' कडक उन्हाळ्यात मालामाल करणारे हॉट स्टॉक्स कोणते? सांगतायत नीरज बोरगांवकर

कडक उन्हाळ्यात मालामाल करणारे हॉट स्टॉक्स कोणते? सांगतायत नीरज बोरगांवकर

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण सहज आजूबाजूला चौकशी केली तर अशी अनेक उदाहरणं सापडतील जेव्हा सर्वसामान्य लोक डायट प्लॅन किंवा फिटनेस प्लॅन नियमित पाळू शकत नाहीत! यामध्ये अपयश येण्यामागे ते आपल्याला शेकडो कारणे आहेत.

जी लोकं यशस्वी झाली आहेत त्यांची आपण खोलात जाऊन चौकशी केली तर आपल्या लक्षात येईल यामागे केवळ यशाचा मंत्र हा एकच आहे ते म्हणजे सातत्य.

 

success mantra IM

 

इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत जर विचार केला तर सामान्य गुंतवणूकदारासमोर असलेले प्रश्न काही याहून वेगळे नाहीत. पण इन्वेस्टर समोर काही वेगळी कठीण  कारणं आणि चॅलेंजेस देखील असतात.

गुंतवणुकीचे निर्णय घेणे त्यांच्यासाठी खूप कठीण जातं कारण त्यांना असलेलं मर्यादित नॉलेज, मनातील भीती आणि एकांगी विचार करण्याची पद्धत (Bias). सामान्य गुंतवणूकदार इन्वेस्टमेंट पासून दूर राहण्याचं कारण म्हणजे मार्केटचे स्वरूप; मार्केट सतत वर-खाली, दोलायमान परिस्थितीत असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

गोल्ड, बॉन्ड, म्युच्युअल फंड आणि शेअर्स यामधील व्यवहार आता खुप सोपे आणि सोयीचे झाले आहेत, आड येते ती निर्णय-क्षमता.

योग्य निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मार्केटमध्ये नेमकं काय करायचं हे समजून सांगणारी विश्वासाची, जबाबदार व्यक्ती हवी, अशीच एक व्यक्ती म्हणजे नीरज बोरगांवकर!

 

neeraj borgaonkar IM

 

गेल्या अनेक वर्षांपासून ते सामान्य इन्वेस्टरला या गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर नीट उलगडून सांगत आहेत.

===

सध्या सर्वत्र उन्हाळ्याची काहिली जाणवू लागलेली आहे. आंबे, सुट्ट्या, वाळ्याचे पडदे, मामाच्या गावी पिकनिक असा हा एक वर्षातला अतिशय सुंदर काळ असतो. करोना व्हायरसचे संकट आता जवळपास टळले आहे आणि जनजीवन सुरळीत होत आहे. एकूणात सध्या अतिशय आश्वासक असे दिवस पुन्हा आलेले आहेत.

उन्हाळ्याचे दिवस स्पेशल असतात कारण हा काळ वर्षामधून एकदाच येतो आणि आपणा सर्वांना अतिशय आनंद देऊन जातो.

आजच्या लेखामध्ये आपण या उन्हाळ्यासाठी स्पेशल असे काही शेअर्स बघणार आहोत. उन्हाळ्याच्या काळामध्ये काही सीझनल बिझिनेस सेक्टर्स अतिशय चांगला व्यवसाय करताना दिसून येतात.

जसे एयर कंडिशनिंग सेक्टर, आईसक्रीम सेक्टर, कोल्डड्रिंक सेक्टर इत्यादी. या सेक्टर्समधील काही शेअर्स आज आपण बघणार आहोत.

 

icecream IM

 

लेखाची सुरुवात करण्याअगोदर एक महत्वाची सूचना – हा कोणत्याही स्वरुपाचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणताही आर्थिक निर्णय घेण्याअगोदर विषयाचा पूर्ण अभ्यास करणे आवश्यक आहे, तसेच आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.

भारतीय कंपन्या दर तीन महिन्यांनी आपले निकाल प्रकाशित करीत असतात. एप्रिल, मे, जून हे पहिले क्वार्टर, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे दुसरे क्वार्टर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे तिसरे क्वार्टर आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे चौथे क्वार्टर अशी वर्षाची विभागणी केलेली असते. आपल्याकडे सुमारे मार्च महिन्यामध्ये उन्हाळा सुरु होतो आणि सुमारे जून महिन्यापर्यंत उन्हाळी सेक्टर्स चांगला व्यवसाय करतात.

क्वार्टर 4 आणि पुढील वर्षाचे क्वार्टर 1 या दोन निकालांमध्ये आपल्याला या सेक्टर्सनी उन्हाळ्यामध्ये कसा व्यवसाय केला याची कल्पना येते. आपण आज जे स्टॉक्स बघणार आहोत त्या स्टॉक्सकडे आणि त्यांच्या निकालांकडे सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष असते आणि या शेअर्समध्ये पुढील काही काळामध्ये फायद्या मिळवण्याच्या चांगल्या संधी दिसून येऊ शकतात.

VOLTAS – ही टाटा ग्रुपमधील एअर कंडिशनर्स व रेफ्रिजरेटर्स तयार करणारी कंपनी आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये यांच्या प्रॉडक्ट्सची मागणी वाढलेली दिसून येते.

या वाढलेल्या मागणीचा परिणाम कंपनीचा नफा वाढण्यामध्ये आणि पर्यायाने शेअरची किंमत वाढण्यामध्ये होऊ शकतो. या शेअरची सध्याची किंमत 1276/- रुपये आहे.

 

voltas IM

 

BLUESTAR – ही कंपनीदेखील एयर कंडिशनर्स, एयर प्युरिफायर्स, कूलर, कोल्ड स्टोरेज इत्यादी वस्तु तयार करते. उन्हाळ्यामध्ये यादेखील कंपनीचा व्यवसाय चांगला होत असतो. या कंपनीच्या शेअरची सध्याची किंमत 1000/- रुपये आहे.

VBL – वरुण बेव्हरेजेस लिमिटेड. ही कंपनी भारतामध्ये “पेप्सी” हे कोल्ड ड्रिंक वितरित करते. तसेच माऊंटन ड्यु, मिरिंडा, सेव्हन अप, ट्रॉपिकाना ज्युस, अ‍ॅक्वाफिना वॉटर हीदेखील उत्पादने याच कंपनीद्वारे वितरित केली जातात. उन्हाळ्याच्या खास दिवसांमध्ये या कंपनीचा व्यवसाय वाढणे अतिशय स्वाभाविक आहे. या शेअरचा सध्याचा भाव 970/- रुपये आहे.

VADILALIND – वाडीलाल इंडस्ट्रीज्‌ लिमिटेड. आकाराने लहान म्हणजेच स्मॉल कॅप असलेली अशी ही कंपनी. ही कंपनी आईसक्रीमचा व्यवसाय करते. आईसक्रीम बद्दल काही बोलण्याची आवश्यकताच नाही. लहानांपासून थोरांना सर्वांना हे आईसक्रीम अतिशय प्रिय आहे. या कंपनीच्या शेअरचा सध्या भाव 1382/- रुपये आहे.

 

vadilal ice cream IM

 

HAVELLS – हॅवेल्स इंडिया लिमिटेड. पंखे, मोटर्स, स्विचेस वर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट तयार करणारी कंपनी. गेली अनेक वर्षे या कंपनीच्या नफ्यामध्ये सातत्यपूर्वक वाढ दिसून आलेली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या कंप्नीची कामगिरी अतिशय चांगली होत असते.

या काही कंपन्यांच्या शेअर्सचा अभ्यास आपण या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये करु शकतो व आपल्याला योग्य वाटत असल्यास या शेअर्सचा समावेश आपल्या पोर्टफोलिओमध्ये करु शकतो.

गुंतवणूक व पोर्टफोलिओ या विषयाबद्दल अशीच महत्वपूर्ण माहिती वेळोवेळी मी आपल्या Neeraj Borgaonkar या युट्यूब चॅनलवर देत असतो. पुढील लिंकवर क्लिक केल्यास हा आपला युट्यूब चॅनल तुम्हाला बघता येईल.

युट्यूब चॅनलची लिंक – https://marathimarket.in/youtube

नक्की बघा व सबस्क्राईब करा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?