' बँकांची कामं आजच पूर्ण करा, नाहीतर पुढील ४ दिवस कठीण आहेत… – InMarathi

बँकांची कामं आजच पूर्ण करा, नाहीतर पुढील ४ दिवस कठीण आहेत…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मार्च महिना म्हंटलं की सगळीकडे year ending ची कामं आपल्याला बघायला मिळतात. सरकारी ऑफिसेस, बँका, चार्टर्ड अकाउंटंट पासून अगदी सर्वसामान्य व्यापारीसुद्धा या कामात व्यस्त असतात.

अशाच मार्च महिन्याच्या शेवटी ४ दिवस सलग बँक बंद असणार आहेत असं तुम्हाला सांगितलं तर सामान्य माणसांची किती तारांबळ उडेल? हो पण हे असं होणार आहे.

 

bank closed

 

२०२२ च्या या मार्च महिन्याच्या अखेरीस तब्बल ४ दिवस बँक्स बंद असणार आहेत. २६ आणि २७ मार्च रोजी बँकांना सुट्टी आहे तर २८ आणि २९ रोजी बँक कर्मचारी संघटनांचा संप आहे, त्यामुळे उद्यापासून ४ दिवस बँक बंद राहणार आहेत.

तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या घरी महिनाअखेरीस काय तारांबळ उडते ती काही वेगळी नाही, बिलं भरणं, घरातल्या लोकांचे खर्च या सगळ्या गोष्टी सावरताना प्रत्येकाची तारेवरची कसरत होते!

त्यामुळे या ४ दिवसांत सामान्य लोकांना या प्रकाराचा थोडा त्रास होऊ शकतो, शिवाय या संपामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक यांचे व्यवहार ठप्प होऊ शकतात अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

 

 

त्यामुळे तुमचे कोणाचे काही बँकेशी निगडीत काम राहिलेले असेल तर शक्यतो ते आजच पूर्ण करा, म्हणजे पुढचे ४ दिवस होणाऱ्या मनस्तापापासून तुम्ही दूर रहाल. अर्थात प्रत्येकालाच काही आजच सगळे व्यवहार करणं शक्य नाही, पण जर तुमचं खरंच एखादं काम अडणार असेल तर आज पहिले ते पूर्ण करा!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?