' "फक्त आणि फक्त पुतीनच साऱ्या जगावर राज्य करतील" बाबा वांगांची पुन्हा भविष्यवाणी

“फक्त आणि फक्त पुतीनच साऱ्या जगावर राज्य करतील” बाबा वांगांची पुन्हा भविष्यवाणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगात अशी अनेक लोक आहेत, ज्यांचा भविष्यवाणीवर सहज विश्वास ठेवला जातो. तर त्याचवेळी बरेच लोक असेही आहेत ज्यांचा या गोष्टींवर अजिबात विश्वास नाही. जगामध्ये भविष्य सांगणारे अनेक लोक होऊन गेले आणि विशेष म्हणजे यांपैकी अनेकांचे भाकित खरेही ठरले आहेत.

यांपैकीच एकाचे नाव सगळ्यांच्या जिभेवर असते आणि ते म्हणजे ‘बाबा वांगा’. बाबा वांगा यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये अनेक भाकिते वर्तवली होती, यातील बहुतेक अंदाज खरे ठरले आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जसे की अमेरिकेमध्ये झालेली ९/११ दहशतवादी घटना, आयसिस या दहशतवादी संघटनेची सुरुवात आणि बराक ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्रपती होतील, इत्यादी बाबा वांगाची सर्व भाकिते खरी ठरली आहेत.

 

baba wanga IM

 

आता पुन्हा एकदा बाबा वांगा चर्चेमध्ये आली आहे. मृत्यूपूर्वी बाबा वेंगा यांनी रशियाच्या व जगाच्या बाबतीत एक मोठी भविष्यवाणी करून ठेवली होती, जी आता खरी होताना दिसत आहे.

बाबा वांगा यांची वयाच्या बाराव्या वर्षी अचानक डोळ्यांची दृष्टी गेली होती. त्यावेळी असे म्हंटले गेले की त्यांच्यावर देवाची कृपा झाली आहे आणि त्यामुळेच त्यांना भविष्य बघता येत आहे, असे मानले जाऊ लागले.

युक्रेनवर रशियाने हल्ला केला आहे. दोन्ही देशांमध्ये घनघोर युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनमध्ये नासधूस केली असून मोठे नुकसान केले आहे.

 

ukraine russia featured IM

युक्रेनची राजधानी कीवसह देशातील अनेक शहरांमध्ये इमारतींसह मालमत्तेचे नुकसान झाले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा अहंकारी चेहरा जग पाहत आहे.

आता रशिया पुन्हा एकदा जगाचा राजा होणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. यादरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दल बल्गेरियाचे अंध गूढवादी भविष्य पाहणारी बाबा वांगा यांची भविष्यवाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तर पाहूया बाबा वांगा यांची रशिया व पुतीनच्या बाबतीत केलेली भविष्यवाणी.

बाबा वांगा यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या संदर्भात भाकीत केले आहे आणि सांगितले की सर्व काही बर्फासारखे वितळून जाईल आणि शिल्लक राहिला फक्त व्लादिमीरची शान आणि रशियाचे वैभव. ते पुढे म्हणतात की, रशियाला कोणीही रोखू शकत नाही.

 

putin vanga IM

 

सध्या रशिया युक्रेन यांच्यात चालू असलेल्या युद्धामध्ये इतर देशही उडी मारतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्याबद्दल बाबा वांगा यांनी भविष्यवाणी केली नसली तरी ते असं म्हणाले आहेत की, २०७९ सालापर्यंत युरोप जळून बेचिराख होईल.

कोण आहे बाबा वांगा?

बाबा वांगा यांचा जन्म १९११ मध्ये झाला होता. तिने दावा केला की वयाच्या १२ व्या वर्षी एका मोठ्या वादळात तिची दृष्टी गूढपणे गेली. त्यानंतर तिला भविष्य पाहण्यासाठी देवाकडून एक अत्यंत दुर्मिळ भेट देण्यात आली. १९९६ मध्ये जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांनी ५०७९ पर्यंत चाललेली भविष्यवाणी केली होती.

या वर्षी जगाचा अंत होईल, असे भाकीत त्यांनी केले होते. सोव्हिएत युनियनचे विघटन, प्रिन्सेस डायनाचा मृत्यू आणि २००४ मध्ये थायलंडची सुनामी, चेरनोबिल आपत्ती आणि बराक ओबामा यांच्या अध्यक्षतेबद्दलचे त्यांचे दावे खरे ठरले आहेत. बाबा वांगा यांचे १९९६ मध्ये वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले.

 

baba vanga 3 IM

बाबा वांगा यांची भारताविषयी भविष्यवाणी –

बाबा वांगा यांनी भारताबाबत भाकीत केले होते की, येथील तापमान ५० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होईल.

त्यामुळे पिकांवर टोळांचा हल्ला होऊन दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होईल. २०२२ मध्ये जगातील मोठ्या शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे परिणाम दिसून येतील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला.

त्याचबरोबर नद्यांच्या प्रदूषणामुळे वाहणारे पाणी कमी होईल. २०२२ मध्ये, लोक पूर्वीपेक्षा जास्त वेळ स्क्रीनवर घालवतील, म्हणजेच लोक संगणक आणि मोबाईलवर जास्त वेळ घालवतील.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?