' चालायला जाताना हमखास होणाऱ्या या ५ चुका तुम्ही टाळायलाच हव्यात – InMarathi

चालायला जाताना हमखास होणाऱ्या या ५ चुका तुम्ही टाळायलाच हव्यात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नियमित चालणे हा शरीरासाठी सोपा आणि उत्तम व्यायाम प्रकार मानला जातो. बऱ्याच लोकांना फिट राहण्यासाठी योग करणे किंवा जिममध्ये जाऊन घाम गाळणे शक्य होत नाही, अशी लोकं चालण्याची वाट निवडतात.

चालणे हा सर्वात सोपा व्यायाम प्रकार समजला जात असला, तरी त्यामध्ये देखील अनेकदा चुका होतात. अशा चुकांमुळे काही वेळेस गंभीर दुखापत होण्याची देखील शक्यता असते. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, काही चुकीच्या सवयी, ज्या तुम्ही टाळायला हव्यात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१. चुकीच्या चपलांची निवड –

 

high heels inmarathi1

 

चालताना हाय हिल्स वापर करणे कटाक्षाने टाळा. हाय हिल्समुळे टाचेवर ताण येतो. काही लोक बास्केट बॉल किंवा टेनिस शूज यांचा वापर करतात, परंतु अशा शुजची बांधणी वेगळी असल्याने त्यामुळे चालण्याच्या प्रक्रियेमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.

अशा शुजमध्ये असलेला कडकपणा जलद चालण्यासाठी उपयुक्त ठरतो, मात्र टाच ते पायापर्यंतच्या लवचिकतेस अडथळा निर्माण करतो. त्यामुळे हलके आणि चांगले पॅडिंग असलेल्या बुटांची निवड करा.

२. चुकीचे माप –

 

walking 2 inmarathi

 

बुटांची निवड करताना पायासाठी योग्य मापाच्या शूजची निवड करा, जर तुमचे शूज खूप सैल असतील तर ते तुमच्या पायांना योग्य आधार देणार नाहीत, तसेच खूप घट्ट शूज वापरल्याने पायाला रॅशेस येऊ शकतात. यामध्ये पायांची बोट दुमडल्यांने धोका निर्माण होतो.

शूज घालून पायांच्या बोटांची हालचाल होऊ शकेल अशा प्रशस्त आणि योग्य मापाचे बुट निवडा. बुटांची खरेदी करण्यासाठी शक्यतो दुपारनंतर जा. त्यामुळे पायाचे योग्य माप मिळण्याची शक्यता अधिक असते.

३. रोज एकच मार्ग –

 

walking featured inmarathi

 

रोज एकाच मार्गाने चालल्यामुळे काही दिवसांनी त्यातील इंटरेस्ट कमी होतो आणि लोक चालण्याचा कंटाळा करू लागतात. चालण्यातला रस कायम ठेवण्यासाठी मार्ग नियमितपणे बदला. हे केवळ तुमच्या मूड आणि प्रेरणेसाठीच चांगले नाही, तर ते तुमच्या स्नायू आणि सांध्यासाठी चांगले आहे.

चढण्यासाठी टेकड्या शोधा. यामुळे पायांचे स्नायू बळकट होण्यास मदत होते.

४. मोठ्या आवाजाचे संगीत ऐकणे –

अनेकदा लोक प्रेरणा घेण्यासाठी मोठ्या आवाजात संगीत लावून त्यावर चालण्याचा प्रयत्न करतात. अशाने अपघात होण्याचा धोका निर्माण होतो.

५. मोबाईल स्क्रीनमध्ये पाहत चालणे –

 

walk im

 

मोबाईलमध्ये डोकावून रस्त्याने चालणारे महाभाग हे अडचणींना स्वतः आमंत्रण देतात. स्क्रीनमध्ये एकटक पाहत चालण्याची सवय असेल, तर वेळीच बदला कारण २००४ पासून मोबाईलमुळे अपघात झालेल्या पादचाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. ६०% लोक फोन मुळे विचलित होतात त्यामुळे चालताना फोन खिशात ठेवा आणि चालण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?