली आहे. कामाच्या अगणित वेळा यामुळे कुटुंबाकडे वेळ द्यायला घरातील कर्त्या पुरुषाला वेळ नसतो, त्यामुळे आपल्या आईसाठी सर्वात महत्वाची गोष्ट करा ती म्हणजे तिला आपल्या व्यस्त  शेड्युलमधून वेळ काढा आणि तिच्यासोबत गप्पा मारा, तिला बाहेर फिरायला घेऊन जा.

 

mother im

 

कामात मदत :

आई गृहिणी असो किंवा वर्किंग वुमन ती सदैव आपल्या घरासाठी, घरातल्या माणसांसाठी उभी असते. ती आजारी पडली तर पूर्ण घरअस्ताव्यस्त होत, तर संपूर्ण घरासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या या माऊलीसाठी आपण देखील थोडीशी मेहनत घेऊयात. आईला घरकामात मदत करणे, अथवा एक दिवस तिला संपूर्ण घरकामातून विश्रांती देणे, कामावरून थकून भागून आल्यावर एखादा चहाचा कप तिच्यासमोर ठेवावा, या अशा साध्य साध्या कामातून आपण तिचंच आयुष्य आणखीन वाढवत असतो.

sreedevi inmarathi

 

 पर्स :

असं म्हणतात स्त्रियांच्या पर्समध्ये संपूर्ण जग मावू शकते, आज कामाला जाणाऱ्या किंवा अगदी घरात असणाऱ्या आईला ही छानशी अशी पर्स देऊ शकता. आज बाजारात महागड्या पर्स देखील आहेत मात्र आईला नेमक्या कोणत्या पर्सची गरज आहे हे ओळखून तिला एखादी छानशी पर्स भेट द्या.

 

purse im

 

साडी :

आज स्त्रियांच्या कपाटात कितीही साड्यांचा खच पडला असला तरी तिला नवीन साडी घेण्याचा मोह काही आवारत नाही. बायकोसाठी साडी जितक्या तत्परतेने घेता तितक्याच पद्धतीने आईला देखील तिच्या पसंतीची साडी भेट म्हणून द्या.

 

sarees im

आवडत्या हॉटेलात जेवायला घेऊन जाणे :

आज कितीही म्हंटल तरी रोज जेवण बनवणाऱ्या स्त्रीला जर एकवेळेला आयते जेवायला मिळाले तर त्यासारखे मोठे सुख तिला नाही. आपल्या आईला जे हॉटेल किंवा ज्या पद्धतींचे जेवण आवडते त्या पद्धतीचे जेवायला घाला, एखाद्या छानशा हॉटेलात न्या, तिच्या आवडीचे पदार्थ मागावा.

 

hotel inmarathi

 

आजकाल केवळ भेटवस्तू मिळावी म्हणून कोणते ना कोणते दिवस साजरे केले जातात, मात्र जी आई केवळ आणि केवळ आपल्या मुलांच्या भल्यासाठी आयुष्य खर्च करते आपले सर्वस्व पणाला लावते अशा आईच्या उपकारांची परतफेड तर करणे अशक्य आहे मात्र महागडी भेटवस्तू न देता, तिच्या उतरत्या वयात तिला आधार द्या, तिची काळजी घ्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?