' गोष्ट अब्दुल कलामांच्या कर्तव्यनिष्ठतेची, राष्ट्रपती भवनात कुटुंबीय राहिले म्हणून…. – InMarathi

गोष्ट अब्दुल कलामांच्या कर्तव्यनिष्ठतेची, राष्ट्रपती भवनात कुटुंबीय राहिले म्हणून….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की ३०० आमदारांना मुंबईत राहण्यासाठी घरे बांधून देणार, त्यांच्या या घोषणेने एकच गदारोळ उडाला आहे, आधीच महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची रोज नवी प्रकरणे बाहेर येत आहेत. केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार हा वाद दोन वर्ष सुरु आहेच.

मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेने सर्वसामान्य जनता मात्र चांगलीच नाराज झाली आहे, आज सामान्य नागरिकांना मुंबईत घरे स्वस्तात मिळत नाही, आणि इथे आमदार निवास सारख्या वास्तू असून देखील आणखीन घरे कशाला असा सवाल अनेकांना पडला आहे.

 

uddhav thackrey inmarathi

 

आज मुंबईत महाराष्ट्रातून आलेल्या तळागाळातील कार्यकर्त्यांची हक्काची राहण्याची जागा म्हणजे आमदार निवास, मात्र अनेक वर्षांपासून अस्तित्वात असेलेल्या या वास्तू अगदीच खराब झाल्या आहेत, त्यांची पुनर्रचना मुद्दा येत असतोच.

 

aamdar niwas im

 

अल्प दरात जरी या निवासात राहता आले तरी सरकारवर याचा भार असतोच, आज अनेक आमदारांचे मुंबईत स्वतःची घरे आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांना हा एकमेव पर्याय असतो, मात्र असे जरी असले तरी सरकारवर आपला बोझ नको म्हणून आपल्या नातेवाईक ज्या भवनात राहिले तिथला खर्च त्या व्यक्तीने केला होता ती व्यक्ती म्हणजे अब्दुल कलाम..

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अब्दुल कलाम त्यांच्या प्रामाणिकपणा, सचोटी आणि विनम्रता या गुणांसाठी आपल्या सगळ्यांचे कायमच आदर्श राहतील. इतक्या मोठ्या पदावर असूनही त्यांनी कधी त्याचा बडेजाव केला नाही. आपल्या राष्ट्रपतीपदाचा त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी किंवा आपल्या कुटुंबियांच्या फायद्यासाठी कधीही गैरवापर केला नाही.

 

abdul kalam inmarathi

 

आपल्यातल्या बहुतेकांना कल्पना नसेल पण ज्यावेळी अब्दुल कलमांचा शपथविधी झाला त्यावेळी त्यांचे कुटुंबीय रामेश्वरमहून प्रवास करून राष्ट्रपती भवनात आले असताना त्यांच्या सगळ्या प्रवासाचा खर्च आणि आणि त्यांचे कुटुंबीय जितका काळ राष्ट्रपती भवनात राहिले त्यावेळी झालेला सगळा खर्च कलामांनी आपल्या स्वतःच्या खात्यातून केला होता.

कलामांच्या अत्यंत सरळमार्गी असण्याची आणि साधेपणाची याहून दुसरी साक्ष कुठली असेल! कलामांचा शपथविधी झाला तेव्हा त्यांचे ५२ कुटुंबीय राष्ट्रपती भवनात आले होते. कलामांनी आपल्या सार्वजनिक आयुष्यात उच्च नीतिमूल्यं कायमच जपली. पण त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात त्यांनी त्यांच्या कुटुंबियांशी असलेले बंधही उत्तमरीत्या जपल्याचे प्रसंग त्यांच्या काही जवळच्या नातलगांनी सांगितले.

‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना कलाम यांचा नातू के. अजमल म्हणाला, “जेव्हा ‘थाथांनी’ (माझ्या आजोबांनी) राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली तेव्हा आम्ही कुटुंबीय पहिल्यांदा दिल्लीला गेलो होतो. आमचा जवळपास ५० जणांचा लवाजमा होता. आमच्या संपूर्ण प्रवासाच्या खर्चाचे पैसे माझ्या आजोबांनी स्वतः दिले.”

आपल्या स्मृतींना उजाळा देत अजमलने सांगितलं की, २००५ साली कुटुंबातले ५२ सदस्य दिल्लीला भ्रमंती करायला गेले होते. कदाचित तो एकमेव प्रसंग असेल जेव्हा त्यांनी राष्ट्रपती भवनातल्या आदरातिथ्याचा आनंद लुटला होता. अजमल पुढे म्हणाला, “रामेश्वरम वरून दोन बसेसमधून आम्ही मदुराईला गेलो.

 

train turn 1 InMarathi

 

मदुराईहून आम्ही सगळ्यांनी निझामुद्दीन एक्सप्रेस पकडली. पोहोचल्यावर राष्ट्रपती भवनाकडे जाणाऱ्या दोन बसेसमध्ये आम्ही बसलो. आमचं स्वागत करायला माझे आजोबा राष्ट्रपती भवनापाशी थांबले होते. प्रत्येक कुटुंबाला एकेक खोली देण्यात आली होती आणि संपूर्ण १० दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

जवळपास सगळ्याच दिवशी आम्हाला राष्ट्रपतींसोबत भोजन करता आलं. विविध अन्नपदार्थांची व्यवस्था करून आमचा पाहुणचार केला गेला आणि यानिमित्ताने आमचं एक मस्त फॅमिली गेट टुगेदर झालं.”पण इथेच सगळी कहाणी संपत नाही. त्यांच्या वास्तव्याच्या शेवटच्या दिवशी जामा मशिदीवरून एक इमाम राष्ट्रपती भवनात आला आणि त्याने या कुटुंबासाठी प्रार्थना केल्या.

आपल्या पदाचा गैरवापर करून कलामांनी आपल्या कुटुंबियांसाठी नोकरीच्या संधी कधीही मिळवल्या नाहीत. कलामांचे सचिव पी. माधवन नायर यांनी सांगितलं की, “कलमांचं कुटुंब राष्ट्रपती भवनात राहीलं होतं तेव्हा झालेल्या त्यांच्या संपूर्ण खर्चाचा मिनिटामिनिटाचा हिशोब ठेवला गेला आणि आपले कुटुंबीय गेल्यानंतर कलामांनी आपल्या स्वतःच्या खात्यातून ३,५२,००० रुपयांची रक्कम दिली.”

 

rashtrpati bhavan Inmarathi

आपल्या आजोबांविषयी बोलताना अजमल म्हणाला, “थाथा (आजोबा) दर महिन्याला आजीला आणि कुटुंबातल्या आणखी एका मोठ्या सदस्याला २५० रुपये पाठवायचे. रमझान आणि बकरी ईद सारख्या सणांना सणाची भेट म्हणून कुटुंबातल्या प्रत्येक मोठ्या व्यक्तीला आजोबांकडून १००० रुपये  मिळायचे.” हैद्राबादमधल्या DRDO मध्ये जेव्हा कलाम काम करत होते तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी कलाम यांच्याकडून कुठलेही फायदे कधीही मिळवले नाहीत. अजमलने सांगितलं की, “आमच्या कुटुंबातल्या बऱ्याच सदस्यांना कमी पगाराच्या नोकऱ्या असूनही त्यांनी कधी त्याचा फायदा करून घेतला नाही.”

 

kalam im

 

कलामांच्या औदार्याची साक्ष देणारा एक प्रसंग त्यांचे सचिव नायर यांनी सांगितला. २००२ मध्ये, कलामांनी आपल्या कर्मचाऱ्यांना रमदान इफ्तार सोहळ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संपूर्ण रकमेचं गोरगरीब आणि गरजूंना वाटप करायला सांगितलं. नायर म्हणाले, “कलाम म्हणाले की राष्ट्रपती भवन जो अडीच लाखांचा खर्च रमदान इफ्तारला करतं त्याहून अधिक पैसे गोरगरिबांना आणि गरजूंना मिळायला हवेत.

” राष्ट्रपती भवनाच्या अडीच लाखांच्या रकमेत कलामांनी आपल्या स्वतःच्या खात्यातले आणखी १ लाख रुपये घातले आणि आपल्या कर्मचाऱ्यांना या रकमेचं वाटप गोरगरिबांना आणि गरजूंना करायला सांगितलं. आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकालात कलाम १७५ टूर्सना गेले. त्यातल्या केवळ सातच परदेशवाऱ्या होत्या. बाकी सगळे प्रवास त्यांनी देशातच केले. एक लक्षद्वीप वगळल्यास कलामांनी देशातल्या प्रत्येक राज्याला भेट दिली आहे अशी माहिती नायर यांनी दिली.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?